मिठाई हा आपल्या समाजजीवनाचा, संस्कृतीचा ठेवा आहे. आपल्याकडे तर मिठाईच्या इतक्या तऱ्हा की, सण कमी पडतील अशी अवस्था. त्यात आजकाल चॉकलेटने भर घातली आहे. पण चॉकलेट आलंय ते मिठाईला सोडून नाही, तर तिचा स्वाद पोटात घेऊन! हो, काही चॉकलेट निर्मात्यांनी मिठाईचा स्वाद असलेली चॉकलेट बनविण्यास सुरुवात केली आहे.. आणि का करू नये? कारण मिठाईचा सच्चा भक्त खूश झाला पाहिजे आणि चॉकलेटप्रेमीला त्याचा आवडता ब्रॅण्ड आणि चॉकलेटी चव मिळाली पाहिजे, हा त्यामागील उद्देश. म्हणजे सचिन तेंडुलकरला शतकासाठी सहा धावा हव्या आहेत आणि त्याने त्यासाठी षटकार लगावला, तर या दोन्ही गोष्टींचा जो आनंद मिळेल तो चॉकलेट आणि मिठाईच्या संगमातून मिळेल, असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक सणाचा एक स्वाद आहे. तो कुटुंबासोबत घेणे तर अधिक आनंददायी. पूर्वी ही मजा असायची. शहरात वा शहराबाहेर विखुरलेले आपले कुटुंबीय त्यानिमित्ताने एकत्र यायचे आणि खमंग खाद्यपदार्थ आणि नानाविध गोड पदार्थावर अक्षरश: ताव मारायचे. आजकाल हे सारे हरवत चालले आहे हा झाला त्यातील कडू भाग! पण गोड भाग, एकमेकांना मिठाई देण्याचा.. तो अजून सुरू आहे. ‘यूटय़ूब’वर ‘बॉम्बे शेफ’मधील माझ्या एका व्हिडीओमध्ये मी राजस्थानी पारंपरिक घेवरची रेसिपी समजावून सांगितली आहे. विशेष म्हणजे या माझ्या निर्मितीच्या दोन प्रतिक्रिया उमटल्या. त्यातील एक ‘पॉझिटिव्ह’ तर दुसरी अर्थातच ‘निगेटिव्ह’ होती. ज्यांनी ही रेसिपी आजमावून पाहिली त्यांनी तिचं कौतुक केलं, तर काहींना तळणासाठी अतीच तूप वापरणं फार काही भावलं नाही. मिठाईत तर हा त्रिवेणी संगमच असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा