उन्हाळ्याची सुरवात झाल्यावर स्वतला प्रेझेंटेबल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेझेंटेबल राहण्यासाठी काय करायला हवं याकरता ईशा कोप्पीकर काही खास टिप्स आपल्या सोबत शेअर करतेय..
* उन्हाळय़ाला सुरुवात म्हणजे त्वचा रखरखीत आणि कोमेजलेली बनणं. उन्हाळय़ाच्या काळात स्वत:ला थंड आणि ताजतवानं राखणं याला माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. पुदिन्यासारखे नसíगक घटक याकामी खूप उपयुक्त ठरतात.
* सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचं रक्षण करणं आणि तिला योग्य पोषण पुरवणं अत्यंत गरजेचं असतं. उन्हाळय़ाचा सर्वाधिक परिणाम त्वचेवर दिसत असल्याने या काळात दिवसभर त्वचा तजेलदार आणि सुंदर राखणं खरोखरच कठीण बनतं. उन्हाळय़ात त्वचेला आद्र्रतेची गरज नसते, हा गरसमज आहे. घाम आणि कोरडय़ा उष्णतेमुळे त्वचेतली आद्र्रता मोठय़ा प्रमाणावर कमी होते. त्यामुळे त्वचेला हलक्या आद्र्रतेची अत्यंत गरज असते.
* खोबरेल तेलाचा बेस असलेली आणि पुदिन्यासारखा ताजेपणा देणाऱ्या घटकाचा समावेश असलेली मॉइस्चरायझर्स याकामी उपयोगी ठरतात. त्यामुळे उष्णतेच्या कडाक्यातही त्वचा ताजीतवानी राहते.
* थोडक्यात सांगायचं तर उन्हाळा हा आपल्या त्वचेसाठी ‘वैशाख वणव्या’सारखा असतो. कडक ऊन, डिहायड्रेशन, टॉनिंग, चिकटपणा आणि दरुगधी अशा अनेक दिव्यांतून त्वचेला जावं लागतं. खरं तर अशा वेळी त्वचेला इतर काळापेक्षा अधिक मॉइस्चरायिझगची गरज असते.
* नैसर्गिक घटकांचा समावेश असणाऱ्या मॉइस्चरायझर्सना मी प्रथम पसंती देते. खोबरेल तेलाचा बेस असलेली नसíगक मॉइस्चरायझर्स त्वचेत आतपर्यंत झिरपतात. ती त्वचेत सहजपणे शोषली जात असल्याने त्वचेला आद्र्रता तर मिळतेच शिवाय ती चिकटही दिसत नाही. दुसरा माझ्या आवडीचा घटक म्हणजे पुदिना. पुदिन्यामुळे त्वचेला झटपट थंडावा मिळतो आणि ती अगदी उष्ण दिवसांतही टवटवीत राहते.
* या काळात आपल्या शरीराचा गंधही ताजातवाना असला पाहिजे. मला दीर्घकाळ टिकणारे सुगंध आवडतात. या गंधांमुळे आपण दीर्घकाळासाठी ताजेतवाने राहतो.
* तीव्र उन्हापासून वाचणं आवश्यक असल्याने सनस्क्रीन वापरणंही तितकंच गरजेचं आहे. तजेला आणि सनस्क्रीनचं संरक्षण असा दुहेरी फायदा देणाऱ्या उत्पादनाला यंदा माझी पसंती असेल.
* मी माझ्या केसांना सर्व प्रकारच्या स्टाइिलग ट्रिटमेण्टपासून मुक्ती दिलेली आहे. आता मी नसíगक आणि सेंद्रिय गोष्टींचाच वापर करते. घामापासून मुक्तता मिळण्यासाठी मी आठवडय़ातून तीनदा केस धुते आणि त्यांना कंडिशनरही लावते. धुण्यापूर्वी केसांना खोबरेल तेलाने मालिश करायला मी विसरत नाही.
समर टिप्स
उन्हाळ्याची सुरवात झाल्यावर स्वतला प्रेझेंटेबल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेझेंटेबल राहण्यासाठी काय करायला हवं याकरता ईशा कोप्पीकर काही खास टिप्स आपल्या सोबत शेअर करतेय..
First published on: 15-03-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips for looking presentable during the summer season