रसिका शिंदे

‘चल, बॅग पॅक कर, आपण फिरायला जातोय..’, हे शब्द कानावर पडताच ऑफिसच्या व्यग्रतेतून कधी एकदा मोकळय़ा हवेत श्वास घेतोय असं प्रत्येकाला वाटतंच. करोनानंतर पुन्हा एकदा मनमुराद फिरायला मिळतं आहे त्याहून मोठं सुख काय असेल, हेदेखील वारंवार प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. तर अशी मनमुराद भटकंती करताना कपडेही त्या पद्धतीचे कम्फर्टेबल आणि स्टायलिश हवेत..

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

जसा कपडय़ांचा फॅशनचा ट्रेण्ड ठरावीक वेळेनुसार बदलत असतो तसंच भटकंतीचेही आपले आपले काही ट्रेण्ड्स असतात. म्हणजे अमुक महिन्यात बॅगपॅकिंग, तर पावसाळय़ाच्या आसपास ट्रेकिंग, थंडी पडली की पुन्हा ट्रेकिंगपासून दूर देशाच्या भटकंतीपर्यंतचे असे ट्रेण्ड्स येत-जात असतात. सध्या फेब्रुवारी हा थोडी माघाची थंडी मिरवणारा असला तरी आता उन्हाच्या झळाही काहीशा जाणवू लागल्या आहेत. या वातावरणात तरुण मित्र मंडळी गोवा, कोकण, कर्नाटकातील गोकर्ण किंवा मग हिवाळय़ातील नाइट ट्रेक्सला जाताना दिसतात. आता ज्याप्रमाणे आपण फिरायला जायचं ठिकाण ठरवतो त्याप्रमाणेच ट्रॅव्हल फ्रेंडली कपडेही ठरवणं तितकंच महत्त्वाचं असतं.

आता ट्रॅव्हल फ्रेंडली कपडे म्हणजे काय? तर ज्या कपडय़ांमध्ये ट्रेन, बसने प्रवास करताना किंवा ट्रेकिंग करताना कम्फर्टेबल वाटतात असे कपडे परिधान करणं. आता तरुण मंडळी म्हटलं की जरा व्हिटॅमिन एम अर्थात कमीत कमी पैशांमध्ये प्रवास करून जास्तीत जास्त आठवणींची पुंजी जमा करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ट्रेन किंवा बसने प्रवास करण्याला ही मंडळी जास्त पसंती देतात. तर प्रवासात शक्यतो ट्रॅक पॅन्ट आणि पूर्ण बाह्यांचे टी-शर्ट वा टॉप घालावेत. याचं प्रमुख कारण असं की, थोडीशी ढगळ ट्रॅक पॅण्ट घातल्यामुळे शरीराची हालचाल करण्यास फार सोप्पे जाते आणि पूर्ण बाह्यांच्या टी-शर्टमुळे डास अथवा कोणत्याही कीटकांच्या डसण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शिवाय, प्रवासात थंडीपासूनही बचाव होतो. या कपडय़ांची निवड केल्यानंतर शक्यतो काळा, चॉकलेटी, गडद राखाडी अशा रंगाच्या कपडय़ांची निवड करावी, जेणेकरून ट्रेन, बसच्या प्रवासामुळे कपडे मळले तरी ते दिसून येत नाही. याशिवाय तरुणींनाही पलाझो पॅण्ट आणि त्यावर पूर्ण बाह्यांचे क्रॉप टॉप्स हाही एक उत्तम पर्याय आहे. तसंच प्रवास करताना मोबाइल, पोर्टेबल चार्जर, किरकोळ रक्कम, प्रवासाचे तिकीट, सॅनिटायझर इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी जवळ ठेवण्यासाठी तुम्ही बेल्ट बॅग किंवा वेस्ट बॅग लावू शकता. ज्याने तुमचा ट्रॅव्हल लुकदेखील उठून दिसेल.

प्रवासाला जाताना शक्यतो कमीत कमी कपडे घेऊन जावेत. यात प्रामुख्याने कॉटन, पॉलिस्टर, नायलॉन आणि सिल्क फॅब्रिकच्या कपडय़ांचा समावेश असावा. पॉलिस्टर आणि नायलॉनच्या कपडय़ांच्या घडय़ा या फार लहान होतात. त्यामुळे बॅगेत इतर वस्तूंनाही जागा मिळते. याशिवाय, या कपडय़ांना इस्त्री करण्याचीही गरज लागत नाही. म्हणजे समजा भटकंतीचं ठिकाण गोवा असेल तर अर्थात समुद्रकिनाऱ्याची सफर मस्ट आहे. अशा वेळी नायलॉनची पॅण्ट आणि टी-शर्ट घालावेत. ते पाण्यात भिजल्यावर लगेचच सुकतात. यानंतर जर तुम्ही गोव्यात चर्च वा अन्य ठिकाणी भटकंती करणार असाल तर सिल्कचे वनपीस हा उत्तम पर्याय आहे. हे वनपीस लाइट वेट असतात आणि तो परिधान केल्यावर वेस्टर्न लुकदेखील चांगला येतो.

तरुणाई अलीकडे ट्रेकिंगला जाण्यासाठीही फार उत्सुक असल्याचे दिसून येते. हिवाळय़ात शक्यतो नाइट ट्रेक जास्त केले जातात. यात हरिश्चंद्र गड, कळसूबाई, संदन व्हॅली अशा महाराष्ट्रातील ठरावीक गड-किल्ल्यांवर नाइट ट्रेकसाठी तरुणाई जाते. नाइट ट्रेक करताना पॉलिस्टरच्या ट्रेकिंग पॅण्ट घालाव्यात आणि त्यावर शक्यतो पूर्ण बाह्यांचे टी-शर्ट घालावेत. तसेच, जास्तीत जास्त खिसे असणारी पॅण्ट ट्रेक करताना घालावी, जेणेकरून रात्रीचा ट्रेक करत असताना आवश्यक गोष्टी तुमच्याजवळ राहू शकतील. याव्यतिरिक्त स्लीम फिट गडद रंगांच्या पॅण्ट्स त्यावर कोणत्याही रंगाचे क्रॉप टॉप आणि त्यावर लेदर, पफर किंवा वुलन जॅकेट घालावे. याशिवाय ट्रेल, चिनो, एअरलाइन अशा विविध प्रकारच्या पॅण्ट्स घालू शकता आणि त्यावर बंद गळय़ाचे टॉप्स, लूझ टॉप्स किंवा हुडीज पण घालू शकता. हे ट्रॅव्हल फ्रेंडली कपडे परिधान केल्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल लुकही साधता येतो आणि वर म्हटल्याप्रमाणे व्हिटॅमिन एमची मात्राही कमी खर्चीक असते. त्याबदल्यात मिळणारा आनंद मात्र डोंगराएवढा मोठा असतो.

Story img Loader