ऑफिसच्या डब्यात म्हणा, किंवा संध्याकाळी डिनरला खास पाहुणे येणार असतील तेव्हा किंवा काहीतरी मस्त टेस्टी खाण्याचा मूड असल्यास छान लागेल आणि पोटभरीच होईल असं काहीतरी करावंसं वाटतं. याकरता सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे रोल्स.

पनीर रोल
साहित्य : मदा, दूध- २ कप, साखर, मीठ- चवीनुसार, पनीर- १०० ग्रॅम. भाज्या- कांदा- १, शिमला मिरची- १, टोमॅटो- १, बिटाचा रस- १ चमचा. मसाला- आलं-लसूण पेस्ट, तेल- २/३ चमचे, मीठ, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, धणे पावडर, चाट मसाला, टोमॅटो सॉस, पुदिना चटणी.
रोलसाठी- एका छोटय़ा बाऊलमध्ये मदा घेऊन त्यात दूध, चवीनुसार साखर, मीठ घालून कणीक मळून घेणे. त्याचे छोटे गोळे करून ते पाच मिनिटे तसेच ठेवणे, त्यानंतर त्यांना चपातीसारखे पातळ लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घेणे.
सारणाची कृती : वरील सर्व भाज्या लांबट कापून घ्याव्यात. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, जिरे पावडर, सर्व भाज्या, पनीर, बिटाचा रस, टोमॅटो सॉस, मीठ आणि थोडं पाणी टाकून एकजीव करा.
आता तयार केलेल्या चपातीमध्ये वरील तयार झालेले सारण ठेवून त्याचा रोल तयार करा. तव्यावर थोडं तूप घालून शेकवून घ्या. तुम्हाला हव्या त्या आकारात तुकडे कापून पुदिना चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.

टेस्टी चिकन रोल
साहित्य : मदा, दूध- २ कप, पालक पेस्ट, साखर, मीठ- चवीनुसार, बोनलेस चिकन- १०० ग्रॅम, मसाला, आलं-लसूण पेस्ट, तेल- २/३ चमचे, मीठ- चवीनुसार, हळद- चवीनुसार, लाल तिखट, जिरे पावडर, धणे पावडर, चाट मसाला, टोमॅटो सॉस, पुदिना चटणी.
रोलसाठी- एका छोटय़ा बाऊलमध्ये मदा घेऊन त्यात दूध, पालक पेस्ट, चवीनुसार साखर, मीठ घालून कणीक मळून घेणे. त्याचे छोटे गोळे करून ते पाच मिनिटे तसेच ठेवणे, त्यानंतर त्यांना चपातीसारखे पातळ लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घेणे.
सारणाची कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, जिरे पावडर, चिकन, टोमॅटो सॉस व चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून एकजीव करा. तयार केलेल्या चपातीमध्ये वरील तयार झालेले सारण ठेवून त्याचा रोल तयार करा. तव्यावर थोडं तूप घालून शेकवून घ्यावे आणि पुदिना चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.

व्हेज रोल
साहित्य : मदा, दूध- २ कप, साखर, मीठ
भाज्या- कोबी- १०० ग्रॅम, गाजर- १, कांदा- १, शिमला मिरची- १, टोमॅटो- १, मसाला- आलं लसूण पेस्ट, तेल, मीठ चवीनुसार, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, धणे पावडर, चाट मसाला, टोमॅटो सॉस, पुदिना चटणी.
रोलसाठी- एका छोटय़ा बाऊलमध्ये मदा घेऊन त्यात दूध, पालक पेस्ट, चवीनुसार साखर, मीठ घालून कणीक मळून घेणे. त्याचे छोटे गोळे करून ते पाच मिनिटे तसेच ठेवणे, त्यानंतर त्यांना चपातीसारखे पातळ लाटून तव्यावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे.
सारणाची कृती : वरील सर्व भाज्या लांबट कापून घ्याव्यात. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, जिरा पावडर, सर्व भाज्या, टोमॅटो सॉस व चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून एकजीव करा.
आता तयार केलेल्या चपातीमध्ये वरील तयार झालेले सारण ठेवून त्याचा रोल तयार करा. तव्यावर थोडे तूप घालून शेकवून घ्यावे. त्यानंतर पुदिना चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.

Story img Loader