दिवाळीच्या दिवसात फराळाची चंगळ असतेच. पण यातले बरेचसे पदार्थ तेलात- अथवा तुपात तळलेले असतात. दिवाळीची चंगळ काही दिवसांनी शरिरावर दिसायला लागते. वाढलेल्या कॅलरीज कमी करण्यासाठी मग बरेच प्रयत्न करावे लागतात. याऐवजी हा फराळ लो कॅलरीचा असला तर. यावर बेकिंग हा एक पर्याय आहे. पण पदार्थ भाजल्यावर तळणीची खमंग चव काही त्याला येत नाही, असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. सध्या पाश्चिमात्य देशांत लो कॅलरी ऑइल म्हणून कॅनोला तेलाचा पर्याय पुढे आला आहे. या तेलाचा वापर करून केलेल्या काही लो कॅलरीज रेसिपीज
शेफ अजय चोप्रा यांनी व्हिवाबरोबर शेअर केल्या.canolainfo.org च्या सौजन्याने त्यातल्या काही रेसिपीज. यातील काही रेसिपीज नेहमीच्या असल्या तरी दिवळीला केल्या जात नाहीत. चार दिवस चकली, चिवडा, करंजी लाडूला कंटाळला असाल तर या रेसिपीज करून बघायला आणि खायलाही हरकत नाही. त्या रेसिपीजबरोबर न्यूट्रिशियन चार्टही देत आहोत. म्हणजे आपण खाल्लेच्या पदार्थाची मोजदाद करायलाही सोपे जाईल.
कोथिंबीर वडी
साहित्य : हिरवी कापलेली कोिथबीर – १०० ग्रॅम, चणापीठ (बेसन) – १५० ग्रॅम, धनेपूड – अर्धा चमचा, जिरेपूड- अर्धा चमचा, लाल तिखट- अर्धा चमचा, हळद – अर्धा चमचा, आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट – दीड चमचा, हकॅनोला तेल ५० मि.ली. + तळण्यासाठी, बेकिंग सोडा – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार
कृती : एका भांडय़ामध्ये कोिथबिरीची पाने, बेसन, जिरे आणि धनेपूड टाका. त्यासोबत लाल मिरचीची पूड, हळद, आले आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठदेखील टाका. त्यात साधारण ८० मि.ली. पाणी टाकून थोडे पातळ मिश्रण बनवा आणि त्यात गाठी उरलेल्या नाहीत ना याची खात्री करा आणि त्यात सोडा टाका. २ चमचे कॅनोला तेल तापवा आणि ते या मिश्रणामध्ये टाका आणि नीट मिसळा. एका ताटामध्ये ताटाला तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण भरा आणि त्यावर हळू हळू थापा मारा जेणेकरून त्यामध्ये हवेचे बुडबुडे राहणार नाहीत.
प्रेशर कुकरमध्ये १५ मिनिटे उकडा (वडय़ा नीट उकडल्या आहेत का हे तपासण्यासाठी आतमध्ये स्टीलची सुरी आत घाला, जर वडय़ा नीट उकडल्या असतील तर सुरी स्वच्छ बाहेर येईल), आता हे उकडलेले मिश्रण बाहेर काढा आणि हळू हळू थंड होऊ द्या, त्यानंतर त्या मिश्रणाला लहान लहान त्रिकोणी आकारामध्ये कापा. कॅनोला तेल कढईमध्ये गरम करा, बाहेरील पृष्ठभाग तांबूस होईपर्यंत त्या वडय़ा व्यवस्थित तळा. त्यांना टीप कागदावर ठेवा आणि गरम गरम चटणीसोबत सव्र्ह करा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा