अॅण्ड ऑस्कर गोज टू..
जागतिक चित्रपटविश्वात सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ‘ऑस्कर’पुरस्कार सोहळा लॉस एन्जल्समधील डॉल्बी थिएटरमध्ये गेल्या रविवारी झाला. आठवडय़ाच्या सुरुवातीला सगळ्या नेटवर्किंग साइट्सवर ‘ऑस्कर १५’चाच ट्रेण्ड दिसत होता. ८७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपटांतली चुरस, आपापल्या आवडीच्या कलावंतासाठी केलेली प्रार्थना आणि बांधलेल्या आडाख्यांचं काय होईल, याची उत्सुकता या सोहळ्यादरम्यान अनेकांना लागली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट बर्डमॅन, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आलियांद्रो जी. इनारितो (बर्डमॅन), सर्वोत्कृष्ट अभिनेता- एडी रेडमाइन (द थिअरी ऑफ एव्हरीिथग), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- ज्युलियन मूर (स्टिल अॅलिस), परदेशी भाषांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट- इडा (पोलंड), सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री- पॅट्रिशिया अॅराक्वेट (बॉयहूड), सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता- जे. के. सिमन्सन, सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म- क्राइसिस हॉटलाइन यांसह विविध विभागांतील पुरस्कार वितरित करण्यात आले. ‘ऑस्कर15’ या हॅशटॅगसह एडी रेडमाइन, ज्युलियन मूर, पॅट्रिशिया, सिमन्सन आदींचा ट्रेण्ड ट्विटरवर सर्वाधिक होता. ऑस्करला परफॉर्म करणाऱ्या लेडी गागा चं नावंच जास्त वेळा ट्विट केलं गेलं. शिवाय ‘ऑस्कर15’ हा ट्रेण्ड ‘फेसबुक’सह अन्य माध्यमांतही वरचढ ठरला.
ट्विटरवर जगभरातून ऑस्करसंबंधी अपडेट्स उमटत होते. त्यामध्ये भारतीय सेलेब्रिटीही मागे नव्हते. अमिताभ बच्चन, परिणिती चोप्रा, आलिया भट्ट यांनी ऑस्करविषयक अपडेट्स ट्विटरवरून दिले.
मौका मौका.. मिल गया..
चिमुरडय़ांसाठी ‘गुगल’चं ‘यू टय़ूब’ अॅप
‘गुगल’नं चिमुरडय़ांसाठी खास ‘यू टय़ूब’ अॅप तयार केलंय. हे अॅण्ड्रॉइड मोबाइल नि टॅब्लेटवर उपलब्ध होतंय. या ‘यू टय़ूब किड्स अॅप’च्या माध्यमातून मुलांच्या हाती चांगली माहिती लागावी, हा उद्देश आहे. १२ वर्षांखालील मुलांसाठीच्या या अॅपमध्ये विविध टय़ून्स व्हिडीओ, किड्स टीव्ही शो, लहान मुलांसाठीची विविध प्रकारची माहिती उपलब्ध होईल. या अॅपला किड-फ्रेण्डली डिझाइन दिलं गेलंय. अॅपमधील आयकॉन मोठे आहेत. मात्र स्क्रोिलग फार असणार नाही. या अॅपमध्ये टायमरच्या सोयीमुळं पालकांना आपल्या मुलानं किती वेळ अॅप वापरायचा ठरवता येईल.
‘ट्विटर’वरचे हिंदी हॅशटॅग नि सेलेब्ज मिडल नेम
श्रद्धांजली नि निषेधही
ट्विंकल ट्विंकल
हिरॉइन टि्वकल खन्नाचं या आठवडाभरात ‘ट्विटर’वर ट्रेंिडग होतं. ट्विंकलनं ब्लॉगच्या माध्यमातून विविध मुद्दय़ांवर सडेतोड भूमिका घेतलेय. तिनं ‘एआयबी रोस्ट’चं समर्थन केलं असून मुंबईला बॉम्बेच म्हणणार, असा निर्धारही व्यक्त केलाय. त्यावरही उलटसुलट चर्चा नेटकरांमध्ये रंगली होती.
राधिका कुंटे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा