नवरात्रीला दांडियाला जाताना घागराचोली हवीच, पण ती नंतर फारशी वापरली जात नाही. आधीच असे ड्रेस महाग. त्यात एखादा हौस म्हणून घेतलाच तरी नऊ दिवस तोच कसा घालणार? बाकी ऑप्शन्स हवेतच ना. हेच ऑप्शन्स द्यायचा हा प्रयत्न. यंदाच्या नवरात्रीत घागराचोलीला जरा हटके आणि तुमच्या बजेटमध्ये बसतील अशा काही ड्रेसेसवर एक नजर.
नवरात्रीचे नऊ दिवस दांडिया आणि गरबा खेळायचा म्हटला म्हणजे ड्रेसकोड प्रॉपर असला पाहिजे. घागराचोली किंवा चनियाचोलीला मग या दिवसांत जोरदार मागणी असते. पण मिररवर्क केलेली नवरात्रीतली ही घागराचोली आपण परत वर्षभर कोणत्याही समारंभात घालू शकत नाही आणि त्याचं बजेटसुद्धा जास्त असल्यामुळे नऊ दिवसांसाठी नऊ घागराचोली तर सोडाच पण एक घागराचोली पण विकत घ्यायची म्हणजे महिना दोन महिन्यांच्या पॉकेटमनीवर पाणी सोडावे लागते. बरं हे सगळं माहीत असूनही एखादी घागराचोली हौस म्हणून घेतलीच तरी ती नऊ दिवस कशी घालणार? बाकी ऑप्शन हवेतच ना. हेच ऑप्शन या लेखामधून द्यायचा प्रयत्न. यंदाच्या नवरात्रीत घागराचोलीला जरा हटके आणि तुमच्या बजेटमध्ये बसतील अशा काही ड्रेसवर एक नजर.
नवरात्रीत अॅक्सेसरिज्चा रोल महत्त्वाचा असतो. एखाद्या दिवशी जर तुमचा ड्रेस सिम्पल असला तर अॅक्सेसरिज वेळ मारून नेतात. त्यामुळे अॅन्टिक कडे, बांगडय़ा, हेवी नेकलेस, अंगठय़ा, मोजडी याचं कलेक्शन तुमच्याकडे असायलाच हवं. त्याचबरोबर रंगीबेरंगी दुपट्टे या वेळी तुमच्या कामी येतात.
तुम्हीसुद्धा तुमची शक्कल लावून काही भन्नाट आयडियाज् लावून एक हटके लूक नवरात्रीसाठी करू शकता.
साडी घागरा
घागराच असला तरी थोडा सोबर प्रकार आहे हा. कॉटनच्या साडी घागऱ्यावर चंदेरी किंवा सोनेरी रंगाची डिटेलिंग केल्यास नवरात्रीत तो उठून दिसेल. नवरात्रीबरोबरच नंतर येणाऱ्या लग्नसराईसाठीही हा प्रकार भाव खाऊन जाणारा आहे.
अनारकलीज्
अनारकली सूट्सना कधीच मरण नाही. प्रत्येक अडचणीला ते धावून येतात. अनारकली म्हणजे अस्सल भारतीय पेहराव. पण त्यालाही एक स्वतची नजाकत आहे. नवरात्रीतही लाँग अनारकलीबरोबर एम्ब्रॉयडर ओढणी घेतल्यास मस्त लूक तयार होईल किंवा शॉर्ट लेन्थचे एम्ब्रॉयडर अनारकलीज्सुद्धा एक चांगला ऑप्शन ठरतील.
धोती पॅन्ट आणि कुर्ता
धोती पॅन्ट्स नवरात्रीत एक ट्रेंडी ऑप्शन ठरते. जर तुम्ही फ्लेअर घागरा किंवा स्कर्टचे शौकीन नसाल आणि सिम्पल, सुटसुटीत ड्रेसला तुमची पसंती असेल तर या धोती पॅन्ट्स तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. एम्ब्रॉयडर कुर्तीबरोबर पिंट्रेड धोती पॅन्ट मस्त दिसते.
एम्ब्रॉयडर जॅकेट
एम्ब्रॉयडर जॅकेट नवरात्रीत हवंच. प्लेन कुर्ता किंवा लाँग अनारकलीचा लूक पूर्ण करायला एम्ब्रॉयडर जॅकेट मदत करत. ऑफिसमध्ये किंवा नवरात्रीच्या पेंडॉलमध्ये पूजेच्या वेळी सिम्पल पण फेस्टिव्हल लूक हे एम्ब्रॉयडरी जॅकेट तुम्हाला देते.
बोल्ड पिंट्रेड मॅक्सी ड्रेस
बोल्ड पिंट्रचा मॅक्सी ड्रेस नवरात्रीसाठी घागरा चोळीला एक चांगला पर्याय ठरू शकेल. असा ड्रेस इतर ऑकेजन्सनाही घातलेला चांगला दिसेल. फक्त नवरात्रीला अनुसरून याचा फ्लेअर किंवा घेर जितका जास्त तितका चांगला. बोल्ड नेकलेस किंवा मोठय़ा कडय़ाने तुमचा लूक तुम्ही पूर्ण करू शकता.
फ्लेअर स्कर्ट विथ लाँग कुर्ता
फ्लेअर स्कर्ट विथ लाँग कुर्ता सध्या ट्रेंडमध्ये आहेत. बोल्ड कलरचा किंवा हेवी एम्ब्रॉयडरीच्या स्कर्ट घेतला तर त्याने फेस्टिव्ह लूक येईल, त्याबरोबरच नंतरही तुम्ही तो वापरू शकता. अशा मोठय़ा घेरदार स्कर्टबरोबर तुम्ही दोन किंवा तीन वेगवेगळ्या लाँग कुर्तीज् घालू शकता.