सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
सीझन.. वर्ल्ड कपचा
‘क्रिकेट का फिव्हर फैला रहा हैं चारों तरफ.. स्कोअर और आऊट की पूछताछ जारी हैं..’ असले मेसेजेस कितीही नाही म्हटलं तरी आपलं लक्ष वेधून घेताहेत. क्रिकेटशी फारसं सोयरसुतक नसलेल्यांची ही तऱ्हा, तर मग क्रिकेटलव्हर्स की तो बात ही मत पूछो. अपडेटस् मिळवण्यासाठी किती तरी अॅप्स डाऊनलोड करण्यात आल्येत. सगळ्याच सोशल नेटवìकग साइट्सवर वर्ल्ड कपबद्दल पोस्ट, ट्विटस् होताहेत. त्यात वर्ल्ड कपच्या टाइमटेबलपासून ते धोनी, विराट नि अश्विनबद्दलचे जोक्स आहेत. तसेच बायकोला नवऱ्यानं ‘प्रिय पत्नी’, असं म्हणत वर्ल्ड कपच्या कालावधीत घालून दिलेले नियम आहेत. या नियमांची सुरुवातच ‘वर्ल्ड कपपासून रिमोट आणि टीव्ही पूर्णपणं माझं’ या नियमानं होते नि ते चढत्या क्रमानं रंगत ‘मला हा खेळ पाहायला आवडतो..’ असं म्हणत या नियमांचा शेवट ‘(वर्ल्ड कप संपल्यानंतर) तुझा नवरा’ असा आहे.
‘व्ही’डे स्पेशल
अगदी उद्यावर ‘व्हॅलेंटाइन डे’ येऊन ठेपलादेखील.. या स्पेशल डेसाठी तुमची तयारी झाली असेलच. नसेल तर पटकन ‘यू टय़ूब’ ओपन करा नि पटापट ‘व्ही’डेच्या तयारीला लागा. त्याच्यासाठी तुम्हाला ब्युटीफुल दिसायचं असेल तर Face The Glam by Kavya, MakeupbyAmarie, AMakeup Diary, Corallista या व्हिडीओजची तुम्हाला नक्कीच मदत होईल. नेहमीच्या फंडय़ांचा वापर न करता तिला इम्प्रेस करायचं असेल तर कुकिंगचा फंडा ट्राय करा. त्यासाठी तुम्ही मास्टर शेफ असायला पाहिजे असंही काही नाही. जस्ट Eat East Indian, Showmethecurry.com, Originalnakedchef, readysteadyeatहे व्हिडीओज पाहा नि तिची आवडती डिश करून तिला सरप्राईज द्या. अजून प्रत्यक्ष भेटण्याइतपत तुमची प्रगती झाली नसेल तर तुम्ही अॅप्सची मदत घेऊ शकता. ‘युवर लव्ह टेस्ट कॅल्युलेट’, ‘लव्ह लेटर्स’, ‘व्हॅलेंटाइन्स टेक्टर’, ‘व्हॅलेंटाइन फोटो फ्रेम्स’, ‘लव्ह अॅण्ड व्हॅलेंटाइन कार्डस्’, ‘बेस्ट विशेश क्रिएटर’ अशा अनेक अॅप्सच्या मदतीनं तुमचा ‘व्हॅलेंटाइन्स डे’ स्पेशल करता येईल.
ट्रेलर रिलीज‘यू टय़ूब’वर अनुष्का शर्मा नि नील भूपालम यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘एनएच10’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. १७ तासांत त्याला २,७०,८७३ व्ह्य़ूज मिळालेत, तर आयुषमान खुराणा नि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाच्या ट्रेलरला १९ तासांत १,७४,६०५ व्ह्य़ूज मिळालेत.
एआयबी नि टीव्हीएफ, केआरके‘एआयबी’च्या रणवीर-अर्जुन व्हिडीओवरून उठलेला गदारोळ, दोन्हीं बाजूंचं म्हणणं या आठवडय़ातही ट्रेिण्डगमध्ये कायम आहे. या व्हिडीओच्या निमित्तानं टीव्हीएफनं #nocountryforfunnymen हा व्हिडीओ अपलोड केलाय. त्याला एका दिवसात साडेचार लाखांच्या आसपास व्ह्य़ूज मिळालेत. तर केआके एआयबीच्या व्हिडीओचा रिव्ह्य़ू घेण्याच्या निमित्तानं अपलोड केलेल्या व्हिडीओला दोन दिवसांत २,९६,६३२ व्ह्य़ूज मिळालेत. यामुळे पुन्हा एकदा अभिव्यक्तिस्वातंत्र्य, विनोदाची हद्द कुठवर असावी, हे मुद्दे ऐरणीवर आलेत.
‘फेसबुक’ झालं ११ वर्षांचं
सतत नवीन सुविधा देऊन लोकप्रियता कायम ठेवण्यात यश मिळविलेल्या लोकप्रिय सोशल नेटवìकग साइट फेसबुक ४ फेब्रुवारीला ११ वर्षांचं झालं. बदलत्या काळानुसार युजर्सची गरज ओळखून ‘फेसबुक’नं आपल्या साइटमध्ये आवश्यक ते बदल करीत आपली लोकप्रियता कायम ठेवल्येय. सुरुवातीला लोकप्रियतेचा अंदाज नसलेल्या ‘फेसबुक’नं आज मोठी झेप घेतल्येय. गेल्या ११ वर्षांत ‘फेसबुक’वरील वापरकर्त्यांच्या संख्येचा विचार करता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनलाही फेसबुकनं मागे टाकलंय.
लव्ह मंथ
फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना. १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाइन डे तर आपल्याला माहिती आहे. पण ७ ते २१ फेब्रुवारी रोज एक प्रेम सेलिब्रेट करण्याचा डे असतो, हे कदाचित नवीन असेल. त्या संदर्भातले मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरताहेत. दररोज त्या त्या दिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेशही उत्साही मंडळी ग्रूपवर टाकत आहेत. प्रेमाचे सगळे रंग दाखवण्याचा हा महिना दिसतोय. कारण लवकरच स्लॅप डे, किक डे आणि चक्क ब्रेक अप डे ही येऊ घातलाय. ज्यांचा या ‘डे’ज वर विश्वास नाही, त्यांना मात्र या रोजच्या डे चा उच्छाद नकोसा झालाय आणि त्यासंदर्भातही काही विनोद आता फिरायला लागले आहेत. असे आहेत हे ‘डेज’
७ फेब्रुवारी- रोज डे
८ फेब्रुवारी- प्रपोज डे
९ फेब्रुवारी- चॉकलेट डे
१० फेब्रुवारी- टेडी डे
११ फेब्रुवारी- प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी -किस डे
१३ फेब्रुवारी- हग डे
१४ फेब्रुवारी- व्हॅलेंटाइन्स डे
१५फेब्रुवारी- स्लॅप डे
१६ फेब्रुवारी- किक डे
१७ फेब्रुवारी- परफ्युम डे
१८ फेब्रुवारी- फ्लर्टिग डे
१९ फेब्रुवारी- कन्फेशन डे
२० फेब्रुवारी- मिसिंग डे
२१ फेब्रुवारी- ब्रेकअप डे
‘जी टॉक’ बंद
जगातील सर्वात मोठं सर्चइंजिन असलेल्या गुगलनं ‘जी टॉक’ची सेवा १६ फेब्रुवारीपासून बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या सेवेऐवजी आता गुगल ‘हँगआऊट’ हे अॅप्लिकेशन वापरण्याचा सल्ला मेसेजद्वारे ‘जी टॉक’ युजर्सना देण्यात आलाय. गुगल हँगआऊट क्रोम अॅप्लिकेशनमुळे युजर्सना चॅटिंग सेवेचा वापर करता येणार आहे. पण गुगल हँगआऊटचं अॅप्लिकेशन फक्त गुगल क्रोमवर चालत असल्यानं युजर्सची थोडी गैरसोय होऊ शकते.
मफलर मॅन छा गयाए दिल्ली तेरे आंगन में, नया सूरज चढने वाला है. सुना हैं १० लाख के सूटों पे, १०० रुपये का मफलर भारी पडनेवाले हैं. अशा आशयाच्या शेरोशायरीनं, फोटोज, व्हिडिओजनी सोशल मिडियावर धूम उठवलेय. मफलर मॅन, आपस्वीप, दिल्ली डिसाईड्स हे ट्रेण्ड आठवडय़ाच्या सुरुवातीला सगळ्याच मिडियात वरचढ ठरलेत. केजरीवाल यांना मिळालेलं प्रचंड बहुमत, तरुणाईचा कौल या सगळ्यावरच सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.
राधिका कुंटे- viva.loksatta@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2015 रोजी प्रकाशित
सोशल न्यूज डायजेस्ट : रंग प्रीतीचे.. अन् वर्ल्ड कपचे
सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडिओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या?
First published on: 13-02-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top social media trends of the week