बाजारातून चक्कर मारली की किती तरी भाज्या, फळ दिसतात. त्यांचे मनमोहक रंग बघून छान वाटतं. या रंगीत भाज्या, फळांचे सॅलॅड पण छान होतात बरं का! आपल्याला माहीतच आहे की सॅलॅड जेवणात असणे किती महत्त्वाचे आहे ते. या आठवडय़ात सॅलॅडचे तीन मस्त प्रकार देतो. करून बघा. खाल्ल्यावर ‘वन्स मोअर’ आलाच पाहिजे!
किमची सॅलॅड
साहित्य : चिरलेला कोबी – १, चिरलेली कांदा पात – २, सफेद तीळ – ३ टी स्पून,
ड्रेसिंगसाठी साहित्य : लाल मिरची पेस्ट – २ टेबलस्पून, सोया सॉस – १ टेबल स्पून, आले-लसूण पेस्ट – १ टेबल स्पून, टोमॅटो केचप – २ टेबलस्पून, व्हिनेगर – १ टेबलस्पून, तेल – ३ टेबलस्पून, मीठ – चवीनुसार,
वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यापासून ड्रेसिंग तयार करावे.
कृती : एका बाऊलमध्ये चिरलेला कोबी, तीळ, तयार केलेले ड्रेसिंग एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या. कांदा पातने गाíनश करून डिशमध्ये सव्र्ह करा.
चीली कॉर्न सॅलॅड
साहित्य : चेरी टोमॅटो – ५० ग्रॅम, उकडलेले अमेरिकन कॉर्न – २०० ग्रॅम, बांधून पाणी काढलेले दही – २५ ग्रॅम,
ड्रेसिंगसाठी साहित्य : लेमन ज्यूस – ३ टेबलस्पून, टोमॅटो केचप – ३ टेबलस्पून, टोबॅस्को सॉस – १ टी स्पून, चिली फ्लेक्स – १ टी स्पून, चिरलेली बेसील पान – १ टेबल स्पून, मीठ – चवी नुसार, साखर – १ टी स्पून, वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यापासून ड्रेसिंग तयार करावे.
कृती : एका बाऊलमध्ये चेरी टोमॅटो, अमेरिकन कॉन, तयार केलेले ड्रेसिंग
एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या.
बांधून ठेवलेल्या दहीवर टाकून डिशमध्ये सव्र्ह करा.
टीप : पनीर किंवा चीज या सॅलॅडबरोबर छान लागेल.
चेरी टोमॅटो नसतील तर मोठे टोमॅटो
कापून घेतले तरी चालतील.
वॉल्ड्राफ सॅलॅड
साहित्य : सफरचंद – २ ते ३ , सेलरी (आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध असते) – २ ते ३ दांडे बारीक चिरलेले, मेयोनेज सॉस – ३ ते ४ टी स्पून, मीठ – चवीनुसार, पेपर पावडर – चवीनुसार, अक्रोड – ५० ग्रॅम.
कृती : एका बाऊलमध्ये सफरचंदचे तुकडे घेऊन त्यामध्ये मेयोनेज सॉस टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यामध्ये आक्रोडचे तुकडे, बारीक चिरलेली सेलरी, मीठ, पेपर पावडर मिक्स करून एका डिशमध्ये सव्र्ह करा.