काही प्रश्नांची उत्तरं शोधणं हे कर्मकठीण काम असतं. जसे मुलींना सरळ केस का आवडतात? सरळ केस हे अत्यंत लोकप्रिय असून ती जगभरातील सर्वात प्रचलित हेअरस्टाइल आहे. ती कधीच जुनी होत नाही. ती औपचारिक, अनौपचारिक समारंभामध्ये करता येते, तसेच सर्व प्रकारच्या चेहऱ्यांवर खुलून दिसते. ही सर्व वयोगटात प्रचंड लोकप्रिय असलेली सहाबहार आणि अभिजात हेअरस्टाइल आहे. सरळ केसांची निगा राखणे आणि त्यांचे स्टायिलग करणे खूप सोपे असते. सरळ केसांबरोबर केलेले कुठलेही प्रयोग कधीच बिघडू शकत नाहीत. त्यामुळेच त्यांना दर्जेदार आणि जनसामान्यांची हेअरस्टाइल म्हणतात.
सरळ केसांमुळे स्वच्छ आणि नीटनेटके स्वरूप मिळत असल्यामुळे आणि त्यांची देखभाल करण्यातील सोय यांमुळे मुली सरळ केसांना प्राधान्य देतात. सरळ केसांची कुठलीही हेअरस्टाइल करता येते. सरळ केसांची देखभाल करणे अतिशय सोपे असते. केसांवर घ्यावी लागणारी मेहनत आणि वेळ यांच्या बाबतीतच म्हणायचे झाले तर ही सर्वात सोयीस्कर हेअरस्टाइल आहे. त्याला ब्लो ड्राइंग किंवा जेलचा वापर करण्याची गरज नसते. केस धुतल्यानंतर केस वाळेपर्यंत त्यांना जास्त वेळ द्यावा लागत नाही, या गोष्टीमुळे नोकरदार व्यावसायिकांमध्ये सरळ केस खूप प्रचलित आहेत.
भारतभरातील सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानांमध्ये दरवर्षी लाखो हेअर स्ट्रेटिनग क्रीम्स आणि हेअर आयर्न्‍स विकल्या जातात. पण या उत्पादनांच्या अतिवापरामुळे केसांना हानी पोहोचते. त्यामुळे मुली केसांना हानी पोहोचू न देता नियमितपणे वापरता येतील आणि स्पा केलेल्या केसांचा चेहरामोहरा आणि स्वरूप मिळेल अशा हेअर केयर उत्पादनांच्या शोधात असतात.
सनसिल्कने सादर केला आहे आपला नवा ‘सनसिल्क पर्फेक्ट स्ट्रेट’. हे निर्माण केले गेले आहे सरळ केसांचे लोकप्रिय तज्ज्ञ युको यामाशितांच्या साहाय्याने. अजिबात गुंता न होणाऱ्या सरळ केसांची इच्छा बाळगणाऱ्या मुलींसाठी ‘सनसिल्क पर्फेक्ट स्ट्रेट’ हे आदर्श उत्पादन आहे. यातील शाम्पू आणि कंडिशनरमधील स्ट्रेट लॉक टेक्नॉलॉजीने तुमच्या केसांत आमूलाग्र बदल घडून येतो. ‘सनसिल्क पर्फेक्ट स्ट्रेट’ शाम्पू आणि कंडिशनर नियमित तत्त्वावर वापरल्याने तुमचे केस तब्बल २४ तास सरळ राहू शकतील. या क्रांतिकारक उत्पादनामुळे अजिबात गुंता न होणाऱ्या सरळ केसांचे स्वप्न बाळगणाऱ्या लाखो भारतीय मुलींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यासारखे झाले आहे.

Story img Loader