बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे आपल्यातही बदल करणं हे स्वागतार्ह आहे. ऋतू येताना त्याच्याबरोबर अनेक गोष्टी घेऊन येतो. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फॅशन. फॅशनच्या बाबतीत सजग राहताना मुख्य गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपण काळाबरोबर फॅशनचे बदल लक्षात घ्यायला हवेत. काळाबरोबर आपण बदललो तरच आपण फॅशनच्या बाबतीत अपडेट आहोत असं म्हटलं जाईल. नाही तर आउटडेटेड असा शिक्का आपल्यावर बसेल. म्हणूनच ऋतू आणि त्या अनुषंगाने फॅशनची सांगड घालणं गरजेचं आहे.
उन्हाळ्यात ठंडा ठंडा कुल कुल वाटण्यासाठी आइस्क्रीम, शीतपेये घेण्याबरोबर आपल्या कपडय़ातही बदल करावे लागतात. काही कपडे हे मल्टिपर्पज असतात जसे की स्कार्फ. हे थंडीत वाऱ्यापासून संरक्षणासाठी वापरतात, तर उन्हाळ्यात ऊन लागू नये यासाठी. गॉगलचा उपयोग हा उन्हाळ्यात अधिक. फक्त तरुण मुले-मुलीच नाही, तर आजकाल काका-काकूसुद्धा गॉगल सर्रास वापरताना दिसतात. हॅण्ड ग्लोव्हज् म्हटले की आपल्यासमोर बर्फाळ प्रदेशच डोळ्यासमोर येतो. पण हे मऊ कापडाचे असलेले हॅण्ड ग्लोव्हज् उन्हाळ्यात टॅन (रापणे) होऊ नये यासाठीही वापरतात. सनकोट हा उन्हाळ्यातच वापरतात. विशेष करून बाइकवरून जाताना याचा वापर होतो. कपडय़ाच्या बाबतीत सांगायचं तर कॉटनचे किंवा मलमलचे कपडे जास्त वापरतात.
नेमेचि येतो मग उन्हाळा.. असं दरवेळी म्हटलं जातं. तस्साच ‘ऊन ऊन, ऊन ऊन, उकाडा इरूनफिरून..’ असला फिल देणारा उन्हाळा येऊन ठेपलायसुद्धा! तो आल्यावर आपला वॉर्डरोब बदलायला हवा, हे समीकरण घामाच्या धारा सप्रमाण सिद्घ करून जातात. मग सुरू होते आपली फिरस्ती शॉिपगसाठी!  हे शॉिपग करताना आवडता ड्रेस घेऊन टाक, असा वेडेपणा करू नका. थोडासा फॅशन सेन्स नि उन्हाळ्याचाही विचार करा. तुमच्यासमोर ऑप्शन्स चिक्कार आहेत.
उन्हाळा आणि कॉटनचं नातं हे फार पूर्वीपासूनचं आहे. उन्हाळा सुरू झाल्यावर वॉर्डरोबमधील कॉटनचे कपडे खऱ्या अर्थाने बाहेर येऊ लागतात. एरवी आपल्याला इस्त्री करण्याचा त्रास आणि इतर अनेक कारणांनी कॉटनचे कपडे अगदी आतमधल्या खणात गेलेले असताना उन्हाळा आल्यावर मात्र खऱ्या अर्थाने या कपडय़ांची गरज भासू लागते. तिथेच मग कॉटनच्या वैविध्यपूर्ण ड्रेसेसचा शोध सुरू होतो. पण कॉटन म्हटल्यावर त्यात काय व्हरायटी असणार असा प्रश्न पडतो.
कॉटनची दुनिया ही मनमोहक आणि रंगीबेरंगी आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कॉटनच्या रंगीबेरंगी दुनियेची सैर करायची असल्यास डोळ्यावरचा गॉगल उतरवूनच या दुनियेची सैर करायली हवी; तरच आपल्याला या मनमोहक कॉटनच्या कपडय़ांमधून आपण हवे तसे कपडे बनवू शकू.
पेस्टल शेडस्च्या जोडीला कॉटनमध्ये आपल्याला गडद रंग दिसून येतील. हे गडद रंगही स्टाइल स्टेटमेंटचा भाग होऊ शकतात. रेड टॉपवर एखादा ब्लू दुपट्टा घेतल्यास त्या टॉपची शोभा अधिक वाढेल. कॉटन ट्राऊजर्स हा एक उत्तम पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे. टसर कॉटन त्याचबरोबर कलमकारी बॉर्डर हाही एक पर्याय उपलब्ध आहे.
 टसर कॉटनमध्येही अलीकडे खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे कॉटन इन स्टाइल आहे. खास करून उन्हाळ्यात तर कॉटनची गरज ही आपल्याला इतर ऋतूंच्या मानाने अधिक असते, म्हणूनच कॉटन कॉम्बिनेशन असलेलं मटेरिअल घेऊन ते शिवल्यास अधिक उत्तम.
एखाद्या गडद टॉपवर चुडीदार किंवा कॉटन जीन्स सूट होईल किंवा एखादा स्टोल घेतल्यास अधिक उत्तम. हा स्टोल बांधणीचा असेल तर प्लेन टॉपवर अधिक उठून दिसेल. फ्लोअरल प्रिंटचा टॉप असल्यास त्यावर एखादा ब्राइट रंग निवडुन त्या रंगाची ओढणी घेऊ शकतो. किंवा विदाऊट ओढणीही हा कुर्ता घालण्यास उत्तम. शॉर्ट टॉपवरही आपण मोठा दुपट्टा घेऊन आपल्या लूकमध्ये बदल करू शकतो. शॉर्ट टॉपवर बेस्ट ऑप्शन म्हणून पटियालाही उपलब्ध आहेत. पण पटियाला बारीक मुलींना अधिक शोभून दिसतात. प्लेन टॉप व प्रिंटेड पटियाला हे कॉम्बिनेशन अधिक उत्तम किंवा प्रिंटेड टॉप व प्लेन पटियालाही अधिक शोभून दिसेल. हा प्लेन पटियाला इतर टॉप्सबरोबरसुद्धा आपण मिक्स मॅच करू शकतो.  

स्कर्ट आणि टॉप-
बाजारात उपलब्ध असलेले स्लिव्हलेस टॉप आणि घेरदार स्कर्ट हे उत्तम कॉम्बिनेशन होऊ शकेल. यावर विविध प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीजही आपल्याला घालता येतील. पण उन्हाळ्यात अ‍ॅक्सेसरीजच्या पर्यायापेक्षा ड्रेसमध्येच काही नवीन करता येईल का हे पाहावे. म्हणजे गर्मीपासून आपला बचाव होईल.  
स्लिव्हलेस टॉप्स हा एकमेव बेस्ट पर्याय समर सीझनमध्ये आहे. पण स्लिव्हचे ड्रेस घेताना तुम्हाला साजेसे असे स्लिव्हस्चे पर्याय निवडावे. स्लिव्हज निवडताना स्लिव्हजला लेस किंवा टिकल्यांचे डिझाइन्स नसावेत जेणे करून तुम्ही कम्फर्टेबल फिल कराल.
कॉटनमध्ये स्लिव्हलेस टॉप्स उपलब्ध आहेत. यामध्ये कलर कॉम्बिनेशन थोडं हटके घ्यावं. म्हणजे थोडे ब्राइट शेडस् असतील तर त्याखाली एखादी जीन्स किंवा स्कर्ट अधिक उठून दिसेल. जीन्स निवडतानाही तिचे मटेरिअल कुठले आहे हे पाहूनच निवडावी. थोडी महाग असली तरी चालेल पण उन्हाळ्यात जीन्सची निवड करताना जपूनच करावी. कॉटन ट्राऊजर्समध्येही आपल्याला विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कॉटन ट्राऊजर्समध्ये शेड्सही बऱ्याच आहेत. त्यामुळे कॉटन ट्राऊजर्स हा एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. कॉटनची निवड करताना त्यामध्ये सिल्क कॉटन आणि टसर कॉटन यांचं मिक्सिंग असलेले मटेरिअल घेणं हे अधिक बेस्ट म्हणजे यामध्ये आपण विविध स्टाइलस्चा वापर करू शकतो. ही स्टाइल करताना मिक्स अ‍ॅण्ड मॅचचा पर्यायही आपल्यासाठी उपलब्ध आहे.
– उन्हाळ्यावर उतारा कॉटनचा.. असं हमखास म्हटलं जातं. त्यासाठी लाँग-शॉर्ट कुर्तीज, टॉप्स, शर्टस्, ट्राऊझर्स, केप्रीज, चुणीदार, पतियाळा, सलवार, दुपट्टे, टय़ुनिक्स, स्टोल्स, पॅण्टस्, स्कर्टस्, वनपीस, फ्लोइंग पायजमा असे नानाविध प्रकार घेता येतील.
– या वेअरमध्ये प्लेन, प्रिंटेड, बाटला वर्क, कलमकारी, लखनवी, एम्ब्रॉयडरी, चेक्स, फ्लोरल डिझाइन, पोल्का डॉटस् अशी व्हरायटी असेल.
– पांढऱ्या रंगाचे शर्टस् वापरणार असाल तर स्लोगनवाले टी शर्टस् आवर्जुन ट्राय करा. यामुळे एक वेगळा आणि सोबर गेटअप येतो.
– उन्हाळ्यात काळा रंग टाळून लाल, गुलाबी, केशरी, पिवळ्या अशा फिक्क्या शेडस्चे ड्रेस निवडा.
– थोडा हटके विचार करून प्राण्या-पक्ष्यांची डिझाइन्स किंवा भौमित्तिक आकारांची डिझाइन्स असलेलं फॅब्रिक निवडा म्हणजे फंकी लूकही मिळेल.  
– स्कर्ट किंवा जीन्सवरचा बेल्ट बारीक घ्या.
– कॉटनला पर्याय हवा असेल तर मिक्स कॉटन, कॉटन सिल्क, जर्सी, लिनन अशा मटेरियलमध्येही कुर्तीज, टॉप्स, टाइटस्, फॉर्मल वेअर उपलब्ध आहेत.
– ड्रेस सिलेक्ट झाल्यावर त्यावरच्या अ‍ॅक्सेसरीजही आल्याच. त्यासाठी फ्लॅट बेल्टच्या बॅग्ज, किटन हिल्सचे शूज, ज्यूटची हॅट, ब्रॅण्डेड गॉगल्स नक्की खरेदी करा.
– हे सारे ऑप्शन्स तुम्हाला फॅब इंडिया, खादी भांडार, कॉटन कॉटेज, कुलाबा कॉजवे, फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोड, हिल रोड, िहदमाता, स्वदेशी मार्केट, मंगलदास मार्केट, गांधी मार्केट, ठिकठिकाणची बुटिक्स आणि मॉलमधल्या ब्रॅण्डेड शॉप्समध्ये हमखास मिळतील.
एवढी सगळी खरेदी झाल्यावर नि ते ड्रेसेस वापरल्यावर तुम्हाला नक्कीच म्हणता येईल की, फिल कुल.. फिल गुड..
*  व्यक्तिमत्त्व, आपली मानसिकता आणि आपल्या शेपला साजेसा पेहराव करावा, असं म्हटलं जातं. ‘व्हॉटस् इन’ आणि ‘व्हॉटस् आऊट’ असं न म्हणता आणि फॅशन पंढरीपासून सुरू झालेल्या ट्रेण्ड्सचं आपल्यापर्यंत पोहोचलेलं व्हर्जन कितवं असेल, याचा विचार शॉपिंग करताना करायला हवा, असा सल्ला प्रसिद्ध फॅशन डिझायनर निशा जामवाल देतात. उन्हाळ्यातल्या फॅशनचा मंत्र कोणता आहे नि त्यात कसे ट्रेण्ड्स आहेत, याविषयी निशा यांनी काही टिप्स दिल्यात.
-कोणतेही नियम न पाळता ढेर साऱ्या ऑप्शन्समधून आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य आहे.  
-आपणच जणू नवा ट्रेण्ड सुरू करायचाय, असं मनाशी ठरवून टाका.
-या सीझनमध्ये गोल्ड, ऑरेंज, पिंक, सालोमन आणि नॅचरल कलर्स इन असतील.
-उन्हाच्या काहिलीपासून वाचण्यासाठी आपण पाणी वापरतो. त्याच अनुषंगानं समुद्राकडं पाहिल्यावर अनुभवास येणाऱ्या शांती नि नि:शब्दतेचा फिल आला तर.. हाच विचार ड्रेस डिझायिनग करताना प्रत्यक्षात येऊ शकतो. पिंट्र भरपूर कलाकुसर केलेलं, काहीसं अबस्ट्रॅक्ट नि विशिष्ट घाट असलेलं असेल. कधी खोल समुद्रातले स्टारफिश नि शेल्स तर कधी डिजिटल पिंट्र. कधी गुणगुणणारे पक्षी किंवा राजहंसही असू शकतील.
-आवड नि सवड असेल तर फॅब्रिक िपट्रवर लॅण्डस्केप किंवा जंगलाचा फिल येणारी डिजिटल पिक्चर्स वापरता येऊ शकतील.
-संध्याकाळच्या पार्टीसाठी मॅट सॅटिनचं फॅब्रिक असणारा क्लासिक टॉप नि त्यावर नी-लेन्थ स्कर्ट खुलून दिसेल.
-१९२० मध्ये लोकप्रिय झालेल्या ड्रॉपवेइस्टची फॅशन पुन्हा येतेय.
-पेपलमची (PEPLUM) फॅशनही परत येतेय. पेपलम म्हणजे एका स्कर्टवर दुसरा शॉर्ट स्कर्ट. त्यालाच जॅकेटही फिट केलेलं असतं.
-कायम फेव्हरेट असलेली इको फ्रेण्डली नि ऑरगॅनिक वेअरची फॅशन आहेच.

Story img Loader