‘कठीण आहे ! मराठी भाषेचं काही खरं नाही. आजकालची ही मुलं चांगलं मराठी काही वाचतच नाहीत. आमच्या वेळी मर्ढेकरांच्या कविता अंतर्मुख करून सोडायच्या, कुसुमाग्रजांना वाचून स्फुरण चढायचं! पु. लं.च्या प्रवास वर्णनांनी कितीतरी संस्कृतींशी ओळख करून दिली. पण हल्ली वाचनसंस्कृतीच लोप पावतेय, मराठी साहित्य तर मुलांना ओळखीचंही वाटत नाही..’ असा हा न संपणारा जुन्या पिढीचा आक्रोश! खरोखर काय परिस्थिती आहे? हे जाणून घेऊन आजच्या मराठी दिनी ते ‘व्हिवा’मधून मांडायचं ठरवलं. हल्लीचे विद्यार्थी वाचत नाहीत या आरोपात तथ्य आहे का, त्यात मराठी साहित्य किती प्रेमानं वाचलं जातं आणि नेमकं काय, कसं आणि कधी वाचतात हे जाणून घेण्यासाठी पुणे आणि मुंबईतल्या प्रातिनिधिक १०० मुलांना याविषयी बोलतं केलं. त्यांना या आरोपांविषयी काय वाटतं ते विचारलं. त्यातून उलगडलेल्या काही उत्तरांचा हा संपादित अंश..
मराठी भाषा दिनाच्या औचित्याने महाविद्यालयीन तरुणाईशी वाचन या विषयावर गप्पा मारल्या. मुंबई आणि पुण्याच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या १०० जणांशी साहित्यविषयक संवाद साधला, त्यातील ५० टक्के विद्यार्थी मानव्य शाखांचा अभ्यास करणारे होते, त्यातले ३५ टक्के मराठी साहित्याचा अभ्यास करणारे होते. तरुणाईचा आवडता साहित्यप्रकार कादंबरी असल्याचे त्यांच्याशी बोलताना समोर आले. ३४ टक्के विद्यार्थी कादंबरीला प्राधान्य देतात. १६ टक्के कथा, १६ टक्के चरित्र, १० टक्के विज्ञान साहित्य प्राधान्याने वाचतात तर केवळ ९ टक्के काव्य प्राधान्यक्रमाने वाचतात. ४७ टक्के विद्यार्थी लेखकाऐवजी विषयाला प्राधान्य देतात.
इ साहित्य कट्टा
‘आमच्या वेळी दिवसाला एक पुस्तक संपायचं. परवडायचंही नाही, म्हणून मिळेल ती संधी, मिळेल ते पुस्तक घेऊन वाचायचो. वाचलेल्यावर चर्चा करायचो पण इथे..वाचनाचीच बोंब! चर्चा कसल्या चालतायेत! मोबाइलमधून यांना सवड मिळेल तर ना!..’ हे असं अनेक वेळा नव्या पिढीला ऐकावं लागतंच. मुलं मोबाइलवर एवढा वेळ नेमकं काय करतात असा प्रश्न पालकांना पडत नाही का? ‘जी साहित्यिक चर्चा आधीच्या पिढीतील मंडळी भेटून करायची, ती आम्ही इथे करतो..मोबाइलवर. आमचे साहित्य कट्टे इथे भरतात’, वाचन हा कॉमन इंटरेस्ट असलेले विद्यार्थी आवर्जून नमूद करतात. असाच एक पुण्यातील व्हॉट्सअॅप ग्रुप! इंजिनीिरग कॉलेजचे विद्यार्थी.. त्यामुळे साहित्याची आवड आणि जाण असलेली मंडळी इथे कमी असल्याने नियमित साहित्य वाचनास उत्सुक असलेल्यांचा एक ग्रुप तयार करावा असं एम.आय.टी.मध्ये शिकणाऱ्या दिशाला वाटलं. ओळखीच्या चार लोकांना सोबत घेऊन तिने हा ग्रुप तयार केला. हळूहळू त्याचा आवाका वाढला, मत्री वाढली, ओळख झाली. आज ग्रुपमधील सदस्यांकडून नियमितपणे पुस्तकांची देवाणघेवाण चालू असते. सर्वानाच एका वेळी प्रत्यक्ष भेटणं शक्य नसल्यामुळे वाचलेल्या पुस्तकांविषयी व्हॉट्सअॅपवर तासान्-तास चर्चा चालते. पुस्तकं जमवायची असतील तर ती राद्दीवल्याकडूनही मिळवता येतात. पण ‘झपूर्झा’ रद्दीत सापडण्याइतकी दुसरी खंत नाही, असंही दिशाच्या ग्रुपमधले मेंबर्स कबूल करतात.
तरुण पिढी मराठी वाचते?
‘कठीण आहे ! मराठी भाषेचं काही खरं नाही. आजकालची ही मुलं चांगलं मराठी काही वाचतच नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-02-2015 at 01:58 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The young generation reads marathi