विविध उत्पादन पाहा
तुम्हाला हवी असलेली उत्पादने विकणाऱ्या अनेक ऑनलाइन शॉिपग साइट्स आहेत. विश्वासार्ह वेबसाइटवरून खरेदी करणे हा उत्तम पर्याय असून विविध वेबसाइट्स आणि व्यापाऱ्यांकडील त्याच्या किमतीची तुलना करणे हा स्मार्ट पर्याय आहे.
स्मार्ट टीप-
सर्वसाधारणपणे बाजारात लोकप्रिय असलेले उत्पादन विकणाऱ्या वेबसाइटवर बेस्ट डील उपलब्ध असू शकेल. कारण अनेक प्रतिष्ठित विक्रेते ती वस्तू विकत असतील आणि त्यांच्यामध्ये व्यवसायवृद्धीसाठी मोठी स्पर्धा असेल.
कुपन्सचा वापर करा
काही ऑनलाइन स्टोअर्स नियमित ग्राहकांना डिस्काऊंट देणारे, काही प्रमोशनल कोड्स देतात. त्याचा उपयोग काही उत्पादने किंवा काही पेमेंट पर्यायांमध्ये करता येतो. तुम्ही खरेदी करताना हे कोड्स वापरा, त्यामुळे तुमची बचत होईल. क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ईएमआयच्या माध्यमातून खरेदी केली तर तुमची बँकही तुम्हाला काही सवलती देईल.
स्मार्ट टीप : हे कुपन्स निश्चित कालावधीसाठीच वैध असतात. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी त्यांचा वापर करा.
रोख व्यवहार थांबवा
इंटरनेटच्या जगात प्लॅस्टिक मनी सर्वश्रेष्ठ आहे. क्रेडिट कार्डचा वापर केल्याने तुम्ही खरेदीसाठी दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेची मदत घेऊ शकता.
सुरक्षित पेमेंट गेट-वेवर केलेले ऑनलाइन पेमेंट तुम्हाला खरेदी केलेली वस्तू तुमच्यापर्यंत सुलभ आणि लवकर पोहोचेल याची खात्री देते.
स्मार्ट टीप – पूर्णपणे सुरक्षित ऑनलाइन खरेदीचा अनुभव घेण्यासाठी इ-बे इंडियावर पैसा पेचा उपयोग करून पेमेंट करा. तुमचा पैसा सुरक्षित असेल आणि तुमची वस्तू तुम्हाला मिळाल्यानंतरच तो विक्रेत्याला दिला जाईल.
अलार्म लावून ठेवा
काही आघाडीच्या ऑनलाइन शॉिपग साइट्स दिवसातील ठरावीक कालावधीत आकर्षक ऑफर्स देतात. उदा. इ-बे इंडियावर सकाळी ११ वाजता वेकअप कॉल असतो. तुम्ही याच वेळेत लॉग-ऑन कराल याची खात्री करा. त्यामुळे तुम्हाला विविध ऑफर्सची माहिती मिळेल. या ऑफर्स आकर्षक असतात, त्या चुकवू नका.
स्मार्ट टीप – कुठलीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिच्या वैशिष्टय़ांचा नीट अभ्यास करा. तुमच्या गरजा आणि बजेटमध्ये बसणाऱ्या वस्तूचीच खरेदी करा. या डिल्स तुमचा चांगला फायदा करून देतील.
आता खरेदी करा, पैसे नंतर द्या
अनेक प्रतिष्ठित शॉपिंग वेबसाईट तुम्हाला तुमच्या महागडय़ा गॅजेटच्या खरेदीसाठी ईएमआयची सुविधा देतात. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली वस्तू खरेदी करा आणि आगामी सहा महिन्यांत त्याचे पैसे भरा.
स्मार्ट टीप – ई-बे इंडिया ईएमआयवर उपलब्ध असलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी सुलभ सर्च करण्याची सुविधा पुरविते. डाव्या बाजूला असलेले-सर्च फिल्टर वापरून ईएमआयवर उपलब्ध असलेल्या वस्तू निवडा. तुम्ही एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा सिटी बँकेचा उपयोग ३ किंवा ६ महिन्यांच्या ईएमआयसाठी करू शकतात.
तुमचे इमेल, फेसबुक आणि ट्विटर चेक करा
उत्कृष्ट ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी नेहमी ऑनलाइन शॉिपग साइट्सच्या होम पेजवर जाऊन डायरेक्ट मेलर्स तसेच फेसबूक पेज चेक करा. इ-बे त्यांच्या ग्राहकांना लेटेस्ट ऑफर्सचे मेल पाठविते. काही बेस्ट डिल्स या इ-मेलमध्ये आणि होम पेजवर मिळू शकतात.
स्मार्ट फोन वापरा
प्रवास करत असताना स्मार्ट फोन आणि टॅबलेटचा वापर करून खरेदी करणे हा अतिशय सुलभ पर्याय आहे. तुमचा खरेदीचा अनुभव आणखी समृद्ध करण्यासाठी शॉिपग वेबसाइट विविध अॅप्स वेबसाइटची मोबाइल व्हर्जन पुरवतात.
शॉपिंग आनंद स्मार्ट पद्धतीने घ्या
तुम्ही या टिप्सचा वापर करत आहात याची खात्री करा. शेवटी तुमचा खरेदीचा अनुभव आनंददायी होण्यासाठीच हे सर्व आहे. तुमच्या लॅपटॉप अथवा स्मार्टफोनवर लाखो उत्पादने पाहा, निवडा आणि खरेदी करा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा