बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे आपल्यातही बदल करणं हे स्वागतार्ह आहे. ऋतू येताना त्याच्याबरोबर अनेक गोष्टी घेऊन येतो. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फॅशन. फॅशनच्या बाबतीत सजग राहताना मुख्य गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपण काळाबरोबर फॅशनचे बदल लक्षात घ्यायला हवेत. काळाबरोबर आपण बदललो तरच आपण फॅशनच्या बाबतीत अपडेट आहोत असं म्हटलं जाईल. नाही तर आउटडेटेड असा शिक्का आपल्यावर बसेल. म्हणूनच ऋतू आणि त्या अनुषंगाने फॅशनची सांगड घालणं गरजेचं आहे.
उन्हाळ्यात ठंडा ठंडा कुल कुल वाटण्यासाठी आइस्क्रीम, शीतपेये घेण्याबरोबर आपल्या कपडय़ातही बदल करावे लागतात. काही कपडे हे मल्टिपर्पज असतात जसे की स्कार्फ. हे थंडीत वाऱ्यापासून संरक्षणासाठी वापरतात, तर उन्हाळ्यात ऊन लागू नये यासाठी. गॉगलचा उपयोग हा उन्हाळ्यात अधिक. फक्त तरुण मुले-मुलीच नाही, तर आजकाल काका-काकूसुद्धा गॉगल सर्रास वापरताना दिसतात. हॅण्ड ग्लोव्हज् म्हटले की आपल्यासमोर बर्फाळ प्रदेशच डोळ्यासमोर येतो. पण हे मऊ कापडाचे असलेले हॅण्ड ग्लोव्हज् उन्हाळ्यात टॅन (रापणे) होऊ नये यासाठीही वापरतात. सनकोट हा उन्हाळ्यातच वापरतात. विशेष करून बाइकवरून जाताना याचा वापर होतो. कपडय़ाच्या बाबतीत सांगायचं तर कॉटनचे किंवा मलमलचे कपडे जास्त वापरतात.
नेमेचि येतो मग उन्हाळा.. असं दरवेळी म्हटलं जातं. तस्साच ‘ऊन ऊन, ऊन ऊन, उकाडा इरूनफिरून..’ असला फिल देणारा उन्हाळा येऊन ठेपलायसुद्धा! तो आल्यावर आपला वॉर्डरोब बदलायला हवा, हे समीकरण घामाच्या धारा सप्रमाण सिद्घ करून जातात. मग सुरू होते आपली फिरस्ती शॉिपगसाठी! हे शॉिपग करताना आवडता ड्रेस घेऊन टाक, असा वेडेपणा करू नका. थोडासा फॅशन सेन्स नि उन्हाळ्याचाही विचार करा. तुमच्यासमोर ऑप्शन्स चिक्कार आहेत.
उन्हाळा आणि कॉटनचं नातं हे फार पूर्वीपासूनचं आहे. उन्हाळा सुरू झाल्यावर वॉर्डरोबमधील कॉटनचे कपडे खऱ्या अर्थाने बाहेर येऊ लागतात. एरवी आपल्याला इस्त्री करण्याचा त्रास आणि इतर अनेक कारणांनी कॉटनचे कपडे अगदी आतमधल्या खणात गेलेले असताना उन्हाळा आल्यावर मात्र खऱ्या अर्थाने या कपडय़ांची गरज भासू लागते. तिथेच मग कॉटनच्या वैविध्यपूर्ण ड्रेसेसचा शोध सुरू होतो. पण कॉटन म्हटल्यावर त्यात काय व्हरायटी असणार असा प्रश्न पडतो.
कॉटनची दुनिया ही मनमोहक आणि रंगीबेरंगी आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कॉटनच्या रंगीबेरंगी दुनियेची सैर करायची असल्यास डोळ्यावरचा गॉगल उतरवूनच या दुनियेची सैर करायली हवी; तरच आपल्याला या मनमोहक कॉटनच्या कपडय़ांमधून आपण हवे तसे कपडे बनवू शकू.
पेस्टल शेडस्च्या जोडीला कॉटनमध्ये आपल्याला गडद रंग दिसून येतील. हे गडद रंगही स्टाइल स्टेटमेंटचा भाग होऊ शकतात. रेड टॉपवर एखादा ब्लू दुपट्टा घेतल्यास त्या टॉपची शोभा अधिक वाढेल. कॉटन ट्राऊजर्स हा एक उत्तम पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे. टसर कॉटन त्याचबरोबर कलमकारी बॉर्डर हाही एक पर्याय उपलब्ध आहे.
टसर कॉटनमध्येही अलीकडे खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे कॉटन इन स्टाइल आहे. खास करून उन्हाळ्यात तर कॉटनची गरज ही आपल्याला इतर ऋतूंच्या मानाने अधिक असते, म्हणूनच कॉटन कॉम्बिनेशन असलेलं मटेरिअल घेऊन ते शिवल्यास अधिक उत्तम.
एखाद्या गडद टॉपवर चुडीदार किंवा कॉटन जीन्स सूट होईल किंवा एखादा स्टोल घेतल्यास अधिक उत्तम. हा स्टोल बांधणीचा असेल तर प्लेन टॉपवर अधिक उठून दिसेल. फ्लोअरल प्रिंटचा टॉप असल्यास त्यावर एखादा ब्राइट रंग निवडुन त्या रंगाची ओढणी घेऊ शकतो. किंवा विदाऊट ओढणीही हा कुर्ता घालण्यास उत्तम. शॉर्ट टॉपवरही आपण मोठा दुपट्टा घेऊन आपल्या लूकमध्ये बदल करू शकतो. शॉर्ट टॉपवर बेस्ट ऑप्शन म्हणून पटियालाही उपलब्ध आहेत. पण पटियाला बारीक मुलींना अधिक शोभून दिसतात. प्लेन टॉप व प्रिंटेड पटियाला हे कॉम्बिनेशन अधिक उत्तम किंवा प्रिंटेड टॉप व प्लेन पटियालाही अधिक शोभून दिसेल. हा प्लेन पटियाला इतर टॉप्सबरोबरसुद्धा आपण मिक्स मॅच करू शकतो.
समर फॅशन
बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे आपल्यातही बदल करणं हे स्वागतार्ह आहे. ऋतू येताना त्याच्याबरोबर अनेक गोष्टी घेऊन येतो. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे फॅशन. फॅशनच्या बाबतीत सजग राहताना मुख्य गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपण काळाबरोबर फॅशनचे बदल लक्षात घ्यायला हवेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-05-2013 at 12:57 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Summer fashion