विनय जोशी

शीतयुद्ध संपले आणि मानवी चांद्रमोहिमा थांबल्या. पण बदलत्या गरजा, नवे तंत्रज्ञान यामुळे प्रगत संशोधनासाठी चांदोबा आपल्याला पुन्हा खुणावू लागला आहे. आर्टेमिस मोहिमेतून पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकदा नासा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे. नव्या पर्वातील या चांद्रमोहिमा मानवजातीची पुढची झेप ठरणार आहेत.

Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
१८ वर्षांनंतर मित्र ग्रह शुक्र आणि राहूची युती! ‘या’ राशीच्या लोकांच्या नशीबाचे टाळे उघडणार, मिळेल अपार पैसा
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख

शीतयुद्ध संपले आणि चंद्रावर मानवी मोहिमा थंडावल्या. डिसेंबर १९७२ मध्ये अपोलो-१७ मोहिमेतून शेवटचा मानव चंद्रावर जाऊन आला. अशा मोहिमांवर होणारा अवाढव्य खर्च बघता यानंतर मोठी चांद्रमोहीम झाली नाही. १९९९ मध्ये अमेरिकेच्या ल्यूनार प्रॉस्पेक्टर मिशनमुळे  चंद्राच्या विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता दिसली. शिवाय चंद्रावर अ‍ॅल्युमिनिअम, टायटॅनियम, युरेनियम, सिलिकॉन अशा मौल्यवान मूलद्रव्यांचे साठे असावेत अशी शक्यता वर्तवली गेली. चंद्रावर मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारे हीलियम-३ हे प्रदूषणमुक्त उत्कृष्ट इंधन मानले जाते. याचे ‘ल्यूनार मायिनग’ शक्य झाले तर जगाची ऊर्जेची गरज पुढील शेकडो वर्षे भागू शकेल. चंद्रावरील खडक सूर्यमालेइतके जुने आहेत. त्यांच्या अभ्यासातून  विश्वाच्या उत्पत्तीविषयी नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. चंद्रावर वातावरण नसल्याने तिथून उड्डाण करत कमी इंधनात अधिक वेगाने विविध ग्रहांपर्यंत प्रवास करणे शक्य आहे. म्हणून मंगळ आणि इतर ग्रहांच्या मोहिमांसाठी चंद्राचा उपयोग थांबा म्हणून करता येऊ शकतो असे लक्षात आले आहे. या सगळय़ा शक्यतांमुळे प्रगत संशोधनासाठी चांदोबा आपल्याला पुन्हा खुणावू लागला आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करत चंद्राचे नवे अन्वेषण करण्यासाठी नव्या सहस्रकातील मोहिमा सज्ज आहेत.

चांद्रमोहिमांच्या या नव्या पर्वात भारताची चांद्रयान मोहीम आपल्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. विविध टप्प्यांत चंद्रावर याने पाठवून चंद्राभोवती कक्षण उपग्रह (ऑर्बिटर) फिरता ठेवणे, चंद्र भूमीवर अवतरक (लँडर ) उतरवणे, चांद्रभूमीवर बग्गी (रोव्हर) चालवणे अशा काही प्रयोगांचा यात समावेश आहे. याच्या पहिल्या टप्यात २२ ऑक्टोबर २००८ रोजी चांद्रयान- १ या मानवरहित अंतरिक्षयानाचे प्रक्षेपण झाले. ८ नोव्हेंबरला यान यशस्वीरीत्या चंद्रकक्षेत दाखल झाले. यानंतर मून इम्पॅक्ट प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील श्ॉकलटन क्रेटरह्ण येथे  नियोजितरीत्या आदळला आणि त्यावरचा भारताचा झेंडा चंद्रावर उमटला. याच्या मून मिनरॉलॉजी मॅपर उपकरणाला चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा मिळाला.

मोहिमेच्या दुसऱ्या टप्यात २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान-२ चंद्राकडे रवाना झाले. २० ऑगस्टला ते चंद्राच्या कक्षेत पोहचून ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत फिरू लागले. विक्रम हा अवतरक चांद्रभूमीवर अलगद उतरवून त्यातील प्रज्ञान बग्गी चंद्राच्या पृष्ठभागावर फिरवत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार होता. पण अखेरच्या टप्प्यात चांद्रभूमीपासून २.१ कि.मी. उंचीवर असताना विक्रमशी संपर्क तुटला आणि तो चंद्रावर आदळून नष्ट झाला. या दुर्दैवी घटनेने  देशभरातील खगोलप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण पसरले. पण इस्रोचे शास्त्रज्ञ अपयशातून सावरत चांद्रयान-३ या मोहिमेच्या तयारीला लागले.

१४ जुलै २०२३ ला लॉन्च व्हेईकल मार्क- III च्या साहाय्याने चांद्रयान-३ प्रक्षेपित झाले. कमीत कमी इंधनात चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी यान पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत  ठेऊन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने गती वाढवली गेली. ५ वेळा यानाची कक्षा विस्तारित होऊन अखेर १ ऑगस्टला मध्यरात्री यान उपभू स्थानावर असताना त्याचे इंजिन सुरू झाले .‘ट्रान्स ल्युनर इंजेक्शन’ हा महत्त्वाचा टप्पा पार पडला आणि चांद्रयान-३ चंद्राकडे झेपावले. ५ ऑगस्टला ते चंद्राच्या कक्षेत दाखल होईल. यांनतर कक्षा चार वेळा कमी करत त्याला चंद्रापासून १०० किमीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. २३ ऑगस्टला  भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ : ४७ ला विक्रम अवतरक चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात ६९. ३७ दक्षिण, ३२.३५ पूर्व या नियोजित स्थानावर उतरेल. अप्रिय घटना टाळून सुरक्षित अवतरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा यात केल्या गेल्या आहेत. यानंतर अवतरकातून प्रज्ञान ही सहा चाकी बग्गी बाहेर येऊन चंद्रभूमीवर यशस्वी संचार करेल आणि चंद्रावर सुरक्षित उतरणारा भारत चौथा देश ठरेल.

चांद्रयान ३ च्या तीनही मोडय़ूल्ससोबत विविध प्रयोगांसाठी शास्त्रीय उपकरणी आहेत. विक्रमवरील   RAMBHA  उपकरण चंद्राच्या वातावरणातील वायू आणि प्लाझ्मा यांचे तर  ChaSTE उपकरण चंद्रावरील  औष्णिक गुणधर्माचे अध्ययन करतील. इन्स्ट्रुमेंट फॉर ल्युनर सिस्मिक अ‍ॅक्टिव्हिटी(ILSA) उपकरण चंद्राच्या भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेऊन असेल. बग्गीवर चंद्राच्या पृष्ठभागाच्या मूलभूत रचनांचा अभ्यास करण्यासाठी अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आणि लेझर इंडय़ूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) ही उपकरणे आहेत. दरम्यान, प्रोपल्शन मॉडय़ूल चंद्राच्या कक्षेत फिरत त्यातील स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (SHAPE) उपकरणाद्वारे पृथ्वीच्या वर्णपटाचा अभ्यास करेल.

चांद्रयान मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात जपानच्या सहकार्याने ल्युनर पोलर एक्सप्लोरेशन मिशन म्हणजेच चांद्रयान -४ राबविले जाईल. यात २०२६ नंतर चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात अवतरक उतरवून चांद्ररात्रीत देखील कार्य करण्याची योजना आहे. चंद्रावर मातीच्या अभ्यासासाठी चांद्रयान -५ आणि तिथून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी चांद्रयान -६ मोहीम राबवण्याचे  इस्रोचे नियोजन आहे.  या सगळय़ा अभ्यासातून चंद्राविषयी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळेल.

या सहस्रकातील सगळय़ात महत्त्वपूर्ण चांद्रमोहीम lc³F आर्टेमिसचे नाव घेता येईल. नासाच्या नेतृत्वाखाली युरोपियन स्पेस एजन्सी (ESA), जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA), कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA), इस्रायल स्पेस एजन्सी (ISA) आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (ASA) या पाच देशांच्या अंतराळ संस्था या मोहिमेत कार्यरत आहेत. स्पेस लाँच सिस्टिम (SLS) या क्षेपणयानाच्या साहाय्याने ओरायन या अंतराळयानातून मानवाला चंद्रावर पाठवणे हे आर्टेमिस मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

मानवी मोहिमांच्या आधी क्षेपणयानाची क्षमता आणि ओरायनची सुरक्षितता आणि इतर तांत्रिक बाबी तपासण्यासाठी आर्टेमिस-१ हा या प्रकल्पाचा पहिला टप्पा राबवण्यात आला. ओरायनच्या  क्रू मोडय़ुलमध्ये  स्पेस सूट घालून तीन मानवाकृती पुतळे बसवण्यात आले. १६ नोव्हेंबर २०२२ ला  प्रक्षेपण होऊन २० नोव्हेंबर रोजी ओरायनने चंद्राच्या प्रभावक्षेत्रात प्रवेश केला. चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त १०० किमी उंचीवरून भ्रमण करत ओरायनने चंद्राच्या पृष्ठभागाचा बारकाईने अभ्यास केला. २६ नोव्हेंबरला पृथ्वीपासून  ४४,३२,२१० किमी अंतरावर पोहोचून त्याने विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी कुठल्याही पृथ्वीवर परत येऊ शकणाऱ्या मोहिमेतील यान इतके दूर गेले नव्हते. चंद्राभोवतालची दुसरी प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर यान परतीच्या प्रवासाला निघाले. ११ डिसेंबरला पृथ्वीकक्षेत येताच त्याचे सव्‍‌र्हिस मोडय़ूल गळून पडले आणि ४० हजार किमी प्रतितास या प्रचंड वेगाने क्रू मोडय़ुलने वातावरणात प्रवेश केला. प्रशांत महासागरात सॅन डिएगोजवळ निर्धारित ठिकाणी यान उतरले आणि आर्टेमिस-१’ या पहिल्या टप्प्याची सांगता  झाली.

आर्टेमिस-१ मधून मिळालेल्या माहितीच्या आधारे चांद्र प्रवासातील संभाव्य धोके, सुरक्षितता यांची चाचपणी करून पुढील मोहिमांची आखणी केली जात आहे. या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणजे २०२४ मधील आर्टेमिस-२ . हे १९७२ नंतर मानवाला चंद्राच्या आसपास नेणारे पहिले मिशन असेल. या मोहिमेत नासाचे रीड विजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच  आणि कॅनेडियन स्पेस एजन्सीचे जेरेमी हॅन्सन असे एकूण चार अंतराळवीर सहभागी असतील. नोव्हेंबर २०२४ मध्ये या अंतराळवीरांना घेऊन ओरायन आधी पृथ्वीच्या निकटकक्षेत स्थापित केले जाईल. पृथ्वीभोवती दोन प्रदक्षिणा करून वेग वाढवत ओरायन चंद्राकडे पावेल. चांद्रपृष्ठापासून १०,४२७ किमी अधिकतम अंतरावरून प्रदक्षिणा मारून यान पुन्हा पृथ्वीकडे रवाना होईल.

२०२६ नंतर आर्टेमिस-३ मानवाला पुन्हा एकदा चंद्रावर नेण्यासाठी सज्ज होईल. या मोहिमेतून पहिल्यांदा महिला आणि एक अश्वेत अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील. दोन अंतराळवीर ओरायन यानात चंद्राभोवती फिरत राहतील आणि दोन अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सुखरूप उतरतील. ओरायनमधून  चंद्रावर उतरण्यासाठी आणि चंद्रावरून परतण्यासाठी  स्पेसएक्सचे स्टारशिप ह्युमन लँडिंग सिस्टीम ( एचएलसी) हे स्पेसक्राफ्ट उपयोगात येईल. चंद्रावर  ५-६ दिवस राहून अंतराळवीर पाण्याच्या बर्फाचे नमुने घेण्यासह विविध वैज्ञानिक निरीक्षणे करतील आणि पुन्हा ओरायन यानात परत येतील. आर्टेमिस-२ प्रमाणेच क्रू मोडय़ुलला नियोजित ठिकाणी सुखरूप  उतरवण्यात येईल.

आर्टेमिस मोहिमेतील पुढचा महत्त्वाकांक्षी  टप्पा म्हणजे  ल्युनर गेटवे अंतराळ स्थानक होय. पृथ्वीभोवती जसे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक फिरते आहे तसे चंद्राच्या निअर रेक्टलाइनियर हालो कक्षेत ल्युनर गेटवे हे अंतराळ स्थानक फिरते ठेवण्याची योजना आहे. नासासोबतच इतर अंतराळ संस्था याचे विविध मोडय़ूल्स बनवत आहेत जे टप्याटप्याने चंद्राच्या कक्षेत नेत गेटवेची बांधणी केली जाईल. नोव्हेंबर २०२५ मध्ये फाल्कन हेवी या रॉकेटच्या साहाय्याने याची पॉवर अँड प्रोपल्शन एलिमेंट (PPE) आणि हॅबिटेशन अँड लॉजिस्टिक आउटपोस्ट (HALO) ही  दोन प्रमुख मॉडय़ुल चंद्राच्या कक्षेत पाठवली जातील. २०२९ नंतर आर्टेमिस -४ या पुढच्या मानवी मोहिमेसोबत  इंटरनॅशनल हॅबिटेशन मॉडय़ूल (I- HAB) तर आर्टेमिस -५ सोबत  एरढफकळ हे मॉडय़ूल पाठवून गेटवेला जोडले जाईल. पुढच्या आर्टेमिस मोहिमेतून इतर मोडय़ूल्स नेत त्यांची जोडणी केली जाईल. भविष्यातील मोहिमांत अंतराळवीर गेटवेमध्ये राहून चंद्राभोवती फिरत विविध प्रयोग करतील. आर्टेमिस  मोहीम मानवजातीची नव्या सहस्रकातील झेप आहे.

याचसोबत २०२३ मध्ये रशियाचे लुना -२५ आणि जपानचे  रछकट मोहिमा  चंद्रावर उतरण्यासाठी नियोजित आहेत. पुढील काही वर्षांत ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, युएई, इस्राईल असे अनेक देश आणि आणि काही  खाजगी कंपन्यादेखील चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर चांद्रसंसाधनांचा मालकी हक्क ,चांद्रमोहमांची सुरक्षितता या मुद्दय़ांवर १९७९च्या मुन अ‍ॅग्रीमेंटप्रमाणे नव्या मार्गदर्शक तत्त्वांची गरज भासू लागली आहे. यासाठी अमेरिकेने आर्टेमिस मोहिमेअंतर्गत  २०२० मध्ये ‘आर्टेमिस  एकॉर्ड’ हा करार जगापुढे ठेवला. फक्त संशोधनासाठी चांद्रमोहिमांची आखणी, परस्पर सहकार्य, वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण, मोहिमेतून उडणाऱ्या अवशेषांची सुरक्षित विल्हेवाट अशा मुद्दय़ांवर यात भाष्य केले आहे. २०२३ मध्ये पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात भारताने देखील या करारावर स्वाक्षरी केली आहे. नव्या पर्वातील या चांद्रमोहिमा आंतरराष्ट्रीय साहचर्याची नांदी ठरतील. मानवाच्या मनोविश्वाला व्यापणारा चंद्रमा यापुढे देखील अलांछन राहावा, हीच याद्वारे अपेक्षा!

Story img Loader