मिठाईला एक शाप आहे. ती नाशवंत आहे. मग ती कुणाला तरी भेट म्हणून दिली की झालंच.. शक्य तितक्या लवकर संपवा, खा, स्वाहा! कधी कधी काही तासांतही खराब होणाऱ्या मिठायाही आहेत बरं का काही हलवायांकडे! साखरेचं खाणार त्याला देव देणार, ही म्हण आता बाद करायची वेळ आलीय आपल्या लाइफस्टाइलमुळे. त्याऐवजी- गोडाचं खाणार त्याला ‘टेन्शन’ देणार असं काही तरी सूत्र जुळतंय. त्यामुळे या पटकन संपवा कॅटॅगरीतल्या मिठाईचं टेन्शन असतं अनेकांना. सध्याच्या उत्सवी काळात तर कुणाच्या घरी जाताना मिठाई न्यावी, तर जिवावर येतं ते यासाठीच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मी एक ठरवून टाकलंय की, उगाचच ताण आणणाऱ्या मिठाईला भेट म्हणून द्यायचंच नाही. त्याऐवजी चॉकलेट हा माझा सर्वात आवडता पर्याय आहे. चौकोनी कुटुंबात चॉकलेट भेट अगदी सर्वोत्तम पर्याय आहे. नाही तर मिठाई संपविण्याचीच चिंता आजच्या ‘न्यूक्लिअर फॅमिली’ना जास्त! त्यामुळे नातलग, शेजारीपाजारी, मित्रमंडळींना अशी भेट देण्याचा मूळ उद्देशच मग हरवून जातो. गेल्या वर्षी मी घरी बनवलेलं ‘चॉकलेट गणपती’चं मॉडेल मी माझ्या निकटवर्तीयांना भेट दिलं होतं. मागील लेखात मी त्याच्या निर्मितीविषयी लिहिलंय.
गेली १५ वर्षे मी चॉकलेटनिर्मितीच्या क्षेत्रात वावरत आहे. नपेक्षा प्रयोगशील आहे. विविध देशांचे दौरे केले आणि त्या त्या देशांच्या सर्वोच्च नेतृत्वाला माझ्या कलाकारीची झलक दाखवण्याची संधीही मला मिळाली. शेफ आणि चॉकलेटिअर म्हणून विविध संस्थांसाठी काम करताना जागतिक नेत्यांना माझ्या हातचा मेन्यू सव्र्ह करण्याचीही संधी मिळाली. या क्षेत्रात काम केल्यामुळे मला असे काही लाइफ टाइम एक्सपिरिअन्स मिळतात. बराक ओबामा, निकोलस सारकोझी, व्लादिमीर पुतिन यांना चॉकलेटच्या मोहात पाडण्याचं भाग्य मला लाभलं. यातील मोजक्या नेत्यांना आपल्या मोदकांची चवही चाखायला लावण्यात यशस्वी ठरलो. मला आठवतंय, ते ओबामा यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य. काही वर्षांपूर्वी ओबामांसमोर आपल्या लाडक्या बाप्पांचा लाडका मोदक ठेवला तेव्हा ‘दॅट्स एक्झ्ॉक्टली लाइक स्वीट स्टीम्ड कोकोनट डिम्सम’ असं काही म्हणाले. मीही हसून उत्तरलो, ‘हे त्याच्याहून अधिक चांगलं आहे.’ जगातल्या सर्वात ताकदवान नेत्याशी एखादं वाक्य का होईना, बोलण्याचं भाग्य असं अनेकांना मिळत नाही. म्हणूनच मी स्वतला भाग्यवान समजतो. हे असे अनुभव म्हणजे मी मिळविलेलं संचित आजही माझ्यासोबत कायम आहे. म्हणून मला पुन्हा सांगावंसं वाटतं की, मिठाई हे एक माध्यम आहे.. सर्वाशी नातं जोडण्याचं.
आपण नातेवाईकांना, आप्तांना भेट म्हणून मिठाई नेतो, तेव्हा त्यांचा विचार करूनच न्यायला हवी. लवकर खराब होणारी मिठाई कुणाला तरी वाटून टाकण्याचा कल वाढतो आणि मिठाईचा उद्देशच नष्ट होतो. विदेशी मूळ असलं तरी चॉकलेट आज आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनलं आहे. ते मिठाईची जागा घेणार नाही, पण नाशवंत मिठाईच्या गिफ्टला पर्याय ठरू लागलं आहे हे निश्चित. ‘कॅडबरी’ आणि ‘नेसले’नं या पर्यायाची आपल्याला सवय लावली. या दोन ब्रँड्सनी भारतीय बाजारपेठेत ‘चॉकलेट भेट’ हा ‘ट्रेण्ड’ रुजवला आणि वाढवला. त्यामुळे आता इतक्या वर्षांनंतरदेखील या दोन ब्रॅण्ड्ससोबत आपलं भावनिक नातं जुळलेलं आहे. चॉकलेटच्या मेडिसिनल पॉइंटनं विचार करता, चॉकलेट खाल्ल्यानंतर एण्डोर्फिन नावाची संप्रेरकं निर्माण होतात. त्यातून मेंदू दीर्घकाळ उल्हसित राहू शकतो. ही चॉकलेटमधल्या कोकोची कमाल. त्यामुळेदेखील चॉकलेट एकमेकांना भेट देण्याचं प्रमाण जगभर जास्त आहे. पुन्हा लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांना चॉकलेट आवडतं. त्यामुळे ही भेट सोयीचीही ठरते. आपल्याकडे डार्क चॉकलेटचे प्रेमी वाढताहेत. उत्तम दर्जाच्या चॉकलेटमध्ये ७० ते ८५ टक्के कोको असतं. निष्ठावान चॉकलेटप्रेमींना या अशा गोष्टींचा अभिमान असतो.
चॉकलेट्सपासून बनवलेली डेझर्ट्स लोकप्रिय होत आहेत. ‘चॉकलेट डेझर्ट’मध्ये ‘चॉकलेट ट्रफल केक’चं स्थान व्हॅनिला आईस्क्रीमसारखंच ‘कॉमन’ झालं आहे. कॉमन तरीही क्लासिक. जर काय घ्यावं, याचा तुमचा निर्णय होत नसेल तर हमखास ‘चॉकलेट ट्रफल’ आहेच. पण सध्या बाप्पा घरी आले आहेत. त्यामुळे अर्थातच मोदकाचे दिवस आहेत.. अलबत चॉकलेट फ्लेवरच्या! ती रेसिपीही तुम्हाला देऊन टाकतो. तुमच्या आवडत्या चॉकलेट ट्रफलविषयी बोलूच निवांत. मोदकांच्या अन्य प्रकारांसाठी तुम्ही यू टय़ूबवर ‘द बॉम्बे शेफ’ नावाने सर्च करू शकता.
गुलकंद चॉकलेट मोदक
साहित्य : पारीसाठी : तीन कप पाणी, तीन कप तांदळाची पिठी, १ टेबल स्पून तूप, पाव टीस्पून मीठ.
सारणासाठी : १ टेबलस्पून तूप, दोन कप खोवलेला नारळ, पाव कप डार्क चॉकलेट (किसून), पाव कप गुलकंद, पाव टीस्पून बडीशेप पावडर, पाव टीस्पून वेलची पावडर, २ टेबलस्पून कापलेले टुटी फ्रुटी, २ टेबलस्पून कापलेले बदाम.
कृती : जाड बुडाच्या पातेल्यात पाणी गरम करा. त्यात मीठ आणि तूप घालून उकळी येऊ द्या. त्यात तांदळाचं पीठ मिसळून ते चांगलं ढवळा. पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते पाच मिनिटं वाफ येऊ द्या. वाफवून घेतल्यानंतर उकड बाऊलमध्ये काढून घ्या आणि हात घालण्याइतपत कोमट झाल्यावर हाताने चांगली मळून घ्या. अगदी मऊसर आणि हाताने वळण्यासारखी उकड होण्यासाठी गरज वाटली तर थोडा पाण्याचा वापर करा. झाकून ठेवा.
आता दुसऱ्या एका पातेल्यात तूप घाला. त्यात खोबरं घालून अर्धा मिनिट ढवळून घ्या. आच बंद करा. त्यानंतर सारणाचं राहिलेलं सर्व साहित्य मिसळून चॉकलेट वितळेपर्यंत पुन्हा गरम करा. चांगलं एकजीव करा आणि थोडं निवू द्या.
आता तयार उकडीची हाताने पारी करून त्याला कळ्या पाडत खोल वाटी करून घ्या. त्यामध्ये सारण भरून मोदकाचा आकार देत बंद करा. असे सगळे मोदक तयार केल्यानंतर मोदकपात्र, इडलीपात्र किंवा स्टीमरमध्ये पाणी गरम करून त्यावर केळीचं पान अथवा बटर पेपर लावा आणि त्यावर अलगद मोदक ठेवा. झाकण ठेवून १० मिनिटं मोदक वाफवून घ्या.
– वरुण इनामदार
(अनुवाद : गोविंद डेगवेकर)