हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उपदेशाचे डोस ट्विटरवर
सोशल मीडियावर सर्रासपणे वेगवेगळे कोट्स, थॉट्स फॉरवर्ड केले जातात. कधी ते फक्त शब्दांत असतात, कधी ते शब्दचित्रांतून व्यक्त होतात. एकूणातच माणसाला दुसऱ्याला सल्ला द्यायला नि उपदेशाचे डोस पाजायला भारीच आवडत असावं. ही वृत्ती लक्षात घेऊन ‘ट्विटर’वर सध्या #गुडअॅव्हाईसइन4वर्डस् हा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये आहे. केवळ चार शब्दांत सल्ला देण्याचं हे आवाहन ट्विटरकरांनी भलतंच मनावर घेतलेलं दिसतंय. ‘बी स्ट्राँग बी ब्रेव्ह’, ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ अशा पॉझिटिव्ह थॉट्सपासून ते ‘गो ग्रीन’पर्यंत आणि ‘प्रेमात पडू नका’, ‘कॉलेजला जाऊ नका’, ‘अमका पिक्चर किंवा गाणं बघा’ असे चित्रविचित्र उपदेश नि सल्ले ट्विट केले जाताहेत.
मोबाइल लाइफ
‘दुनिया सच में मुठ्ठी में समा गयी हमारी’, या वाक्याचं नवल वाटण्याचे दिवस केव्हाच मागे सरलेत. अजिबात घाबरू नका. मोबाइलचे फायदे-तोटे असा निबंध तुम्हाला मुळीच वाचायला लागणार नाहीय. तुमच्यासारख्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्यांना त्यात नवीन काहीच नाहीय. पण ते व्हिज्युअली दिसलं किंबहुना पाहिलं तर त्यावर विचार नक्कीच करता येऊ शकेल. ‘यूटय़ूब’वरील ‘देसी रॉकीज’च्या या व्हिडीओत आपलं आयुष्य स्मार्टफोनविना कसं होतं नि त्याच्यासह कसं आहे, ते दाखवलं गेलंय. त्याची ही लिंक-
https://www.youtube.com/watch?v=cE6Z0P3NN60
‘अगं बाई अरेच्चा पार्ट२’ आणि ‘गब्बर इज बॅक’
https://www.youtube.com/watch?v=1eMxVXlC57Q&feature=youtu.be
‘आप’चा ब्रेकअप नि ‘मनमोहन’ समन्स
आम आदमी पक्षातल्या वादावादीची चर्चा सोशल मीडियावर गाजतेय. ‘आप’च्या नेत्यांमधील मतभेद उघडकीस आल्यानं हा पक्ष पुन्हा एकदा चच्रेचा विषय ठरलाय. केजरीवाल यांनी काँग्रेसशी पडद्यामागं केलेल्या चच्रेची ऑडिओ टेप कुमार विश्वास यांनी लीक केल्याचा आरोप ‘आप’चे आमदार राजेश गर्ग यांनी केलाय. यादरम्यान ‘आप’चा महाराष्ट्रातील चेहरा अशी ओळख असणाऱ्या अंजली दमानिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. दमानिया यांनी ‘ट्विटर’च्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यांनी आपला निर्णय बदललाय. ‘ट्विटर’वर #‘आप’ब्रेकअप हा ट्रेण्ड असून ‘यूटय़ूब’वर या विषयावरील व्हिडीओला दोन दिवसांत १,२२,७०७ व्ह्य़ूज मिळाले होते. त्याची ही लिंक- https://www.youtube.com/watch?v=TuOX_SlocKg
दुसरीकडं वादग्रस्त ‘कोलगेट’ अर्थात कोळसा गरव्यवहारप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयानं माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आरोपी असल्याचं समन्स बजावल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडालेय. त्यामुळं काँग्रेस नि भाजपात ‘तू तू मं मं’ सुरू झाली आहे. राजकीय विनोदांना उधाण आलंय. व्हॉट्सअप, ट्विटरवरून लोक याबाबतीत ट्विप्पणी करत आहेत. ‘राहुल गांधी ने मनमोहन सिंग को फोन कर के कहाँ, आपको जो सन्मान मिला है, उसके लिए बधाई.. मनमोहन सिंग बोले, कमिने, सम्मान नहीं सम्मन(समन्स) मिला है, वो भी तुम्हारी वजह से..’ हा मेसेज व्हॉटस्अॅपवर फॉरवर्ड होतोय.
फ्रायडे द थर्टीन्थ
लाइक..श्रेया
‘सा रे ग म पा’सारख्या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ‘ती’ लोकांपुढं आली नि या ‘बंगाली गर्ल’नं आपल्या सुरांनी रसिकांना जिंकून घेतलं. ‘देवदास’मधून तिनं बॉलीवूडमध्ये अशी काही दमदार एन्ट्री घेतली की तिनं मागं वळून पाहिलंच नाही. जून २०१० मध्ये श्रेयाच्या फॅन्सनी पहिला ‘श्रेया घोषाल डे’ सेलिब्रेट केला होता. विकिपीडियावरील संदर्भानुसार जानेवारी महिन्यापर्यंत श्रेयाला ‘फेसबुक’वर २४,१९५ मिलियन लाइक्स मिळाले होते. ‘फेसबुक’ वरील ‘मोस्ट लाइक्ड पर्सनॅलिटीज’पकी श्रेया पहिल्या पाचांत आहे. त्यामुळंच तिच्या वाढदिवशी १२ मार्चला समस्त सोशल मीडियावरून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षांव झाला नसता तरच नवल होतं.
व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉलिंग
सध्या अनेकांच्या फेव्हरेट अॅप्सपैकी एक नंबर असणाऱ्या व्हॉट्सअॅपनं आता व्हॉईस कॉलिंग हे फीचर लॉन्च केलंय. व्हॉट्सअॅपवरून मेसेजप्रमाणं कॉलही करता येतील. त्यासाठी व्हॉट्सअॅपचं २.१२.७ हे लेटेस्ट व्हर्जन इंस्टॉल करा. ते गुगल प्लेवरून किंवा व्हॉट्सअॅपच्या ऑफिशिअल वेबसाइटवरून डाऊनलोड करा. हे व्हर्जन डाऊनलोड केल्यावर ज्यांच्याकडं व्हॉट्सअॅप कॉलिंग फीचर अॅक्टिव्हेट आहे, त्यांनी तुम्हाला कॉल केल्यावर, मोबाईलवर व्हॉईस कॉलिंगचा फीचर अॅक्टिव्हेट होईल. ते दिसत नसल्यास मोबाइल रिस्टार्ट करून बघता येईल. सुरुवातीला हे फीचर ट्रायल बेसिसवर व्हॉट्सअॅप देत आहे. काही जणांना नवं व्हर्जन अपलोड करूनदेखील कॉलिंगची सुविधा मिळाली नाही. केवळ अँड्रॉइडसाठीच सुरुवातीला हे फीचर देण्यात आलं. त्यामुळे व्हॉट्सअॅप कॉलिंग फीचरबाबत अनेक तर्क-वितर्क, गोंधळ निर्माण झाला होता.
राधिका कुंटे -viva.loksatta@gmail.com