एबी.. एबीडी
या सदरात पुन्हा एकदा एबी डिव्हिलिअर्सची लवकरच नोंद घ्यावी लागते आहे, अशीच तुफानी कामगिरी त्यानं केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान दीडशतकाचा (६४ चेंडूंत १५० धावा) विक्रम एबी डिव्हिलिअर्सनं रचलाय. त्याच्या तुफानी टोलेबाजीसमोर वेस्ट इंडिजचं आव्हान फुसकं ठरलं. भारताविरुद्धच्या पराभवामुळं शेपटीवर पाय पडलेल्या दक्षिण आफ्रिकेनं विंडीजची शिकार करताना २५७ धावांच्या विजयाचा इतिहासही रचला. डिव्हिलिअर्सनं धावांचा हिमालय उभारत ६६ चेंडूंत नाबाद १६२ धावा तडकावल्या. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेनं ४०८ ही वर्ल्डकपमधली दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या उभारली. त्यानं शेर्न वॉटसनचा २०११ मध्ये बांगलादेशविरुद्धचा ८३ चेंडूंत दीडशतक हा विक्रम मोडला. त्यामुळे गेल्या आठवडय़ात सोशल मीडियावर एबीडीचाच बोलबाला होता.
@मराठी दिन
गेल्या आठवडय़ात ‘लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी’ असा स्टेटस मिरवत अनेकांचे वॉलपेपर्स, ट्विट्स, पोस्ट्स मराठीमय झाले होते. निमित्त होते जागतिक मराठी भाषा दिवसाचं. कुसुमाग्रजांचा हा जन्मदिवस. #मराठी दिन, # जागतिक मराठी भाषा दिवस, #मराठी भाषा दिन, #अभिजात मराठी अशा हॅशटॅगसह ट्विटर, फेसबुक, व्हॉटस्अॅपसह समस्त सोशल मीडियावर मराठी दिनाच्या निमित्तानं मराठी भाषेबद्दलच्या अभिमानासह तिच्या सद्य:स्थितीबद्दलची मत-मतांतरं जोरकसपणं व्यक्त झाली. मराठी बाणा, मराठी कवितांसह मराठीपणाही पोस्ट, ट्विट केला गेला.
निमित्त एआयबी
‘एआयबी रोस्ट’ या निमित्तानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चच्रेत येतोय. त्याच अनुषंगानं ‘एआयबी पॅरडी’ हा व्हिडीओ त्यांनी अपलोड केलाय. या व्हिडीओला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. त्याची लिंक – https://www.youtube.com/watch?v=uEgFEJG29ko
शिवाय The indian Censor Board ode याच मुद्दय़ावरच्या व्हिडीओलाही संमिश्र प्रतिसाद मिळतोय. त्याची लिंक – https://www.youtube.com/watch?v=Fmaagf5oWag
द ड्रेस
रेलगाडी रेलगाडी..आणि #घंटाबजट
‘रेल बजेट १५’आणि ‘सुरेश प्रभू’ या हॅशटॅगसह वरचढ ट्रेण्ड ठरला तो रेल्वे बजेटवरील चच्रेचा. या बजेटच्या बाजूनं, विरुद्ध आणि तटस्थपणं अनेक ट्विट्स नि पोस्ट केल्या गेल्या. ‘व्हॉट्सअॅप’वर ‘जिस देश में लोगों को रात दस बजे तक ये नहीं पता चलता कि उनका बॉस कल की छुट्टी अप्रूव्ह करेगा या नहीं, वहाँ चार महिने पहले टिकट रिजर्व करवाने की छूट देना, उनकी भावनांओ के साथ बहुत ही बडा खिलवाड है’ असे मेसेजेस फॉरवर्ड केले जात होते. तर ‘ट्विटर’वर ‘सेलेब्ज ट्रेन’ हा आणखी एक ट्रेण्ड होता. मनमोहन सायलेंट एक्स्प्रेस, ढोणी एक्स्प्रेस, थरूर पॅलेस ऑन व्हिल्स, एसआरके मालगाडी, स्मृती इराणी पॅसेंजर, बप्पी लहिरी एक्स्प्रेस, हृतिक एक्स्प्रेस विल हॅव अॅन एक्स्ट्रा पेअर ऑफ व्हिल्स, आलोकनाथ अगरबत्ती एक्स्प्रेस अशी नवनवी विशेषणं यामध्ये दिसत होती. ‘रजनीकांत एक्स्प्रेस वोण्ट गो एनीवेअर, ऑल स्टेशन्स विल कम टू इट’ अशा एकाहून एक नमुनेदार ट्विट्स या ट्रेण्डमध्ये केल्या गेल्या.
शनिवारच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर पूर्ण रविवारचा दिवस #घंटाबजट हा ट्रेण्ड ट्विटरवर गाजत होता. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि मोदीविरोधक तसंच बजेट पसंत नसलेल्या अनेकांनी या हॅशटॅगसह आपल्या प्रतिक्रिया नमूद केल्या होत्या. त्यावर पुन्हा प्रतिक्रियांचा पाऊस पडत होता. आकाशात ढग भरून आले होते आणि अपेक्षांचे ढग काही ठिकाणी कोसळले तर काही ठिकाणी नुसतेच गर्जना करून गेल्याचं जाणवलं. या सगळ्यांवर कोटय़ा करणाऱ्या वन लाइनर्स ट्विटरवर गाजत होत्या.
हिवाळ्यात पाऊस अन्..
गेल्या वीकएण्डला अचानक आकाशात मळभ दाटून आलं आणि ‘आपल्या नेहमीच्याच’ कवींना स्फुरण चढलं. व्हॉट्सअॅपवर चारोळ्यांच्या पाऊस बरसल्या. त्यातल्याच काही मोजक्या धारा..
पावसाळे मे ऊन पडय़ा.. उन्हाळे मे गारा..
अभी थंडी मे पड रहा है पाऊस..
देवा तुम्हारे काँप्युटर का बिघडय़ा क्या माऊस??
किंवा आता ही फॅशन शोबद्दलची बघा..
सुबह तो २ जॅकेट पहनो
दोपहर मे सब उतारो
शाम को रेड कोट पहनो
रात को कम्बल ओढो
समझ में नही आता की मौसम है या फॅशन शो
बजेटच्याच दिवशी असा अवकाळी पाऊस बरसल्याने आणि त्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने या सगळ्यांचा संबंध जोडून अनेक कोटय़ा करणाऱ्या पोस्ट्स ट्विटरवर पडत होत्या.
आपण यांना पाहिलंत का?
राधिका कुंटे -viva.loksatta@gmail.com