दसरा-दिवाळीच्या आधीपासून वेध लागतात परीक्षांचे. प्रत्यक्ष परीक्षेचा काळ म्हणजे एक महायुद्धच वाटतं अनेकांना. सध्याची स्क्रीन जनरेशन परीक्षेचा अभ्यासही मोबाइलवरून करतेय. फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर परीक्षेपुरते नवीन ग्रुप बनताहेत आणि नोट्स एक्सचेंज होताहेत.
‘व्हॉट्स अप डूड? कसली चर्चा चाललीय? अरे, टाइम टेबल लागलंय आपलं. पुढच्या सोमवारपासून परीक्षा सुरू होतेय माहितीय ना?’
‘आयच्या गावात! गेलो ना मी बाराच्या भावात! दोन आठवडय़ांत कशाचा अभ्यास होणार आहे? माझ्याकडे नोट्स नाहीत, पुस्तकं नाहीत..’
‘अरे, चिल् मार यार! आम्ही पण नोट्सच गोळा करतोय. थोडय़ांची झेरॉक्स मार, बाकी मॅडमनी दिलेल्या नोट्स मी तुला फॉरवर्ड केल्यासुद्धा! बघ मिळाल्यात का ते!’
पुढच्या क्षणाला चिनूच्या मोबाइलमध्ये प्रत्येक टॉपिकच्या सगळ्या नोट्स हजर होत्या. उसासा टाकून अखेर तो कट्टय़ावर टेकला. कालपर्यंत ऑस्करला गेलेल्या सिनेमांची चर्चा करणारा कट्टा आज संविधानातला कोणता भाग, किती मार्काला येणार याची चर्चा करत होता. चिनूसुद्धा नोट्स मिळाल्या म्हणून खूश होता. प्रत्येक दुकानात जाऊन अमुक-अमुक पुस्तक आहे का, हे विचारण्याचे कष्ट वाचणार होते. दुकानदाराचे नकार पचवणं खरंच कठीण जातं. त्यात लायब्ररीत पुस्तकं आधीच इश्यू झालेली असतात. अशा वेळी नोट्स मोबाइलमध्ये मिळणं म्हणजे स्वर्गसुख! त्यात कोणाच्या रिनग नोट्सचे आणि फळ्यावरच्या आकृत्यांचे फोटो मिळाले तर सोने पे सुहागा!
पूर्वी मोबाइलकडे पाहिल्यावर आमच्या मातोश्री सतत म्हणायच्या..‘आग लाव त्या मोबाइलला! कधीचा चिकटलायस त्याला!’ तेव्हा निमूटपणे मोबाइल बाजूला ठेवलाही जायचा. पण आता समजावता येतं की, ‘अगं आई, मोबाइलला आग लावली तर अभ्यास कसा होणार?’ आज आपण प्ले स्टोरवर गेलो तर प्राणी-वनस्पतींच्या वैज्ञानिक नामांपासून पुलंचे किस्से आणि कुसुमाग्रजांच्या कविताही सापडतात. शोधला तर देवही सापडतो असं म्हणतात. इथे तर अखंड दासबोध मिळाला. तसंच मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांची
आता याला कॉपीची परंपरा अपवाद कशी राहील? हातावर, रायटिंग पॅडवर उत्तरं लिहून जायचा जमाना गेला. कॉपीबहाद्दर धाडसी प्रयोगशील जवान वर्गात फक्त पेन, पेन्सिल, पट्टी आणि मोबाइल घेऊन शिरतात. प्रयोगशील यासाठी म्हटलं की, असतंच ना तिथे गुगल आणि विकिपीडिया. फक्त एका क्लिकसाठी काय काय प्रयोग करावे लागतील सांगता येत नाही! हे कॉपीबहाद्दर धाडसी यासाठी, कारण कागद सापडला आणि तो जप्त झाला तरी हरकत नाही, पण महागडा मोबाइल जप्त झाला तर झाली ना जिंदगी बरबाद!
परीक्षा जवळ आल्या की कॉलेजचं जग असं संपूर्ण ऑनलाइन होऊन जातं. अभ्यासमय पण तरीही ऑनलाइन. एकेकाचे ‘स्टेट्स’ हा एक स्वतंत्र चच्रेचा विषय आहे. ‘डू नॉट डिस्टर्ब’ असं स्टेट्स व्हॉट्स अॅपवर टाकून ती मंडळी दिवसभर ऑनलाइन राहून जगाला डिस्टर्ब करत असते. कोणी म्हणतं, ‘पढाई-लिखाई सब मोहमाया है’; तर कोणी लिहितं, ‘अमुक अमुक विषयाच्या नोट्स पाठवा’.. ग्रुप चॅटची नावंसुद्धा बदलली जातात. ‘डोक्याला शॉट लागलाये’, ‘अभ्यासाला लागा रे’, ‘अपनी तो लग गयी’ असं बरंच काही व्हॉट्स अॅपवरच्या ग्रुप चॅटवरच्या नावातूनच व्यक्त व्हायला लागतं. बाकी कशाला वेळ नाही, पण फेसबुक आणि ट्विटरवरचे प्रोफाइल पिक् मात्र बदलतात. प्रोफाइल पिक्चर्समध्ये- पुस्तकाच्या पुढय़ात वैतागून डोकं धरून बसलेली मंडळी दिसतात. अशी गंभीर प्रोफाइल पिक् एकदम फेमस होतात. त्याला मॅक्झिमम लाइक्स मिळतात. पण असे बदल केले नाहीत तर अभ्यासाचा सीरियसनेससुद्धा जाणवत नाही. एकदा हे वातावरण गंभीर झालं की निमूटपणे लागले सगळे अभ्यासाला..
तर थोडक्यात सांगायचं झालं तर अशी ही आपली ‘स्क्रीन जनरेशन’ परीक्षेतसुद्धा स्क्रीनसमोर येऊन बसते. ‘क्लिकची दुनिया’ आता अभ्यासालाही सामावून घेत आहे. गप्पा, गोष्टी, मस्ती यांच्याही पुढे जाऊन परीक्षेचा अभ्यास मोबाइल स्क्रीनआडून सुरू आहे.
तेव्हा पालक मंडळी, आमच्या पुढय़ात स्क्रीन दिसली की, आम्ही इतका वेळ काय करतो याचे आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण निदान परीक्षांच्या दिवसांत ही स्क्रीन केवळ अभ्यासावरच भरभरून बोलते. एक प्रकारचं स्टडी नेटवर्कच म्हणा ना!
कॉलेजमधली पोरं म्हटली की, वात्रटपणा, िधगाणा, वेग हे आलंच. पण या वेगाला मध्येमध्ये परीक्षांचे स्पीड ब्रेकर येतातच. तसा एक स्पीड ब्रेकर आत्ता समोर दिसायला लागलाय. नुसतं कट्टय़ावर विषय जरी काढला तरी लगेच विषय बदलतात. जसजशी परीक्षा जवळ येते तसतशी पोरं कट्टय़ावर कमी आणि लायब्ररीत जास्त दिसतात. मग होते नोट्सची जमवाजमव. रट्टा मारण्याचे वेगवेगळे प्रयोग. मग कुणी सकाळी उठून अभ्यास, तर कधी रात्रीची जागरणं. फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर नवीन परीक्षेपुरते नवीन ग्रुप बनतात आणि गप्पाही फक्त पोर्शन आणि अभ्यासाच्या होतात.
परीक्षा जवळ आल्यात याचं अजून एक लक्षण म्हणजे झेरॉसवाल्याकडे होणारी गर्दी. प्रत्यक्ष परीक्षेचा काळ म्हणजे एक महायुद्ध. क्रेडिट सिस्टीममुळे लुटूपुटूच्या लढाया आणि अंतिम महायुद्ध यातलं अंतर कमी झालंय इतकंच. आता या लुटूपुटूच्या लढायांनाही तितकंच महत्त्व आलंय. या युद्धाच्या तयारीला आता स्क्रीन जनरेशन मोबाइल, इंटरनेट, गुगल आदी आयुधं सरसावून तयार आहे, हे मात्र खरं!
परीक्षेचं युद्ध अन् मोबाइलचं आयुध
दसरा-दिवाळीच्या आधीपासून वेध लागतात परीक्षांचे. प्रत्यक्ष परीक्षेचा काळ म्हणजे एक महायुद्धच वाटतं अनेकांना. सध्याची स्क्रीन जनरेशन परीक्षेचा अभ्यासही मोबाइलवरून करतेय.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-10-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students doing exam study on mobile apps and social sites