शाहरूख खानचा ‘फॅन’ चित्रपट आज प्रदर्शित होतोय. शाहरूख प्रमोशनच्या वेळी आपल्या चाहत्यांबाबतचे अनुभव त्यानिमित्त शेअर करतोय. मराठीतील तारे-तारकांच्या फॅन्सचे अनुभव कसे आहेत त्याविषयी त्यांना बोलतं केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘हुश्श, सुटला बाबा रणबीर त्या कतरिनाच्या कात्रीतून! आता माझा मार्ग मोकळा झाला!’ एक मोठ्ठा हशा.
‘दीपिका काय मस्त दिसत्ये यार बाजीराव मध्ये.. कलिजा खल्लास!’
‘एऽऽ शाहरूखबद्दल काहीही बोलायचं नाही. मी खपवून घेणार नाही. कसाही असो मी त्याची डाय हार्ड फॅन आहे.’
‘शाहरुखपेक्षा सल्लू बेस्ट आहे याऽऽर’
असे संवाद मित्र-मैत्रिणींच्या कंपूत अगदी कॉमन असतात. आपापल्या आवडत्या हिरो- हिरॉइनवरून होणारी भांडणं तर नित्याचीच. हा असा तो तसा, हाही आवडतो आणि तोही असं म्हणणारे असतात. पण अभिनेत्यांचे डाय हार्ड फॅन असणारेही बरेच आहेत. एखादा नवा सिनेमा येणार असेल तर त्यातल्या हिरो-हिरॉइन्सच्या फॅन्सची फडफड आजूबाजूला लगेच जाणवते. या ‘फॅन’चीच गोष्ट घेऊन मनीष शर्मा हा दिग्दर्शक येत आहे. ‘फॅन’मध्ये शाहरूख खान प्रमुख भूमिकेत असेल. प्रत्यक्षातही शाहरूखची फॅन मंडळी प्रचंड आहेत. त्याचे अनुभवही तो चित्रपटाच्या प्रमोशन्सच्या निमित्ताने सांगतोय. मराठीतील तारे-तारकांच्या फॅन्सचे अनुभव कसे आहेत त्याविषयी त्यांना बोलतं केलं.
नवीन चित्रपट, मालिका अभिनेत्यांना एका दिवसात स्टार बनवतात आणि स्टारमागचे असंख्य फॅन्सही तयार होतात. या फॅन मंडळींचे वेगवेगळे प्रकार असतात. शाहरूख खानचं एकदा दर्शन व्हावं, म्हणून बरेच लोक त्याच्या ‘मन्नत’समोर मन्नत मागत उभे असतात. अमिताभ बच्चन, सलमान खान यांच्या घरांसमोरही कायम चाहत्यांची गर्दी असते. पूर्वी सही घेण्यासाठी धडपडणारे फॅन्स हल्ली सेल्फी घ्यायची धडपड करतात. सोशल मिडिया वरची फॅन पेजेस, लाइक्स, शेयर्स यांना तर उधाण आलेलं असतं. मराठी अभिनेत्यांच्या वाटय़ाला अशी पॅन इंडियन लोकप्रियता येत नसली, तरीही त्यांच्याजवळ फॅन्सचे भरपूर किस्से असतात.
स्पृहा जोशी
‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेला लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं. अगदी भरभरून प्रेम आम्हाला मिळालं. त्यावेळी ‘हाइक’वर आमचे स्टिकर्स आले होते. खूपच वेगळा आणि मस्त अनुभव होता हा. प्रेक्षक पात्रांशी खूप कनेक्ट होतात, त्याचा
ललित प्रभाकर
मला फक्त ‘आदित्य’ म्हणून किंवा ‘कबीर’ अशा माझ्या भूमिकांच्या नावाने ओळखणाऱ्या चाहत्यांपेक्षा ललित म्हणून मी कसा आहे ते जाणून घेणारे चाहते मला आवडतात. माझ्या दोन्हीही मालिका जुळून येती रेशीमगाठी आणि दिल दोस्ती
एकदा पृथ्वी थिएटरला मी नाटक पाहायला गेलो होतो. तिथे मला एक मावशी भेटल्या. ऑस्टीनमधून त्या आल्या होत्या. मला तुझं काम खूप आवडतं वगैरे त्यांनी मला सांगितलंच आणि मला चार्ली चॅपलिन आवडतो म्हणून चार्ली चॅपलिनची ऑटोबायोग्राफी आणली होती. त्यांनी एक लेटरसुद्धा लिहिलं होतं. ही माझ्यासाठी खूपच लक्षात राहिलेली गोष्ट आहे.
वैभव तत्त्ववादी
आपलेही चाहते असावेत, आपल्या भोवतीही फॅन्सचा घोळका असावा असं मला खूप वाटायचं आणि तसा अनुभव ‘कॉफी आणि बरंच काही’नंतर एका कॉलेजमध्ये अनुभवायला मिळाला. मी तिथे पाहुणा म्हणून गेलो होतो आणि फॅन्सचा अक्षरश
अमेय वाघ
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे आम्हा सगळ्यांनाच खूप फॅन्स मिळाले. लोकांनी खूप कौतुक केलं आणि मोठय़ांबरोबर अगदी लहान लहान मुलांनाही आम्ही आपलेसे वाटायला लागलो, आवडायला लागलो. एकदा आमची ‘डी३’ची कॉन्सर्ट होती. त्या वेळी आमच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक होते, कारण प्रचंड लोक आले होते.