वैष्णवी वैद्य मराठे
तंत्रज्ञानासोबत आलेल्या नव्या माध्यमांवर सध्या हॅकिंगचा विळखा घट्ट बसला आहे. या हॅकिंगच्या जाळय़ात तरुणाई अधिक फसताना दिसते. त्यामुळे हॅकिंग म्हणजे नेमके काय? ते होऊ नये यासाठी काय सावधगिरी बाळगावी याविषयीचा हा लेखन प्रपंच..
२००४ साली फेसबुकचा जन्म झाला त्याचबरोबर व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, लिन्क्डइनसारख्या समाजमाध्यमांची आता मांदियाळी झाली आहे. सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार आहे असे म्हणतात. त्याचे जितके सदुपयोग आहेत तितकेच दुरुपयोगही आहेत. त्याचा वापर, पद्धत, फायदे, तोटे हे कळले नाही तर त्यातून मदत होण्यापेक्षा त्रासच जास्त होऊ शकतो. सोशल मीडिया आता फक्त फेसबुक, व्हॉट्सअॅपपुरता मर्यादित राहिला नसून आता त्यात डिजिटल मीडिया, ऑनलाइन गेमिंग याचाही प्रभाव आणि लोकप्रियता वाढताना दिसते आहे. याच भयानक गेमिंग आणि विविध मायक्रोब्लॉगिंगच्या अॅप्सने कित्येक तरुणांना व्यसन लावून त्यांचे जीवही घेतले आहेत.
सायबर क्राईमचे प्रकार पूर्वीही होतच होते, परंतु तंत्रज्ञानाच्या अति किंवा चुकीच्या वापरामुळे जे प्रकार आत्ता होताना दिसतायेत ते भीतीदायक आणि पेचात टाकणारे आहेत.
तंत्रज्ञानासोबत आलेल्या नव्या माध्यमांवर सध्या हॅकिंगचा विळखा घट्ट बसला आहे. हा विळखा फक्त तरुणाईलाच नाही तर बुजुर्गानाही बऱ्याच प्रमाणात त्याची शिकार बनवत आहे. सामान्यांबरोबरच आपण अनेक मराठी-हिंदी सिने-सृष्टीतील कलाकारांचेही अकाऊंट्स हॅक झालेले पाहिले आहेत.
सोशल मीडिया हॅकिंग म्हणजे नेमके काय? आणि ते कसे होते?
‘माझे अकाऊंट हॅक झाले आहे’ हे आपण खूप सहज म्हणतो. पण म्हणजे नेमके काय होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हॅकिंग हा एक प्रकारचा स्कॅम असतो. कुठल्यातरी पद्धतीने स्कॅमर्स तुमच्याशी संपर्क साधतात.
त्याच्या सर्वसाधारण पद्धती खालीलप्रमाणे:
तुम्हाला एखादा फोटो पाठवला जातो, त्यामध्ये लपवलेला नंबर ओळखून तुम्हाला अमुक अमुक रुपयांचे बक्षीस मिळेल.
मी एका कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आहे, त्यासाठी मला वोटिंगची गरज आहे. दिलेल्या लिंकवरून तुम्ही वोट करा.
माझा स्वत:चं अकाऊंट हॅक झालं आहे. त्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे म्हणून तुमची माहिती हवी आहे.
बिटकॉइनच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल माहिती दिली जाते. जेव्हा तुमचं अकाऊंट हॅक झालं असेल तेव्हा तुमच्या फ्रेंडलिस्टमधल्या लोकांना असे मेसेजेस करतात आणि त्यांचेही अकाऊंट्स ताब्यात घेतले जातात.
अशा पद्धतीचे अजून बरेच मार्ग असतात ज्या माध्यमातून हॅकर्स तुमच्यापर्यंत पोहोचतात. तुम्ही ओटीपी देऊन किंवा मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन त्यांनी दिलेला एखादा जीमेल आयडी टाकता तेव्हा तुमच्या डिव्हाईसचा सर्वतोपरी कंट्रोल त्यांच्याकडे जातो. मग दुसऱ्याचं अकाऊंट हॅक करताना पुन्हा हीच सगळी प्रक्रिया ते पुन्हा करतात. तर अशा पद्धतीचं हे एक जाळं आहे. या प्रक्रियांना आयटी किंवा तंत्रज्ञानाच्या भाषेत फिशिंग, क्लोनिंग असेही म्हणतात.
हॅक झाल्यावर काय करावे?
तुमच्याकडे एक मार्ग असा आहे की तुम्ही पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता. तर दुसरा आणि जास्त उपयोगी मार्ग म्हणजे सध्या अनेक सायबरतज्ज्ञ अशा घटनांसाठी कार्यरत आहेत, त्यांची मदत तुम्हाला लगेच मिळू शकते. सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक याबद्दल सांगतात, ‘हॅक झाल्यावर काय करायचे हा थोडा तांत्रिक मुद्दा आहे. तुमचे अकाऊंट रिकव्हर नक्कीच होऊ शकते, ते अशक्य नाही. हॅकर जेव्हा स्कॅम करतो तेव्हा तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी तुमच्याच डिव्हाइसमधून डिलीट झालेला असतो आणि त्या जागी हॅकरचा डेटा असतो. अशा वेळी एकच मार्ग उरतो तो म्हणजे व्हिडीओ व्हेरिफिकेशन. ते आता इन्स्टाग्राम, फेसबुकने सुरू केले आहे. तुमचे अकाऊंट जे हॅक झाले आहे त्यावर तुमचेच फोटो व्हिडीओ आहेत असे कन्फर्म झाले की फेसबुक किंवा इन्स्टाग्रामला तुम्ही व्हिडीओ व्हेरिफिकेशनची रिक्वेस्ट पाठवू शकता. व्हिडीओ जर अस्पष्ट किंवा अंधारातला असेल तर तो स्वीकारला जात नाही. तुमचा स्वच्छ आणि स्पष्ट व्हिडीओ त्यांना द्यावा लागतो. मग तुम्हाला पुन्हा एक प्रोसेस दिली जाते ती जशीच्या तशी करणे तुम्हाला भाग आहे. जर त्यातली एकही स्टेप राहिली तर अकाऊंट रिकव्हर झाल्यावर पुन्हा हॅक होऊ शकते’.
हॅक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
वेगवेगळय़ा स्कॅमिंगमधला हॅकिंग हा एक भाग झाला. या माध्यमातून अनेकदा तुम्हाला धमक्या आणि ब्लॅकमेलसुद्धा केले जाते. तुमचे विचित्र पद्धतीचे फोटो आणि व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची भीती दाखवून तुमच्याकडे पैसे मागतात. बरेचदा यासाठी तुम्हाला ते साधा कॉल, व्हाट्सअॅप कॉल अगदी व्हिडीओ कॉलसुद्धा करतात. अशा वेळी तुमचा चेहरा लगेच कॅप्चर होतो.
ल्ल
- पासवर्ड सतत बदलत ठेवा, पासवर्ड ठेवताना तिथे तुम्हाला स्ट्राँग आणि वीक पासवर्डबद्दल माहिती दिलेली असते ती वाचा व स्ट्राँग पासवर्ड ठेवा.
- व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाचं टू -स्टेप व्हेरिफिकेशन कायम सुरू ठेवा.
- मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर चांगल्या कंपनीचा अँटीव्हायरस टाका.
- तुमचा सगळा डाटा, गोपनीय माहिती, पासवर्ड, बँक अकाउंट्स इतर ठिकाणी जतन करून ठेवा.
- ऑनलाइन आर्थिक व्यवहारांसाठी फक्त आणि फक्त बँकेच्या अधिकृत सूचना व नियमांचे पालन करा.
- ओळखीच्या नसलेल्या लोकांचे फोन, मेसेज, व्हिडीओ कॉल कारण नसताना उचलू नका.
- कुठल्याही गरज नसलेल्या लिंक आणि वेबसाइटवर क्लिक करू नका.
- अनोळखी नंबरवरून आलेले व्हॉट्सअॅप कॉल उचलू नका व परत त्या नंबर्सना कॉल न करता सरळ ब्लॉक करा.
या शिवाय डॉ. अक्षय सांगतात, ही एक विकृत मनोवृत्ती आहे. डिजिटल लिटरसीची सध्या आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. आज तरुणांना सगळंच सगळय़ांना दाखवायचं आहे. तुम्ही कुठे फिरताय, काय करताय, घरात काय करताय, काय खाताय हे सगळंच आपण पोस्ट करत असतो. तुमचा सोशल मिडियावरचा सगळा डाटा एका सव्र्हरवर जतन होतो. ‘सोशल मीडिया स्टॉकिंग’ अशी टर्म आहे म्हणजे तुम्ही काय करताय यावर हॅकर्स बारीक लक्ष ठेवून असतात. मी आत्तापर्यंत १८७ अकाऊंट्स रिकव्हर केले आहेत, त्या सगळय़ा केसेसमध्ये लोकांनीच स्वत:हून काहीतरी अॅक्सेस त्यांना दिलेला असतो असे आढळून आले आहे. मी आजकाल एक म्हण वापरतो- ‘जान जाये पर ओटीपी ना जाये’. ओटीपीने काय सुरक्षितता येऊ शकते याबद्दल लोकांमध्ये जागरूकता झालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या नव्या माध्यमांना हॅकिंगचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. डॉ. अक्षय सांगतात की सोशल मीडियाच्या या विपर्यासात फक्त आणि फक्त जागरूकता, सावधानता आणि दक्षता हाच उपाय आहे. तरुणांना फक्त समाजमाध्यमांवर कशी पोस्ट करायची एवढीच माहिती आहे, परंतु सध्या प्रॉब्लेम बेस्ड सोल्युशनची गरज आहे. पोस्ट केलेल्या माहितीचा विपर्यास झाला तर त्या चक्रव्यूहातून कसे बाहेर यायचे याची माहिती मोजक्यांनाच असते. सोशल मीडियावर कोणती माहिती असावी, कुठली माहिती किंवा पोस्ट आपण पाहाव्यात अथवा पाहू नये याच्या अज्ञानामुळे हॅकिंगचे प्रकार वाढताना दिसत आहेत.
आता सगळय़ाच बँकांनी डिजिटल पद्धतीने व्यवहार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपण या सगळय़ा व्यवहारांसाठी एकच पासवर्ड ठेवतो. यातला एखादा जरी पासवर्ड हॅकर्सच्या हाती लागला तरी सगळेच सोशल अकाऊंट्स आणि बँक अकाऊंट्स हॅक होऊ शकतात. ही जाणीव किंवा माहितीच नागरिकांना नसते. सध्या ही जागरूकता असण्याची गरज निर्माण झाली आहे. यातून भीतीने सोशल मीडिया वापरणेच बंद करणे हा उपाय नाही. तर त्याचा वापर सतर्कतेने आणि सजगतेने करणे गरजेचे आहे.