उन्हाळ्यातला दिवस उजाडतो.. सूर्याची किरणं हळूहळू उन्हाच्या झळा वाढणार असा जणू एसएमएसच आपल्यापर्यंत पोहचवत असतात. हा एसएमएस मिळाला की आपण थोडे आळसावतोच.. उन्हाळा सहन करण्याच्या कल्पनेनं आपला जीव कासाविस होऊ लागतो. त्यातच मुलांना सुट्ट्या लागून ती घरीच राहणार असतात. मग आपल्याला भरदिवसा सुट्टीची स्वप्नं पडू लागतात. पण ते अशक्य असतं नि जीवाचे लाड करायला जास्त वेळही नसतो, रुटिन वर्क केव्हाचं आपली वाट बघत असतं. तिकडं वळावंच लागतं. आपली हेक्टिक लाईफस्टाईल या उन्हाळी मोसमात थोडी कुल कशी करता येईल, ते आपण पाहूया.
 सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी वेळ काढाच.
उन्हाळ्यात योग्य प्रमाणात पाणी प्यावं. म्हणून घराबाहेर पडतानाही पाण्याची बॉटल सोबत ठेवा. त्यात इलेक्ट्रॉल-ग्लुकोज पावडर घालता येईल.
 शक्यतो थोड्या थोड्या वेळानं हेल्दी फूड खा.
 उन्हाळ्यातले दिवस मोठे असतात, हे लक्षात घेऊन आपल्या सुट्टीचं किंवा इतर कामांचं प्लॅनिंग करा, म्हणजे दिवस कंटाळवाणा वाटणार नाही.
 कामासाठी घराबाहेर पडण्याव्यतिरिक्त आउटडोअर अँक्टिव्हिटीजसाठी सहकुटुंब बाहेर पडा. उदा. हाईकिंग, नेचर वॉक, मुलांसोबत बागेत खेळणं, स्विमिंग, सायकिलग इत्यादी. यामुळं फक्त व्यायामच होणार नाही, तर एकमेकांतलं बॉण्डिंग वाढेल.
मुलांना नेहरू विज्ञान केंद्र, प्राणिसंग्रहालय, वस्तूसंग्रहालय, आर्ट गॅलरीजमध्ये न्या.
मुलांची वाचनाची आवड लागण्यासाठी लायब्ररीचं महत्त्व सांगा नि ती जॉईन करा.
सगळ्यांनी मिळून क्रिकेट, बॅटिमटन, पत्ते, कॅरम खेळा.
एकटेच वेगवेगळ्या रस्त्यांनी लॉंग ड्राइव्हला जा.
मित्रमत्रिणींसोबत फक्त हॉटेलिंग करण्यापेक्षा मरीन ड्राईव्ह, नॅशनल पार्क आदी ठिकाणी मनसोक्त फिरा. 
एखादी वन डे पिकनिक अरेंज करा.
सतत उन्हात राहणं टाळा.
ऐन उन्हात बाहेर पडताना काळजी म्हणून न विसरता सनकोट, टोपी-स्कार्फ आणि सनग्लासेस लावा.
चहा-कॉफीऐवजी स्ट्रॉबेरी, द्राक्षं, किलगड, संत्र, मोसंबं अशा रसाळ फळांचा ज्यूस घ्या.
उन्हातून आल्यावर कोिल्ड्रक्सऐवजी गूळपाणी, नारळपाणी, उसाचा रस, ताक, लस्सी, पन्हं, आवळा, कोकम, लिंबू सरबत प्या.
रोजच्या झणझणीत-मसालेदार स्वयंपाकाऐवजी पचायला हलके, आंबट-गोड चवीचे आणि पौष्टिक पदार्थ करा.
संध्याकाळी घरी आल्यावर कामाचा स्ट्रेस घालवण्यासाठी थोडं बागकाम करा. किंवा  आवारातल्या लॉनवर अनवाणी चाला.
रात्री घराच्या गच्चीवर जाऊन आकाशातले ग्रह-तारे ओळखायचा प्रयत्न करा
घरीच राहिलात तरी मेसेज-चॅटिंगपासून लांब राहून घरातल्या सगळ्यांशी भरपेट गप्पा मारा.
दिवसभर एवढ्या सगळ्या अँक्टिव्हिटीज केल्यावर निवांत झोप मिळणं मस्ट आहे. त्यासाठी टीव्ही, लॅपटॉप वगरे लवकर बंद करून गारेगार वारा खात पटकन झोपून जा.
इतकी सर्व काळजी घेतल्यावर उन्हाळ्याचा मोसम कुलऽऽऽ नाही वाटला, तरच नवल! नाही का ?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा