vv15प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com  या मेलवर पाठवा.

नमस्कार, मी वेदांती. मी २० वर्षांची आहे. मी डिग्री कॉलेजला आहे. माझी उंची ५.१ फूट आहे आणि वजन ४७ किलो आहे. माझा वर्ण गव्हाळ आहे. मला साजेसे असे काही कपडे सुचवा.

हाय वेदांती,

कॉलेज लाइफ म्हणजे मस्ती आणि मज्जा आणि हेच तुमचे छान फॅशनेबल राहण्याचे दिवस आहेत. तू कपडय़ांमध्ये वेगवेगळे एक्स्पेरिमेंट करू शकतेस. वेगवेगळे लुक्स ट्राय करू शकतेस. मस्त एन्जॉय करू शकतेस. तू दिलेल्या तुझ्या वर्णनावरून असं लक्षात येतंय की, तू फारशी उंच नाहीस त्यामुळे पहिले आपण तुझ्या फूटवेअर्सपासून सुरुवात करूया. वेजेस किंवा प्लॅटफॉर्म हिल्स तुला खूप छान दिसतील. आणि हल्ली हे वेगवेगळ्या डिझाइन्स आणि कलर्समध्ये उपलब्ध असतात.

जर तुझे पाय स्लीम असतील तर तू शॉर्ट्स घालू शकतेस. असे कपडे व्यवस्थित कॅरी करावे लागतात. पण शॉर्ट्स कॅरी करायचं हेच तर वय असतं. डेनिम शॉर्ट्स विथ लूज टीस किंवा स्पेगेटीस आणि लूज श्रग्स हा खूप यंग आणि फ्रेश लुक आहे. फेडेड जीन्स किंवा टोर्न्ड जीन्स ट्राय कर किंवा वेगवेगळ्या रंगातल्या जीन्स वापरून बघ. अँकल लेन्थ किंवा फुल लेन्थ जीन्स वापर. काफ लेन्थ जीन्स नको. त्यामुळे तू बुटकी दिसशील. स्कर्ट्स, वनपीस ड्रेसेस वापर. स्कर्ट्स घालताना ते गुडघ्याच्या जरा वर किंवा अँकल लेन्थ असू देत. मॅक्सी ड्रेसेस तुला सूट होतील आणि त्यात तू उंच वाटशील.

टीज(टीशर्ट्स), स्पेगेटीस, ट्युनिक यातलं काहीही तू वापरू शकतेस. फीटिंग असलेले  टॉप्ससुद्धा वापरू शकतेस. पण त्यात तू कम्फर्टेबल नसशील तर तू डेनिम जॅकेट्स किंवा श्रग्स त्यावर घालू शकतेस. फ्लॅट पोट असेल तर क्रॉप टॉप्ससुद्धा तू वापरू शकतेस.

कलर्सच्या बाबतीत तू खूप लकी आहेस. कारण गव्हाळ वर्णावर कोणतेही रंग खुलून दिसतात. बेबी िपकसारख्या पेस्टल शेड्स, ऑरेंजसारखे मिड टोन शेड्स किंवा चॉकोलेटीसारखे डार्क शेड्स कोणतेही कलर्स तुला शोभून दिसतील. मोठी डिझाइन किंवा उभं डिझाइन वापरू नको. मस्त कलरफुल वॉचेस वापर. छान छान नेकपिसेस वापर. वेगवेगळ्या  कलरफुल बॅग्स ट्राय कर. फंकी सनग्लासेस वापर. या सगळ्यामुळे तुला मस्त लुक मिळेल.  बी बोल्ड, बी कॉन्फीडेंट .
(अनुवाद – प्राची परांजपे)
अमित दिवेकर