पाऊस आणि ट्रेकर्स यांचं नातं जिवाभावाचं. शहरात पावसावर खूप राग धरणारे ट्रेकर्स सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर पावसाशी अगदी मुक्तपणे खेळतात. मनसोक्त भिजून घेतात, शहरामध्ये ऑफिस-कामामुळे पावसाला दूर ठेवल्याची सगळी भरपाई करून घेतात. तसं पाहायला गेलं तर पावसाच्या जलधारांमुळे सीमेंटच्या अगदी कंपाऊंड वॉललाही जिथे हिरवे कोंब फुटतात, तिथे डोंगरातल्या अस्सल गावरान मातीची काय कथा? अवघ्या धरती-डोंगर-पठारे-राने-उतार-किल्ले-बुरूज-माच्या, इतकंच काय, मंदिरांच्या कळसांवरही नवचतन्याची हिरवी शाल पांघरली जाते. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी मान्सून ट्रेकचे वेध लागतात. लिस्ट चेक केली जाते, एकमेकांना एसेमेस धाडले जातात, सोयीचा वीकेंड ठरवला जातो आणि पावलं वळतात सह्यद्रीच्या पायवाटांकडे! या लेखात अशाच काही माहीत असलेल्या-नसलेल्या पुणे-मुंबईहून एका दिवसात बघता येण्याजोग्या ‘मस्ट व्हिजिट’ मॉन्सून डेस्टिनेशन्स.
पेठ किल्ला ऊर्फ कोथळीगड : मुंबई आणि पुण्याहून एका दिवसात जाऊन येण्यासारखा हा किल्ला आहे. पुणे किंवा मुंबईहून शक्य तितक्या लवकर कर्जत स्थानक गाठायचे. तिथून पूर्व बाजूच्या एसटी स्टँडहून आंबिवलीसाठी एसटी पकडायची. नेरळहूनही कशेळे व कशेळेहून आंबिवलीसाठी एसटी मिळू शकते.
४. कोरईगड किंवा कोरीगड – लोणावळ्याहून सहारा अँबी व्हॅलीकडे जाताना अंदाजे तीसेक किमीवर पेठ शहापूर नावाचे गाव आहे. त्या गावामागचा गड म्हणजेच कोरीगड किंवा कोरईगड. कमी उंच, पायऱ्यांची सोय आणि फिरायलाही कमी अशा सर्व ‘सुविधां’मुळे कोरईगड पर्यटकांचा आवडता आहे. कधी गेलात तर सर्व ती काळजी घेऊन तटबंदीच्या काठाकाठाने गड-प्रदक्षिणा करायला विसरू नका!
तर ही होती पुण्या-मुंबईजवळच्या फार थोडय़ा मॉन्सून स्पेशल ट्रेकर्स डेस्टिनेशन्सची ओळख. निसर्गात फिरताना पूर्ण भान ठेवून वागणे आणि स्वत:च्या वर्तणुकीमुळे निसर्गाच्या इतर घटकांना आणि रहिवाशांना इजा/त्रास होईल असे न वागणे ही एका खऱ्याखुऱ्या सच्च्या भटक्याची इतर महत्त्वाची लक्षणे आहेत, हे ध्यानात ठेवा आणि साऱ्या दुर्गरूपी भुजा पसरून स्वागतासाठी हिरव्या पायघडय़ा घालणाऱ्या सह्यद्रीकडे हक्काने जा!