या आठवडय़ात आपण पास्ताच्या काही मस्त रेसीपीज करणारच आहोत. पण पास्ताबद्दलच्या काही गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला? इटलीमध्ये होणाऱ्या डय़ुराम नावाच्या गव्हाच्या पिठापासून बनणारा हा पास्ता दोन प्रकारांत मोडतो. ड्राइड पास्ता (पॅकेटमधला) आणि फ्रेश पास्ता. पास्ता बनविण्यासाठी पाण्याचा किंवा अंडय़ाचा वापर केला जातो. ही पास्तांची जी वेगवेगळी नावे आहेत ती त्यांच्या शेपप्रमाणे दिलेली असतात. साधारणपणे ३१० प्रकारचे पास्ता आहेत. मला जेव्हा पहिल्यांदा हे कळलं तेव्हा मी चकितच झालो. सहज मनात विचार आला, आपल्याकडच्या गव्हाच्या चपातीचे असे ३१० प्रकार असते तर, काय मजा आली असती! मला वाटते वर्षभरात रोज एक एक प्रकार करायला लागला असता. जाऊ दय़ा ते. पण पास्ताबद्दल अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते. पास्ता बनविताना पास्ताचे सॉस हे समान असले पाहिजे. खूप जास्त सॉस ठेवू नका आणि पास्ता उकळून घेतल्यानंतर त्याच्यात थोडे तेल टाका. म्हणजे पास्ता एकमेकांना चिकटणार नाही.
चिझी पेने पास्ता!
साहित्य : लांब चिरलेली शिमला मिरची, लांब चिरलेली झुकिनी, चिरलेले मशरूम, चिरलेले लसूण, चिरलेला कांदा, किसलेले चीज, क्रीम, ब्रोकोली, मीठ, साखर, उकडून घेतलेला पेने पास्ता, काळीमिरी पूड.
व्हाइट सॉससाठी साहित्य : दूध, मदा, लोणी, स्पून, जायफळ पूड.
व्हाइट सॉससाठी कृती : लोणी वितळवून त्यात मदा टाकावा व ते मंद आचेवर परतून घ्या. मग गरम दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यात जायफळ पूड व मीठ टाका. साधारणपणे २ ते ३ मिनिटे सॉस शिजवून घ्या. सॉस जास्त घट्ट हात असेल तर थोडं दूध टाका. अशा प्रकारे व्हाइट सॉस तयार करा.
कृती : पॅनमध्ये तेल टाकून त्यात चिरलेला कांदा व लसूण टाकून ते चांगले परतून त्यात चिरलेल्या भाज्या टाकाव्या. एक ते दोन मिनिटे ढवळून त्यात व्हाइट सॉस टाकावा आणि क्रीम टाकावे. त्यात पास्ता टाकावा. नंतर त्यात मीठ, काळीमिरी पूड, साखर व थोडं चीज टाकून गरम गरम सव्र्ह करावं.
ऑलिव्ह ऑइल ग्रार्लिक चिली पास्ता!
साहित्य : पास्ता फारफेले, चिरलेले लसूण, चिरलेला पार्सले,
चिली फ्लेक्स, काळीमिरी पूड, मीठ, ऑलिव्ह ऑइल,
चिरलेली सिमला मिरची, ब्लॅक ऑलिव्ह – २ ते ३.
कृती : एका पॅनमध्ये पाणी घेऊन उकळल्यावर त्यात फारफेले पास्ता टाकावा. पास्ता जवळपास शिजल्यावर तो पास्ता चाळणीमध्ये काढून त्यातील पाणी काढावे व त्यात थोडे तेल टाकून मिक्स करावे. पॅन गरम करून त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकावे, त्यामध्ये चिरलेला लसूण परतून घ्यावा व मग चिली फ्लेक्स, पार्सले, काळीमिरी पूड, मीठ, रंगीत शिमला मिरची, ब्लॅक ऑलिव्ह टाकून ते एक मिनीट परतून घ्यावे. त्यानंतर त्यात फारफेले पास्ता मिक्स करावा व गरमागरम सव्र्ह करावे.
टीप : असल्यास थोडे चीज वरून घातले तरी चालेल.
कोरिएंडर पेस्तो पास्ता
साहित्य : चिरलेली कोथिंबीर, काजू तुकडा ३ ते ४ चमचे, ऑलिव्ह ऑइल- २ ते ३ चमचे, चिरलेले लसूण, मीठ, किसलेले चीज- २ स्पून.
वरील सर्व साहित्य एकत्र करून ते मिक्सरमध्ये वाटावे. वाटताना किंचित पाणी घालावे. म्हणजे व्यवस्थित वाटले जाईल. एकत्र मिश्रणाला कोरिएंडर पेस्तो असे म्हणतात.
इतर साहित्य : क्रीम- २ ते ३ चमचे.
व्हाइट सॉससाठी साहित्य : दूध- १ कप, मदा- २ टी स्पून,
लोणी- १ स्पून, जायफळ पूड- १ चिमूट.
व्हाइट सॉससाठी कृती :
लोणी वितळवून त्यात मदा टाकावा व ते मंद आचेवर परतून घ्या. मग गरम दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यात जायफळ पूड व मीठ टाका. साधारणपणे २ ते ३ मिनिटे सॉस शिजवून घ्या. सॉस जास्त घट्ट हात असेल तर थोडे दूध टाका. अशा प्रकारे व्हाइट सॉस तयार करा.
कृती : गरम पॅनमध्ये कोरिएंडर पेस्तो परतून घ्या. नंतर त्यात व्हाइट सॉस एकत्र करून ढवळून त्यात मीठ, साखर, क्रीम टाका. त्यात पास्ता टाकून सर्व व्यवस्थित एकत्र करा. पास्ताला सॉस छान चिकटला पाहिजे.
हा पास्ता गरमागरम गार्लिक ब्रेडबरोबर सव्र्ह करा.