पनीर कॉर्न मेथी राइस
साहित्य : कापलेले पनीर, कॉर्न – १ चमचा, भात – १ बाऊल, चिरलेली मेथी, जिरे, खडा गरम मसाला,  हळद, आलं लसणाची पेस्ट, दूध – चवीनुसार, तेल – २ चमचे, मीठ – चवीनुसार, साखर – चवीनुसार,  कोथिंबीर.
कृती : फ्रायपॅनमध्ये तेल टाकून त्यात खडा गरम मसाला, जिरे टाकावे. त्यानंतर त्यात कॉर्न, मेथी टाकावी. नंतर आलं लसणाची पेस्ट टाकावी आणि परतावे. त्यानंतर त्यात हळद, दूध टाकावे आणि पनीर व भात टाकून मिक्स करावे. चवीनुसार मीठ साखर टाकावी. नंतर सव्‍‌र्ह करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ब्रोकोली राइस
साहित्य : रेड पेपर, यलो पेपर, व्हाइट पेपर पावडर- प्रत्येकी १ चिमूट, भात – १ बाऊल, उकडवून कापलेली ब्रोकोली, तेल – २ चमचे, मीठ – चवीनुसार, साखर – चवीनुसार,  चिरलेली कांदापात – २ चमचे, लसूण, एरोमेथिक पावडर – १ चिमूट.
कृती : फ्रायपॅनमध्ये तेल टाकून त्यात गार्लिक, रेड पेपर, यलो पेपर, कापलेली ब्रोकोली व शिजवलेला भात टाकावा आणि परतवून घ्यावे. चवीनुसार मीठ, साखर टाकावी. व्हाइट पेपर, एरोमेथिक पावडर, कांदापात टाकून परतवून घ्या. नंतर सव्‍‌र्ह करा.

टॅमरिंड राइस
साहित्य : उडदाची डाळ, मोहरी, भात – १ बाऊल, चिंचेचे पाणी, शेंगदाणे, तेल, मीठ – चवीनुसार, लाल तिखट – चवीनुसार, कढीपत्ता.
कृती : कढईमध्ये तेल टाकून त्यात उडद डाळ, मोहरी, कढीपत्ता टाकावे आणि परतवून घ्यावे, नंतर त्यात शेंगदाणे, लाल तिखट, चिंचेचे पाणी टाकून परतवून घ्यावे. नंतर शिजलेला भात, चवीनुसार मीठ आणि साखर टाकावी.