आपल्याकडे चॉकलेटच्या बरोबरीने उच्चारला जाणारा पदार्थ म्हणजे बिस्किटं. नाताळच्या महिन्यात केकच्या बरोबरीने चॉकलेट्स आणि या कुकीजना विशेष महत्त्व आहे. नाताळचा महिना आणि कुकीज यांच्या घट्ट नात्याविषयी..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
डिसेंबर. कॅलेंडर वर्षांतील शेवटचा महिना. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील सर्वाना कामात व्यग्र ठेवणारा महिना. ‘बेकरी आणि पेस्ट्री’च्या जगात तर ही व्यग्रता आणखी व्यापून टाकणारी! या दिवसांत प्रचंड काम असतं, पण घडय़ाळाकडे दुर्लक्ष करत काम करतानाच तुमच्या कलात्मकतेला आव्हान देणारेही हेच दिवस असतात. असं काम ज्यातून तुमची सर्जनशीलता पणाला लागते आणि जगाला तुमच्यातले कला-गुण दाखवायला हेच तर निमित्त मिळतं. नवे मेन्यू तयार करायचे. चॉकलेटचे ‘शो पीसेस’, चॉकेलट केक्स, विविध प्रकारच्या कुकीज आणि सगळ्याची ख्रिसमस सेंट्रिक थीम.. तर डिसेंबरचा माहौल एकूण उत्सवी असतो खरा.
लहानग्यांना ख्रिसमसचे वेध जरा आधीच लागतात. शाळांनी छोटी सुट्टी जाहीर केल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता सगळ्यांचे सुट्टीचे प्लॅन्स तयार होतात. माझ्या बालपणी मी असाच नाताळची सुट्टी एंजॉय करायचो. आता मुंबई म्हटलं की सण साजरं करण्याचं तिचं ‘स्पिरिट’ अन्य कोणत्या देशात, शहरात असेल की नाही, माहीत नाही. कारण माझं बालपण याच ‘जागतिक शहरात’ गेलंय. सारे सण जातपात आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन साजरे करायचे, ही मुंबईची खासियत. मुंबईत ख्रिसमसच्या एक आठवडा आधी ख्रिस्तीधर्मीय मुलं ‘कॅरोल सिंगिंग’ला जात. एकमेकांच्या घरी कुकीज खाण्यासाठी आम्ही आवर्जून हजेरी लावायचो. पण मुंबईपेक्षाही ख्रिसमस म्हटल्यावर मला गोव्याचं आकर्षण वाटतं. पोर्तुगीजांची छाप या राज्यावर अजून आहे. गोव्याचं ऐतिहासिक संचित लक्षात घेता ख्रिसमस अधिक पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा गोव्यातला उत्साह अवर्णनीय आहे. या उत्साहात गोडाची भर असतेच. गोव्यात बनणाऱ्या अनेक स्थानिक मिठाया मी चाखल्या आहेत. त्यातील माझा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे नेवरी.. अर्थात आपल्या करंजीचा गोवन अवतार. भरपूर सुकामेवा आणि खोबऱ्याचं सारण भरून खमंग तळलेल्या या नेवऱ्या ख्रिसमसला आवर्जून केल्या जातात. दुसरा असाच पदार्थ म्हणजे दोदोल – नारळ आणि काजूची बर्फी किंवा टॉफी म्हणू या. हा परदेशी पदार्थ गोव्याची खास ओळख बनलेला. या आणि अशा कितीतरी डेलिकसीज ख्रिसमसच्या अगोदर तयार करून त्या आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना वाटायची पद्धत आहे.
मित्रमंडळींना नाताळची भेट म्हणून वाटायला जगात लोकप्रिय असणारा पदार्थ म्हणजे कुकीज. ख्रिसमस कुकीज. ट्रॅडिशनल ख्रिसमस केकच्या (येस.. याबद्दलपण मी बोलणार आहे.. पुढच्या लेखात नक्की!)बरोबरीने घराघरात वेगवेगळ्या ख्रिसमस कुकीज बनवल्या जातात. आपल्या देशात बिस्किट म्हणून ओळखल्या जातात त्या क्लासिक कुकीज. यात ‘शुगरकुकीज’ ‘जिंजरब्रेड’, ‘स्पर्टज् बटर कुकीज’, ‘थंबप्रिंट्स’, ‘शॉर्टब्रेड या नावांनी अनेक कुकीजचा समावेश असतो. पारंपरिक ख्रिश्चन कुटुंबात नाताळच्या महिन्यात सगळा परिवार हे ‘कुकी बेकिंग’ एंजॉय करतो. शुगर कुकीजचा गोळा घेऊन त्याचे निरनिराळे आकार तयार करणं हा तर लहान-थोरांचा आवडता उद्योग. घरातल्या सगळ्यांचा हात लागल्यावर त्या गोळ्याला काय काय आकार फुटतात.. हल्ली रॉयल आयसिंग कलर्स आणि कुकी टेम्पलेटचा (म्हणजे निरनिराळ्या आकारांचे साचे) वापर करत स्नोमॅन, ख्रिसमस ट्री, रेनडीअर, घंटा, स्लेज अशा सगळ्या नाताळमय आकारांच्या ख्रिसमस कुकीज घरी बनवता येतात. जगभरात या वेगवेगळ्या आकाराच्या होम बेक्ड ख्रिसमस कुकीजबरोबरच रम कुकीज, जिंजर कुकीज, जॅम कुकीज, ख्रिसमस फ्रूट कुकीज, स्पाइस्ड कुकीज, पम्पकीन कुकीज आणि चॉकलेट चिप कुकीज लोकप्रिय आहेत. ख्रिसमस ट्रीवर यातल्या काही कुकीज सजावट म्हणूनदेखील लावल्या जातात. ख्रिसमस आणि कुकीजचं घट्ट नातं आहे. या साऱ्याची सुरुवात झाली कुठून?
अमेरिकेत कुकीजची क्रेझ येण्याच्या कितीतरी र्वष अगोदरपासूनचा याला इतिहास आहे. तो थेट आपल्याला मध्ययुगीन युरोपात नेऊन पोचवतो. युरोयीननांमुळेच तर मसाले आणि सुकामेवा यांची इतर पाश्चिमात्य जगाला ओळख झाली. तर मध्ययुगापासूनच कुकीजवर नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात झाली होती. German Lebkuchen, Swedish Pepparkakor Norwegian Krumkake अशी जिभांना व्यायाम देणारी (टंगट्विस्टर्स) नावं त्या काळात प्रसिद्ध होती. १६व्या शतकात लोकप्रिय असलेल्या या कुकीज युरोपाच्या पलिकडे पोचल्या नव्हत्या. १७व्या शतकाच्या आरंभीला डचांमुळे कुकीजचा प्रसार झाला आणि त्या अमेरिकेत पोचल्या. पुढे आयात-निर्यातीच्या कायद्यात बदल झाल्यानंतर कुकीज कटर आणि कुकीजची टेम्पलेट्स जगभर पोचली आणि कुकीजची संस्कृती पसरत गेली. विविध आकारांतील कुकीज आज आपण ख्रिसमस ट्रीला लटकलेल्या पाहतो किंवा सजवलेल्या पाहतो, ही संस्कृती स्थिरावायला किमान तीन शतके जावी लागली आहेत.
माझ्यासाठी कुकी तयार करण्यातलं आवडीचं काम म्हणजे जिंजरब्रेडची छोटी छोटी घरं बनवणं. एखाद्याला भेट देण्यासाठी छोटय़ा जिंजरब्रेडपासून बनवलेलं घर असेल वा मोठय़ा जिंजरब्रेडपासून बनवलेलं एक हजार स्क्वेअर फुटांचं घराचं मॉडेल असेल, यातल्या टाइल्स जिंजर ब्रेड कुकीजच्या असतात. शिवाय व्हाइट शुगर आयसिंग, जेली स्वीट, मार्शमेलोज, जेम्सच्या गोळ्या, छोटय़ा कुकीज, कँडी स्टिक असा सगळा मेवा आणि जोडीला ढीगभर कापूस या घरांसाठीचा कच्चा माल असतो. जिंजरब्रेड हाऊस बनवण्याची ही परंपरा आली आहे जर्मनीमधून. जर्मनीतील न्यूरेम्बर्ग या शहराला जिंजरब्रेड कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात. १६ व्या शतकात या जिंजरब्रेडपासून कलात्मक गोष्टी बनवण्याच्या प्रथेला सुरुवात झाली. तत्कालीन उमराव व्यक्ती या कामासाठी निष्णात आणि कलात्मक दृष्टी असलेले बेकर्स शोधून त्यांची या कामी नेमणूक करीत. तीच पुढे घराघरात परंपरा म्हणून पाळली जाऊ लागली.
मी हे सगळं लिहित असतानाच मला ख्रिसमस जिंजर कुकीज भाजल्या जातानाचा सुगंध मोहवतोय. अर्थातच या नाताळसाठी कुकीजचा पहिला ट्रे माझ्या ओव्हनमध्ये गेलेला आहे. तुमच्यासाठी या माझ्या ख्रिसमस जिंजर कुकीजची खास रेसिपी देतोय.. ख्रिसमस केक घेऊन पुढच्या वेळी भेटूच.
ख्रिसमस जिंजर कुकी
साहित्य : २०० ग्रॅम ब्राउन शुगर, १७५ ग्रॅम सॉल्टेड बटर, ५० मिली. मध, १ अंडे, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, २ टीस्पून बेकिंग सोडा, १ टीस्पून दालचिनी पूड, २ टीस्पून जिंजर पावडर किंवा सुंठ, १ टीस्पून लवंग पूड आणि कुकी घोळवण्यासाठी दाणेदार साखर
कृती : अवन २०० अंश से. ला प्रीहिट करा. बटर पेपर लावून बेकिंग ट्रे तयार करून ठेवा.
एका मोठय़ा भांडय़ात/बोलमध्ये बटर आणि ब्राउन शुगर एकत्रित फेटा. त्यामध्ये मध आणि अंडं घालून एकजीव होईपर्यंत फेटत रहा. त्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि बाकीचे मसाले मिसळा. या साऱ्या मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून घ्या. एका बाजूने साखरेत घोळवून घ्या आणि बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. साखर लावलेला भाग वर राहिला पाहिजे. किमान तीन इंचांच्या अंतरावर दुसरा गोळा असाच साखर पेरून ठेवा. या पद्धतीने सगळ्या कुकीज ट्रेमध्ये लावून घ्या. २०० अंश सेल्सिअसवर साधारण १२ मिनिटं बेक करा. लगेच कुकी शीटवर गार होण्यासाठी ठेवून द्या. कुकीज थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवू शकतात. या होममेड कुकीज महिनाभर तरी डब्यात चांगल्या राहतात.