शब्दांकन : राधिका कुंटे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माझ्या करिअर निवडीचा पाया कसा रचला गेला, त्याविषयी काही गोष्टी या सदराच्या निमित्ताने विचार करताना जाणवल्या. माझे आजोबा डॉक्टर आहेत. त्यांना लहानपणापासून फॉलो करत आलो आहे, त्यामुळे मला वैद्यकीय क्षेत्रात यायचं होतं; पण नंतर विचार करता वाटलं की, वैद्यकीय पदवी मिळून स्थिरावयाला तुलनेने अधिक वेळ लागतो. मग इंजिनीअरिंगचा पर्याय निवडला. तेव्हा जाणवायला लागलं की, तंत्रज्ञानात बदल होऊन सुधारणा होतील तसं उपचारांदरम्यान किंवा शस्त्रक्रिया करताना शरीराच्या आत खोलवर जाऊन तपासण्या किंवा शस्त्रक्रिया करण्यापेक्षा, त्यातील इन्फेक्शनसारखे धोके लक्षात घेऊन काही उपकरणांच्या साहाय्याने शरीराशी कमीत कमी संपर्क साधून हे धोके टाळता येतील, यासाठी काही प्रयत्न करता येऊ शकतात. त्यामुळे या प्रकारची उपकरणं तयार करताना इंजिनीअरिंग आणि बायोलॉजी या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधता येणं शक्य आहे, हे जाणवलं. शिवाय, आजोबांसोबत चर्चा करताना हा मुद्दा असायचाच, त्यामुळे तेही कुठे तरी डोक्यात होतंच.
बंगलोरमध्ये ‘सत्त्वा मेडटेक’ या स्टार्टअपमध्ये नॉन-इन्व्हेजिव्ह (non- invasive) तंत्रज्ञानाचा समावेश असणारी वैद्यकीय उपकरणं तयार करतात. अद्याप भारतात आणि एकुणात जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात या विषयाबद्दल बऱ्यापैकी उदासीनता दिसते आहे. योगायोगाने इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांत असताना मला सत्त्वामध्ये इंटर्नशिप करायला मिळाली. गर्भारपणात बाळाच्या हृदयाचे ठोके या वायरलेस तंत्राच्या साहाय्याने मोजू शकतो. InnAccel च्या ‘फेटल हार्ट रेट मॉनिटर’ (FHR) या प्रकल्पांतर्गत आधी प्रशिक्षण आणि नंतर क्लिनिकल ट्रायल असं तीन महिने काम करायला मिळालं. त्यानंतर ही गोष्ट म्हणजे फक्त कल्पना, विचार, आवड नाही, तर त्यावर प्रत्यक्षात काम करता येऊ शकतं हे व्यवस्थित लक्षात आलं.
पुण्यात ‘एमआयटीसीओई’मध्ये मी ‘इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन’चा अभ्यासक्रम शिकत होतो. आम्हाला उन्हाळी सुट्टीत काम करायला प्रोत्साहन दिलं जायचं. अभ्यास महत्त्वाचा तसा आणि तितकाच प्रत्यक्ष अनुभवही महत्त्वाचा. विशेषत: पुढे परदेशी शिक्षण आणि करिअरसाठी अनुभवाला प्राधान्य दिलं जातं. अशा वेळी इंटर्नशिपमधली अनुभवाची शिदोरी उपयोगी ठरते. चार वर्षांच्या इंजिनीअरिंगमध्ये कमीत कमी दोन इंटर्नशिप करणं अपेक्षित असतं. या कामाच्या अनुभवानंतर आपल्याला काय आवडत आहे, हे अधिक चांगल्या प्रकारे कळू शकतं. पदव्युत्तर शिक्षणासाठी, विशेषत: संशोधन क्षेत्रात आपल्याकडे अर्थसाहाय्य आणि तुलनेने चांगल्या संसाधनांची कमतरता या गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. परदेशात चांगल्या प्रकारे संशोधनाला कायम प्रोत्साहन दिलं जातं आणि चांगल्या संसाधनांची उपलब्धता असते. माझ्या प्रत्येक निर्णयात मला कायम घरच्यांचं प्रोत्साहन नि पािठबा मिळाला आणि मिळतो आहे.
इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांच्या मध्यावर मी परदेशातील विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती काढणं सुरू केलं होतं. चौथ्या वर्षांच्या सुरुवातीला तीन ठिकाणी अर्ज पाठवले होते. पदवी मिळण्यापूर्वी माझा अर्ज दोन ठिकाणी मंजूरही झाला होता. त्यापैकी मी यूएसए आर्लिग्टनमधल्या ‘द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’ला प्राधान्य देत, तिथे ‘मास्टर्स इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग’च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तो अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता. तेव्हा मला लॅबवर्कचा अनुभव घेता आला. संशोधनात रस असल्याने मी पहिल्या वर्षांतच पदवीतून पीएचडीसाठी ट्रान्स्फर केलं. ‘पीएचडी इन बायोमेडिकल इंजिनीअरिंग’च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. इंटर्नशिपसाठी ज्या डिव्हाइसवर काम केलं होतं, तशाच पद्धतीचं काम इथे सुरू होतं. इथलं प्रवेश शुल्क तुलनेने कमी होतं आणि गरज पडल्यास हाकेला ओ देणारा मित्र इथे शिकत होता. आमच्या अभ्यासक्रमातले कामाचे तास प्रदीर्घ असतात. बरंच वाचन करावं लागतं. त्यासाठी जवळपास पहिले सहा महिने लागले. नंतर हळूहळू थोडा आत्मविश्वास वाढू लागला. शिकून त्याचा प्रत्यक्षात उपयोग कसा करता येईल, याकडे अधिक लक्ष दिलं जातं. वर्गात आम्हाला बिझनेस प्रपोजल्स तयार करायला किंवा डिव्हाइस डिझाईन करायला प्रोत्साहन दिलं जातं. त्यानंतर इंटर्नशिपसाठी अर्ज करायला सांगितलं जातं. शिकता शिकता रिसर्च लॅबमध्येही काम करू शकतो.
ऑक्टोबर २०२० मध्ये कोव्हिडमुळे माझी आजी गेली. तेव्हा सुदैवाने मला भारतात यायला मिळालं होतं. त्या वेळी भारतीय आरोग्यव्यवस्थेने घेतलेली काळजी, निर्बंध, अॅपची सोय या बाबी प्रकर्षांने जाणवल्या आणि भावल्या. नंतरही दोनदा भारतात येऊन गेलो. माझी काही कामं ऑनलाइन होऊ शकतात, पण मायक्रोस्कोप तयार करताना मी तिथे प्रत्यक्ष हजर असणं अपेक्षित आहे. तीच गोष्ट झेब्रा फिशसंदर्भातल्या संशोधनाची. सध्या रिमोट वर्क अर्थात वर्क फ्रॉम होम वाढायला लागलं असून ते आणखी वाढणार आहे, असं दिसतं. अर्थात, काही कामांसाठी लॅबमध्ये जावंच लागतं. कोव्हिडच्या सुरुवातीच्या काळात आम्हाला सक्तीचं वर्क फ्रॉम होम होतं. सध्या सगळं ठीक आहे, पण आम्हाला काळजी घ्यावी लागते. आम्ही करत असलेलं संशोधन विद्यापीठांतर्गत होतं आणि त्यामुळे ते तितकंच महत्त्वाचं असतं. ते शक्य तितकं सुरू होतं. संशोधन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना बराच त्रास झाला. कारण सगळं ऑनलाइनच सुरू होतं बराच काळ. काहींना पहिलावहिला प्रत्यक्ष अभ्यास, कामाचा अनुभव घेता आला नाही. इंटर्नशिप मिळाली नाही. या सगळय़ाचा मानसिक ताण आणि त्रास खूप झाला. आता काळजी घेत सगळं काम सुरू आहे.
मी मायक्रोस्कोप बांधतो. मायक्रोस्कोपमधून अधिकाधिक सूक्ष्म गोष्टी कशा दिसू शकतील यावर काम करणं सुरू आहे. आताचं माप आहे मायक्रोमीटर. त्याहीपलीकडे जायचा प्रयत्न सुरू आहे. मायक्रोस्कोपला सध्या चौकटीतल्या मर्यादा आहेत. बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून कळलेल्या नाहीत. ऑप्टिकल बॅरिअर्सच्या (मानवी दृष्टीच्या मर्यादा) पल्याड जायचा प्रयत्न सुरू आहे. दुसरं संशोधन आहे ते बायोलॉजीच्या संदर्भातलं. हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा किंवा जन्मजात हृदयदोष असणाऱ्या व्यक्तींच्या हृदयाचं कार्य कसं चालतं, ‘’ left ventricular cardiomyologyया आजाराच्या संदर्भातील कारणमीमांसा शोधायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी झेब्रा फिश हा संशोधनाचा नमुना म्हणून वापरतो आहे. मानवी हृदयविकारासाठी कोणते जीन्स कारणीभूत ठरू शकतात, ते शोधायचा प्रयत्न सुरू आहे. ही संशोधनं करताना एकाच चौकटीत गुंतून न राहिल्याने बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते आहे, अनेक गोष्टी हाताळता येत आहेत आणि मोलाचा अनुभवही मिळतो आहे.
सध्याचा ट्रेण्ड बघता आमच्या क्षेत्रात पीएचडी केलेली असल्यास अधिक चांगलं. अर्थात नोकरीचं स्वरूप काय हा एक मुद्दा असला तरीही करोनाकाळात एमएस केलेल्या काही विद्यार्थ्यांना H1 b लॉटरी सिस्टीमतर्फे नकारघंटा मिळते आहे. पीएचडी म्हणा किंवा पदव्युत्तर शिक्षण.. त्यामुळे अनुभवांची शिदोरी जमा होते. संशोधन केलेलं नसलं तरीही एमएसच्या थिसिसमुळे जरासा अनुभव मिळतो. या एमएस केलेल्या विद्यार्थ्यांना मोठय़ा कंपन्यांमध्ये नोकरी शोधताना व्हिसा अमान्य झाल्यास त्यांना कॅनडासारख्या ठिकाणी पाठवायचा विचार केला जातो. अशा वेळी भारतात परतणं म्हणजे अपयश मिळालं असं समजू नये. परदेशातील संधी आणि जीवनशैलीचा लाभ घेता आला नाही, तरी निराश व्हायचं कारण नाही. कारण शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी परिस्थितीला ठामपणं सामोरं जाता येतंच.
सुरुवातीच्या काळात मी अनेकदा होमसिक व्हायचो. मग स्वत:ची समजूत काढायचो. छंदांमध्ये मन रमवायचो. पुण्यात असताना राष्ट्रीय स्तरावर स्विमिंग करायचो. आता अभ्यासामुळे या गोष्टींना वेळ मिळत नाही. प्राणिप्रेमी असल्याने मांजर आणि मासे पाळतो आहे. कधी तरी मित्रासोबत मासेमारी करायला जातो. सुट्टीत फिरायला जातो. घरच्यांच्या कायम संपर्कात असतो. सहा महिने एका लॅबमध्ये व्हॉलेंटरी काम केलं. पहिल्या वर्षांनंतर लॅबमधला अनुभव घेतल्यावर तिथेच मी पीएचडीला प्रवेश घेतला. याच लॅबमध्ये ग्रॅज्युएट टीचिंग असिस्टंट आणि रिसर्च असिस्टंट म्हणून काम करतो आहे. अशा अनुभवांचा उपयोग विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवताना होतो, हे माहिती असल्याने प्राध्यापक अशा संधी देतात. या संधींमुळे करिअरचा आलेख उंचावयाला मदत होते. विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन म्हणून बहुतांशी वेळा प्राध्यापक विद्यावेतन किंवा शिष्यवृत्ती देतात. माझा पहिला पेपर प्रसिद्ध झाल्यावर यशाची एक पायरी चढल्यासारखं वाटलं. लॅबमध्ये काम करताना माझे मार्गदर्शक डॉ. ज्युऑन ली यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. विषयनिवडीचं स्वातंत्र्य दिलं. मला वाटतं की, आपल्या करिअरची आखणी करताना ओळखी वाढवणं, त्या टिकवणं गरजेचं आहे. आपल्या अभ्यासात, संशोधनात सातत्य राखायला हवं. एकदा सॅनफ्रान्सिस्कोमध्ये एका परिषदेत सादरीकरण होतं. लॅबमध्ये काम करताना बऱ्याचदा प्रयोगासाठीचा प्राणी मारावा लागतो. त्यामुळे तो जिवंत असताना त्याचं जैविक संशोधन करता येत नाही. आम्ही जिवंत माशाच्या हृदयाचे ठोके मोजले होते. आमच्या या संशोधनाला अनेकांची दाद मिळाली होती. आमच्या लॅबमध्ये मेडिकल इमॅजिंगवर (imaging) भर दिला जातो. त्यातही लॅबमध्ये मॉडेल म्हणून वापरल्या जाणाऱ्या उंदीर, झेब्रा फिश इत्यादी जिवंत प्राण्यांच्या शरीरातील अवयवांचा मागोवा घेण्यासाठी मायक्रोस्कोप बांधले जातात. सध्या थ्रीडी इमॅजिंग कसं करता येऊ शकेल यावर काम सुरू असून त्याच्या साहाय्याने शरीरातील पेशींमधला सूक्ष्मात सूक्ष्म भाग कसा टिपता येईल, याचा अभ्यास सुरू आहे. हा बघा, रिमांइडर वाजला. आता विचार आवरते घेतो आणि लॅबमध्ये पळतो. अंदाजे मे २०२३ मध्ये मी पीएचडीचा डिफेन्स परीक्षकांपुढे सादर करेन. पीएचडीनंतर पुढे काही गोष्टी करायच्या डोक्यात आहेत, बघूयात कसं प्रत्यक्षात येईल ते. विश मी लक.
कानमंत्र
* परदेशी शिक्षणासाठी जायचा निर्णय पूर्णपणे विचारांती, कुटुंब, प्राध्यापक, सीनिअर्स यांच्याशी बोलून मग घ्या.
* कामाचा अनुभव घेऊन पुढच्या करिअरची आखणी करा. निवडल्यावर माघारी न फिरता त्यात सातत्य राखा.
viva@expressindia.com