दिवाळी हा वर्षांतला असा सण आहे, ज्याची वाट प्रत्येकजण आतुरतेने पाहत असतो. गृहिणीला तिचे पाककलेचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळते, नोकरदार वर्ग बोनसची वाट पाहत असतो, धंदेवाईक नवीन वर्षांच्या स्वागतासाठी सज्ज असतो तर बच्चेकंपनी गिफ्ट्सची वाट बघत असतात. असा वर्षांतला हा एकमेव सण आहे. गावातल्या आजी- आजोबांच्या गाठोडीतल्या पुराणातल्या खास गोष्टी ते रांगोळीतल्या सप्तरंगांपर्यंत दिवाळीतला प्रत्येक क्षण सगळ्यांसाठी स्पेशल असतो. मग या दिवसांत तरुणींचं फॅशनचं डिपार्टमेंट कसं मागे राहील. मुलगी कितीही मॉडर्न म्हणवत असेल स्वतला तरी या दिवसांमध्ये तिलाही खास पारंपरिक साडी किंवा ड्रेस घालायचा मोह आवारत नाही आणि आवरूही नये. दिवाळीच्या दिवसांमध्ये पारंपरिक साडी किंवा ड्रेसचा तोरा काही औरच असतो. पारंपरिक ज्वेलरी आपण एकदा तरी घालावी असं प्रत्येकीला वाटत. पण मुळात या पारंपरिक लुकमध्ये आपण काकूबाई तर दिसणार नाही ना ही भीती पण सतावत असते. त्यामुळे नकोच तो ट्रॅडिशनल लुक आणि नको ती साडी असा विचार आपण करतो. पण असं न करता या दिवाळीत स्टायलिश पण तितकाच ट्रॅडिशनल लुक कसा करता येईल याबाबत आज आपण बोलू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा