या आठवडय़ात आपण पास्ताच्या काही मस्त रेसीपीज करणारच आहोत. पण पास्ताबद्दलच्या काही गोष्टी माहिती आहेत का तुम्हाला? इटलीमध्ये होणाऱ्या डय़ुराम नावाच्या गव्हाच्या पिठापासून बनणारा हा पास्ता दोन प्रकारांत मोडतो. ड्राइड पास्ता (पॅकेटमधला) आणि फ्रेश पास्ता. पास्ता बनविण्यासाठी पाण्याचा किंवा अंडय़ाचा वापर केला जातो. ही पास्तांची जी वेगवेगळी नावे आहेत ती त्यांच्या शेपप्रमाणे दिलेली असतात. साधारणपणे ३१० प्रकारचे पास्ता आहेत. मला जेव्हा पहिल्यांदा हे कळलं तेव्हा मी चकितच झालो. सहज मनात विचार आला, आपल्याकडच्या गव्हाच्या चपातीचे असे ३१० प्रकार असते तर, काय मजा आली असती! मला वाटते वर्षभरात रोज एक एक प्रकार करायला लागला असता. जाऊ दय़ा ते. पण पास्ताबद्दल अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते. पास्ता बनविताना पास्ताचे सॉस हे समान असले पाहिजे. खूप जास्त सॉस ठेवू नका आणि पास्ता उकळून घेतल्यानंतर त्याच्यात थोडे तेल टाका. म्हणजे पास्ता एकमेकांना चिकटणार नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा