समझ नहीं आता के जिंदगी यादें हैं

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या यादें ही मेरी जिंदगी बन गई हैं

स्पॉटीफायवर प्रसारित होणाऱ्या ‘वायर्स २०६२’ या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फझल यांनी एक कथा सांगितली आहे. या पॉडकास्टच्या ‘कहानी मेरे बचपन की’ या भागात पीटर नावाचा ३९ वर्षांचा माणूस टाइम ट्रॅव्हल करून मुंबईत येतो. मालती नावाच्या एका बाईला परदेशात जाण्यापासून थांबवण्यासाठी तो येतो. पण पोलीस त्याला रस्त्यातच अडवतात. त्याला एका मनोरुग्णालयात नेले जाते. तिथे त्याची भेट गायत्री राजपूत नावाच्या डॉक्टरशी होते. तिला सांगताना तो सगळं खर सांगतो आणि म्हणतो अजून चार आठवडयांनी तुला विश्वास बसेल की मी भविष्यातून आलो आहे आणि तू माझ्या आई वडिलांचे लग्न लावशील. मग माझा जन्म होईल आणि मी आयुष्यभर कसे तुझ्यामुळे माझे आई वडील भेटले ही गोष्ट ऐकेन. पुढे तो म्हणतो तू मला आता कुठे ओळखू लागली आहेस, पण माझं आयुष्य तुझ्याबद्दल ऐकण्यातच गेलं आहे. या भागाचा शेवट करताना ‘समझ नहीं आता के जिंदगी यादें हैं, या यादें ही मेरी जिंदगी बन गई हैं’ हा शेर अली फझलने ऐकवला आहे.

मला अभिनयाची आवड आहे. मला लहानपणापासून अभिनय क्षेत्रात काम करायचं आहे. मी एकांकिका आणि शॉर्ट फिल्मसाठी काम करतो. मी पॉडकास्ट ऐकत नाही, पण मला माझ्या दिग्दर्शकांनी हा पॉडकास्ट ऐकण्यासाठी सांगितलं. हा पॉडकास्ट ऐकायला सुरुवात केल्यानंतर मला वाचिक अभिनय काय असतो हे लक्षात येत गेलं. पॉडकास्ट सादर करणाऱ्या व्यक्तीला आपण बघू शकत नाही, त्यामुळे त्यांचा आवाज खूप जास्त प्रभावी ठरतो. हा पॉडकास्ट ऐकताना ती कथा आपल्या डोळय़ासमोर घडते आहे असं वाटत राहतं. त्यातही ‘कहानी मेरे बचपन की’ या भागात अली फझल कसा टाइम ट्रॅव्हल करून आला हे सांगत असताना खरोखर आश्चर्यचकित व्हायला होतं. त्यामुळे मला हा भाग अधिक आवडतो.

उमेश हाडवळे (विद्यार्थी / कलाकार)

शब्दांकन: श्रुती कदम

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The wires 2062 podcast airs on spotify richa chadha ali fazl story amy
Show comments