निरोगी जीवनशैलीचा अंगीकार केल्यास वरील परिस्थितींना समर्थपणे तोंड देणं शक्य आहे. निरोगी तसंच रोगमुक्त राहण्यामध्ये आहाराची महत्त्वाची भूमिका असते. खालील गोष्टींचा आवर्जून अंगीकार केल्यास पावसाळा सुखद आणि निरोगी जाईल.
^ हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या भाज्या आणि फळं जसं, गाजर, सफरचंद, पपई, प्लम, डािळब आदींचं सेवन करावं. त्यात भरपूर फायबर असतं आणि ते शरीरातले अनावश्यक घटक काढून टाकण्यास मदत करतात. सर्वसामान्य परिस्थितीपेक्षा पावसाळ्यात रोगजंतूंचं प्रमाण दहापटीने वाढतं. त्यामुळे स्वयंपाकासाठी किंवा भाज्या धुण्यासाठी शक्यतो कोमट पाण्याचाच वापर करावा. त्यापूर्वी त्यात मीठ घालावं. अशाने त्यातले रोगजंतू मरण्यास मदत होते.
^ आश्चर्याची बाब म्हणजे कारलं, कडुिनब, मुळा, मेथी अशा सर्व कडवट चवीच्या भाज्यांमध्ये अॅण्टि-ऑक्सिडण्टस असतात, जे शरीरात निर्माण होणाऱ्या सर्व गोष्टींसाठी घातक असतात. हळद ही उत्तम अॅण्टि-सेप्टिक असल्याने दररोज स्वयंपाकात छोटा चमचाभर हळद अवश्य वापरावी.
^ आपलं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी सतत पाणी पित राहणं आवश्यक आहे. पण नेहमी उकळलेलं पाणीच प्यावं. हर्बल टी, जस्मिन टी, ग्रीन टी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
^ नेहमी व्यायाम करावा. पावसाळ्यात बाहेर व्यायाम करणं कदाचित शक्य नसेल, पण घरच्या घरी योग, पायलेट्स, साधे स्ट्रेचेस, सूर्यनमस्कार आदी वॉर्मअप प्रकारातील व्यायाम करावेत.
^ घसा खराब झाल्यास मीठ घातलेल्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. तसंच सर्दी झाल्यास गरम पाण्याची वाफ घ्यावी. विषाणूंमुळे ताप आल्यास किंवा जंतुसंसर्ग झाल्यास आलं हा सर्वोत्तम घरगुती उपाय आहे. कपभर आल्याचा चहा किंवा सुंठ घातलेलं उकळलेलं पाणी प्यावं. त्याने बराच फायदा होईल.
^ शेवटचं, पण महत्त्वाचं. दिवसातून दोनदा अॅण्टि-सेप्टिक साबणाने आंघोळ करून स्वतची काळजी घ्यावी. तसंच घरातही स्वच्छता ठेवावी. त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येईल.
^ गरमागरम वडापाव, भज्या किंवा चहाची कितीही भुरळ पडली तरी ते टाळणं उत्तम. त्यामुळे जंतुसंसर्ग होणार नाही. कधीतरी एकदा असं खाणं ठीक आहे. पण त्याची सवय वाईट.
^ बर्फाचा गोळा, ज्यूस, कुल्फी अशा माध्यमांतून बाहेरचं पाणी अजिबात पिऊ नये. कारण पावसाळ्यात सर्वाधिक आजार पाण्यामुळे होतात. त्यातला सर्वात गंभीर आजार म्हणजे कॉलरा.
^ कच्च्या भाज्या आणि पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात जंतू असतात. त्यामुळे अशा भाज्या पावसाळ्यात अजिबात खाऊ नयेत. तरीही त्या खायच्या झाल्यास ब्लांचिंगसारखे उपाय योजावेत.
^ तळलेल्या पदार्थामधून सर्वाधिक संसर्गाचा धोका असल्याने त्यांचं सेवन टाळावं.
^ चहा आणि कॉफीच्या अतिरिक्त सेवनाने शरीरातलं पाण्याचं प्रमाण खालावून त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्यामुळे ग्रीन टीसारखा पर्याय निवडावा.
^ पावसाळा हा वर्षांतला सर्वात उत्साहवर्धक ऋतू आहे. त्यामुळे त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा, पण त्याच जोडीला स्वतची शक्य तेवढी काळजीही घ्यावी. आहार आणि एकंदरीत जीवनशैलीवर लक्ष ठेवल्यास अनेक संसर्गापासून दूर राहू शकाल. त्यामुळे पावसाची मजा दुप्पट होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा