पणजी आजी,
पणजी आजी आज तुझी शंभरी,
आम्हांस तुझा सहवास लाभला हीच आमची पुण्याई ॥
तुझ्यासमोर उभ्या आज पाच पिढय़ा
आणखी पाच तू पाहाव्यास हीच आमची इच्छा ॥
अगं शंभर ऊन-पावसांचा अनुभव तुला
या गोष्टीचा गर्व आहे आम्हाला ॥
तुझा कंगवा नि आरसा अजून तोच आहे
चेहऱ्यावरच्या सुरकुत्त्यांमागे माझी पणजी आजीही तीच आहे ॥
तुझा हा गोडवा नि तुझी ही माया
राहू दे आमच्यावर नेहमीच तुझी छाया ॥
तुझ्यामुळे लाभली मला माझी माणसे
तूच दिलीस मला ही नाती खास ॥
तुझी ही भेट मी जपेन आयुष्यभर
वचन हे माझे ज्याचा साक्ष आजचा दिवस ॥
ही कविता पणजीच्या १००व्या वाढदिवसाच्या दिवशीच्या कार्यक्रमात बसल्या बसल्या तिला सुचली होती. नंतर ही कविता ऑफिसमधल्या सरांना दाखवली. त्यांनी अभिनयप्रशिक्षणादरम्यान या कवितेचा उपयोग करून घेतला. आजी-नातवंडं असं कािस्टग करून ती कविता शूट केली गेली. त्यासाठी त्या कवयित्रीचाच व्हॉइसओव्हर दिला गेला. असं ‘बोलकं लिहिणं’ मन:पूर्वक आवडणारी ही आहे तन्वी अभ्यंकर !
तन्वीशी गप्पा मारायच्या ठरवल्या नि एकदम मत्रीच जमून गेली. त्यामागचं कारण आहे तिचा मनमोकळा आणि बडबडा स्वभाव. तिच्या स्वभावाशी रिलेट होणारं लर्न अ‍ॅण्ड अर्न ती सध्या करत्येय. सध्या तन्वी ‘बॅचलर ऑफ मास मीडिया’ करत्येय. तिसऱ्या वर्षांला असणाऱ्या अ‍ॅडव्हर्टायिझग नि जर्नालिझम या विषयांपकी तिनं अ‍ॅडव्हर्टायिझग हा विषय निवडलाय. त्यात अ‍ॅडव्हर्टायिझग , मार्केटिंग, पब्लिक रिलेशन्स, कॉम्प्युटरचं बेसिक, एजन्सी मॅनेजमेंट असे अनेक टॉपिक्स आहेत. या अभ्यासक्रमात लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स असतात. प्रोजेक्टस् नि पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन्स असतात. कधी ऑन फिल्डही जावं लागतं.
तन्वी पहिल्या वर्षांला होती तेव्हा ‘मिरॅकल्स अ‍ॅकॅडमी ऑफ आर्टस् अ‍ॅण्ड मीडिया प्रा. लि.’ मध्ये जॉइन झाले. या अ‍ॅकॅडमीचे संचालक आहेत प्रमोद आणि मधुराणी गोखले-प्रभुलकर. दरम्यान, अ‍ॅकॅडमीची जाहिरात पेपर्समध्ये येत होती, पण तिला काही अ‍ॅिक्टग वगरे करायची नसल्यानं ती तिकडं वळली नाही. तिची बहीण इथं काम करीत होती. एकदा तिचं काम पाहिल्यावर आपल्यालाही हे जमेल असं वाटलं. सरांशी बोलणं झालं नि तिनं कामाला सुरुवात केली. लोक कोर्सची माहिती विचारायला कॉल्स करतात तेव्हा सगळी इत्थंभूत माहिती द्यावी लागते. समोरच्यांशी चांगला संवाद साधून त्यांना सविस्तर माहिती देणारं कुणीतरी हवं होतं. आपण हे करू शकू, असं तिला वाटलं. प्रशिक्षणादरम्यान छोटय़ा अ‍ॅडस् केल्या जातात. त्या छोटय़ा अ‍ॅडस् लिहायला तिनं सुरुवात केली. सुरुवातीला छोटय़ा बॅचेस असायच्या. त्यांचं कािस्टग, शेडय़ूिलग इत्यादी कामं ती करायची. छोटय़ा बॅच असल्यानं मॅनेज करणं सोपं गेलं. आता कामाचा आवाका आणखी वाढलाय.
तन्वी म्हणते की, ‘‘कॉलेज सुरू झाल्यावर मी पार्टटाइम करायला लागले. क्रिएटिव्ह कामासाठी तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं. मग अ‍ॅडमिनकडं वळले. सेमिनार्ससाठीचे कॉल्स घेणं चालूच आहे. लहान मुलांची बॅच असेल तर मदतीला व्हॉलेंटिअर म्हणून काम करायचे. त्यांच्याकडून कवितांना चाल लावून त्या पाठ करून घेणं वगरे करते. हे काम मीडियाशी रिलेटेड नसलं तरीही जवळ जाणारं आहे. स्क्रिप्टसाइटिंग, मीडिया प्लॅिनग, कॉपीरायटिंग वगरे विषय असल्यानं मला या कामामुळं एक टचअपसारखा मिळत गेला. ते अधिकाधिक आवडायला लागलं.’’  
तिच्या घरी या क्षेत्रातलं कुणी नाहीये. मास मीडियाचा हा अभ्यासक्रम तिनं ‘नॅशनल कॉलेज’मधून बारावी सायन्स केल्यानंतर निवडलाय. दहावीनंतर आर्टस् घ्यावं का, हा विचार मनात आला होता. घरच्यांनी धीर देत तिला म्हटलं होतं, ‘‘तू हुशार आहेस. जमेल तुला.’’ तेव्हा सायन्सची आवड होती. तेव्हा वाटलं जमेल. पण इंजिनीअिरग तेवढं जमत नव्हतं. सीईटीची तयारीही चालू होती. पण मॅथ्स आणि फिजिक्सशी तिचं समीकरण जुळलं नाही. तेव्हा ‘बीएमएम’विषयी कळलं. सगळी माहिती काढली नि इंटरेिस्टग वाटलं. कोर्सची फी जास्त वाटली, पण बाबांनी खूप सपोर्ट केला. तिच्या सरांनीही या निर्णयाला पािठबा दर्शवला. ‘‘या सगळ्या प्रोसेसमध्ये माझी चांगली प्रगती झाली. व्यक्तिमत्त्व छानपणे फुलू लागलं.’’ तन्वी सांगते.  
तिचा अभ्यास आणि जॉब या धावपळीत सरांनी खूप सांभाळून घेतलं. ‘‘मला मुळात या सगळ्याची खूप आवड आहे. मी ते मनापासून एन्जॉय करतेय नि म्हणून ते मॅनेज करू शकते. लेक्चर्स सकाळी असतात. कधी तरी बोअर व्हायला होतं. पण नंतर ऑफिसला जाऊन काहीतरी छान काम कारायचंय, ही एक्साइटमेंट असते. सध्या अ‍ॅडमिशन्स सुरू असल्यानं आणखी धावपळ चालल्येय. लोकांना माहिती सांगताना त्याच प्रश्नांनी क्वचित बोअर होतं. पण ते तेवढय़ापुरतंच. हे जणू दुसरं कुटुंबच झालंय. घरच्यांनाही त्यांच्याबद्दल विश्वास वाटतो,’’ असं ती सांगते.   
बीएमएम असो किंवा जॉब असो. या सगळ्यादरम्यान कामानिमित्तानं खूप सारी माणसं भेटतात. या नाना तऱ्हांच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या माणसांना भेटायला तन्वीला खूप आवडतं. ती म्हणते की, ‘‘या साऱ्यांचे स्वभाव, कुटुंब, परिस्थिती, जॉब, अनुभवांतून वेगळंच विश्व उलगडतं. त्यातून कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. आपल्यापेक्षा कमी आहे, त्या माणसाकडं पाहून जगावं. हा दृष्टिकोन तर आपण ठेवतोच शिवाय अष्टावधानी माणसाकडं पाहून आपणही, असं काहीतरी करायला हवं, अशी प्रेरणाही कळत-नकळतपणे यातून मिळते.’’
योगायोगानं तिचं घर-कॉलेज-जॉबचं ठिकाण जवळ असल्यानं तिचा जाण्या-येण्याचा वेळ वाचतो. कामानिमित्तानं कधी तरी पुण्यालाही जावं लागतं. आधी राहायलाही लागायचं. पण आता त्यांची टीम वाढल्यानं त्या फेऱ्या कमी झाल्यात. घरून खूपच सपोर्ट असल्यानं हे सगळं ती करू शकत्येय. ती सांगते की, ‘‘काही वेळा लहान मुलांच्या बॅचमधलं कुणी अचानक भेटतं. ‘तनूताई’ अशी प्रेमानं हाक मारून कशी आहेस, अशी चौकशीही करतं. आपण त्यांना विचारतो तसं, तू कितवीत आहेस, असंही विचारतं. या आपलेपणामुळं खूप छान वाटतं. मला भावंडं नसल्यानं ही बच्चेकंपनीची विचारणा हवीशी वाटून जाते. मूडप्रमाणं वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला आवडतात. मी बाथरूम सिंगर आहे. टीव्ही आवडीनं बघते. लोकांना भेटायला-त्यांना ‘वाचायला’ जास्त आवडतं. कधी कधी काहीतरी छान लिहावंसं वाटतं. कधी तसं लिहितेही. पण अक्षर खास नसल्यानं माझं मलाच वाचायचा कंटाळा येतो.’’
तिला डिबग करण्यात खूप इंटरेस्ट आहे. पण त्याचं अजून शिक्षण घेतलेलं नाहीये. ग्रॅज्युएशन झाल्यावर डिबग आणि प्रीस्कूल टीचिंग हे दोन्ही शिकायचंय. त्याची तिला आवड आहे. तन्वी म्हणते की, ‘‘कुटुंबाला सपोर्ट करायचा असल्यानं प्रीस्कूल टीचिंग शिकून ते करतानाच डिबग वगरेही केलं तर एक प्रकारे बॅलन्स होईल, असं वाटतंय. पण याबाबतीत अजून थोडी कन्फ्यूज आहे. प्रत्येकानं लहानपणी एक स्वप्न पाहिलेलं असतं की मी अमुक होणार. तसं मला टीचर व्हायचंच होतं. आयुष्याचा गंभीरपणे विचार करताना जॉब तोही अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमधला करणं योग्य ठरेल, असं आत्ता तरी वाटतंय..’’ तिला ऑल द बेस्ट.!    

लर्न अ‍ॅण्ड अर्न या नव्या कॉलममधून तुम्हाला तुमच्या अशा काही मित्रांना आणि मैत्रिणींना भेटायला मिळणारेय जे शिकताना स्वतची आवड जपत आहेत. अर्थात ही आवड म्हणजे केवळ छंद जोपासण्याइतपत मर्यादीत नाही तर ही आवड आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्याची आहे. तरूणांमध्ये अलीकडे लर्निग प्लस अर्निग हे चित्र दिसून येत आहे. पूर्वी केवळ समर जॉब करणारे चेहरे आता कॉलेजच्या लेक्चर्ससह इतर जॉबसाठीही वेळ देत आहेत. अशाच तरूणांची आणि त्यांच्या कामाची महती आपण जाणून घेऊया. यासंदर्भात आपणास मेल करावयाचे असल्यास viva.loksatta@gmail.com  या संकेतस्थळावर माहिती पाठवावी. कॉलमचे नाव लर्न अ‍ॅण्ड अर्न असे टाकावयास विसरू नये.

Story img Loader