ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे मैत्री साजरी करण्याचा दिवस.. अर्थात फ्रेंडशिप डे. या दिवशी मित्रांना काहीतरी गिफ्ट दिलंच पाहिजे. दुकानात मिळणाऱ्या महागडय़ा गिफ्टपेक्षा ‘सेल्फ मेड’ किंवा खास कस्टमाईज्ड गिफ्ट मित्राकडून मिळालं, तर मन जास्त सुखावतं. असं स्वत: बनवलेलं काही देण्याकडे यंदा तरुणाईचा कल दिसतो आहे.
ऑगस्ट महिना जवळ आला, की वेध लागतात ते फ्रेंडशिप डेचे. ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तसं कॉलेज गोइंग तरुणाईसाठी रोजच फ्रेंडशिप डे असतो म्हणा! मित्र म्हणजे सर्वस्व वाटायला लावणारे हे दिवस. पण तरीही ‘फ्रेंडशिप डे’ म्हटलं की एक स्पेशल फीिलग येतं. अख्खं वर्ष कधी आपली मस्ती तर कधी चिडचिड सहन केल्याबद्दल म्हणा किंवा त्याच पेशन्सनं हेच सगळं त्यानं अथवा तिनं यापुढेही झेलावं म्हणून म्हणा.. पण आपल्या लाडक्या मित्र-मत्रिणींना ‘अॅज अ टोकन ऑफ लव्ह’ कुछ देना तो बनता है.. काय! रविवारी येणाऱ्या फ्रेंडशिप डेनिमित्त आपल्या खास मित्रांना खास भेट द्यायला हवी.
त्यामुळे फ्रेंडशिप डेसाठी विशेष शॉिपग करणं आलंच. जुल संपता संपताच छोटय़ा-मोठय़ा सगळ्या गिफ्ट शॉपमध्ये भेटवस्तूंची खूप सारी व्हरायटी बघायला मिळते आहे. रंगीबेरंगी फ्रेंडशिप ब्रॅण्ड्स, सॉफ्ट टॉइज, मोठीमोठी ग्रीटिंग कार्ड्स, मैत्रीविषयीचा मेसेज लिहिलेली शो-पिसेस यांनी सजलेल्या दुकानांकडे आपण आकर्षति नाही झालो, तरंच नवल! दुकानात जाताना आपण ठरवलेलं असतं एक आणि प्रत्यक्षात मात्र तिथून घेऊन येतो काही तरी वेगळंच. दुकानातले शेकडो गिफ्ट ऑप्शन्स बघून ‘नक्की यातलं काय घेऊ,’ हा प्रश्न पडतो. ऑनलाइन शॉिपग बाबतीतही तोच प्रकार. ऑनलाइन शॉिपग साइट्सवरही बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पण सध्या ट्रेण्ड आहे तो ‘सेल्फ मेड गुडीज’चा.
मेक युवर ओन फ्रेंडशिप बॅण्ड
काही ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर ‘मेक युअर ओन फ्रेंडशिप बॅण्ड’ असा एक पर्याय हल्ली दिला जातोय. यावर आपल्याला हवा तसा फ्रेंडशिप बॅण्ड आपण डिझाइन करायचा आणि नंतर तो ऑर्डर करायचा. बाजारात दिसणाऱ्या फ्रेंडशिप बॅण्डपेक्षा वेगळा, तुम्हाला हवा तसा बॅण्ड डिझाइन करायची आयडिया भन्नाट आहे. अनेक शॉपिंग साइट हल्ली हा सेल्फ मेड गुडीजचा पर्याय देताहेत. अशा भेटवस्तू आणि बॅण्ड्सची किंमत साधारण २५० रुपयांपासून सुरू होते.
सेल्फ मेड ज्वेलरी
हल्ली बाजारात क्विलिंग पेपर्सचे सेट मिळू लागले आहेत. या कागदापासून ईअररिंग्ज घरच्या घरी बनवता येतात. हे काम थोडं वेळखाऊ आहे. पण त्यात निर्मितीचा आनंद आणि तुमच्या अंगातील कला दाखवायला संधी नक्कीच आहे. बाजारात वेगवेगळ्या रंगाचे क्विलिंग सेट मिळतात. तुम्हाला हव्या त्या रंगांचे कागदी कानातले करून आपल्या खास मैत्रिणीला भेट देऊ शकता. या पूर्ण सेटची किंमत शंभराच्या आसपास असते. यात अनेक ईअरिरग्ज होऊ शकतात.
अतरंगी स्टाइल
फ्रेंडशिप बॅण्ड्समध्ये दरवर्षी काही ना काही व्हेरिएशन्स असतातच. पण गिफ्ट आर्टिकल्समध्ये मात्र ग्रीटिंग्स, वॉचेस, फ्रेंड्स लिहिलेल्या अंगठय़ा, लॉकेट्स, फोटो फ्रेम्स, मग याच गोष्टी असतात. या भेटवस्तू आता खूप कॉमन गोष्टी झाल्या आहेत. मग आपल्या बेस्टीज् ना काय बरं गिफ्ट देऊ शकतो? यावरचा एक ऑप्शन म्हणजे, सध्या ‘सेल्फ मेड िथग्स’ ही कन्सेप्ट बऱ्यापकी पॉप्युलर होतेय. सगळे मिळून अशा काही क्रिएटिव्ह तरीही अतरंगी स्टाइलनं फ्रेंडशिप डे साजरा करता येईल. उदाहरणार्थ एखादा कुठल्याही रंगाचा प्लेन टी-शर्ट/टॉप घेऊन त्यावर सगळ्या मित्र-मत्रिणींच्या हातांचे ठसे घ्यायचे किंवा ग्रूपमधल्या प्रत्येक फ्रेंडची स्पेशल साइन त्यावर करायची. असा अतरंगी फंकी टाइपचा टी-शर्ट किंवा टॉप नक्कीच लाइफ टाइम मेमरी होऊ शकेल. ते घालून कॉलेजला गेलात तर तुमचा ग्रूप नक्कीच अनेकांच्या नजरा वळवून घेईल.
कार्डपेपरवर सिलेक्टेड फोटोज आणि त्याविषयी थोडंसं लिहून असा कोलाज तयार करणंसुद्धा वेगळा पण क्रिएटिव्ह ऑप्शन आहे. सगळ्या फ्रेंड्सच्या नावांचे इनिशिअल्स एकत्र करून सगळ्यांना सारख्या टाइपचे ब्रेसलेट्स बनवून गिफ्ट करायचे किंवा आपल्या बेस्ट फ्रेंड्सना आवडणारी एखादी रेसिपी त्यांना स्वत: बनवून द्यायची.
थोडक्यात, सध्या एक्स्पेन्सिव्ह गोष्टींऐवजी ‘जो दिल को छू जाये’ अशा गोष्टी मित्र-मत्रिणींना गिफ्ट देण्याचा ट्रेण्ड आहे. कारण ‘सेल्फ टच’ असलेलं कुठलंही गिफ्ट आपल्या ‘बीएफएफ्स’साठी (बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर)जगातलं सर्वात बेस्ट गिफ्ट असतं. सो गाइज, बेस्टीज्साठी असंच काही तरी युनिक गिफ्ट शोधा. हॅपी फ्रेंडशिप डे!!
काही वेगळे पर्याय
* मैत्रिणींचा ग्रूप असेल तर पेपर क्विलिंगच्या ईअरिरग्ज करून द्यायच्या.
* प्लेन टी-शर्ट/टॉप घेऊन त्यावर सगळ्या मित्र-मत्रिणींच्या हातांचे ठसे घ्यायचे आणि असे टी-शर्ट घालून मिरवायचं.
* प्लेन टी-शर्टवर मित्राविषयी छानसा ‘वन लायनर मेसेज’ लिहून आपली सही करायची, असा टी-शर्ट बेस्ट फ्रेंडला गिफ्ट द्यायचा.
* कार्डपेपरवर मित्रांबरोबरच्या सिलेक्टेड फोटोंचं कोलाज करायचं त्यावर समर्पक छान ओळी लिहायच्या.
* ग्रूपमधल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींच्या नावाची आद्याक्षरं एकत्र करून त्यावर आधारित ब्रेसलेट किंवा बॅण्ड बनवून घ्यायचा.
* मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आवडीचा एखादा पदार्थ करून न्यायचा.