सुट्टी पडली की, आईबरोबर मामाच्या गावाला जायचं, हेच वेध पूर्वीच्या पिढीला लागायचे. आता मात्र सुट्टी लागली की, हातात कॅमेरादी अस्त्र घेऊन तरुणाई भटकंतीला बाहेर पडते.. कधी समवयस्क ग्रूपबरोबर तर कधी एकेकटीच. कुणी ट्रेकला जातं तर कुणी जंगलात तर कुणी देशभ्रमंतीला..
काय असतो त्या मागचा उद्देश? काय शोधतात ते जंगलात आणि या भटकंतीतून?
एकट्या फिरणाऱ्या मुली ही आता पूर्वीइतकी आश्चर्याची बाब राहिलेली नाही. देशातच नाही तर परदेशी पर्यटनासाठीही मुली एकेकटय़ा जाऊ लागल्या आहेत.  भ्रमंतीसाठी कुटुंबाशिवाय जाताना नवा मित्र-परिवार जोडणं, निसर्गाशी एकरुप होणं अशी कितीतरी उद्दीष्ट घेऊन मुली बाहेर पडतात.
आवारा भवरें.. हे रेहमानच्या संगीतानं नटलेलं गाणं जितकं श्रवणीय तितकंच काजोल आणि तिच्या मैत्रिणींनी गाण्यात एंजॉय केलेले क्षणही प्रेक्षणीय.. फक्त मुलींचा ग्रूप असा दूरवर फिरायला जातो तेव्हा अशी फूल ऑन धमाल करता येते. एकट्या फिरणाऱ्या मुली ही आता पूर्वीइतकी आश्चर्याची बाब राहिलेली नाही. देशातच नाही तर परदेशी पर्यटनासाठीही मुली एकेकटय़ा जाऊ लागल्या आहेत.  भ्रमंतीसाठी कुटुंबाशिवाय बाहेर पडताना नवा मित्र-परिवार जोडणं, निसर्गाशी एकरुप होणं अशी कितीतरी उद्दीष्ट घेऊन मुली बाहेर पडतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आम्हा मत्रिणींना स्वतंत्रपणे पिकनिकला जाऊन ते फ्रीडम आणि थ्रील अनुभवायला आवडतं.
श्रुतिका महाडिक

पूर्वी कसं ‘मामाच्या गावाला जाऊ या’ हेच प्रत्येक सुट्टीतलं हे पेटंट गाणं असायचं!! गावाला जायचं म्हणजे मामाच्या गावाला, एवढीच काय ती आपल्याआधीच्या पिढीपर्यंतची मजल होती. सुट्टीत संपूर्ण परिवार मामाच्या गावाला धूम ठोके. मामाचं गाव- म्हणजे आजोळ. म्हणजेच एकमेव पर्यटनाचं ठिकाण होतं. ज्याचं गाव कोकण असेल त्यांची तर पर्वणीच! तांबडी माती, कौलारू घर, आंबा-फणस-नारळीच्या बागा आणि अखंड घुमणारा समुद्र हेच वर्षांनुवर्षे सुट्टीत गावाला जाणाऱ्या परिवाराचे स्पॉट्स. पण हळूहळू लोकांच्या पर्यटनाच्या व्याख्या बदलल्या. मुलं जरा कॉलेजला जायला लागली की आई-वडील किंवा परिवारासोबत भटकंतीला जाण्याऐवजी ग्रुपने मित्र-मैत्रिणींबरोबर ट्रिपला जातात. आता त्यापलीकडची मजल म्हणजे काही एकांडे शिलेदार भटकंतीला बाहेर पडू लागले आहेत. मुलीही यात मागे नाहीत. एकटे गेल्याने अनेक नवीन गोष्टी कळतात, निसर्ग जवळून समजतो, त्याच्याशी एकरूप होता येतं, एकटे अनोळखी ग्रुपबरोबर गेले तर नवीन मित्र-मैत्रिणी मिळतात, अशी अनेक कारणं देत मुली बाहेर पडू लागल्या आहेत. आता तर रीतसर प्लॅन करून परदेशवारी करण्यापर्यंत त्यांचं पर्यटन वाढलंय. परिवारासोबत पर्यटन म्हटलं की सूचनांचा एक पंखा सतत डोक्यावर फिरत असतो. तो जोपर्यंत हळू फिरतोय तोपर्यंत ठीक; पण एकदा का तो जोरात फिरायला लागला की मग हवं तसं एन्जॉय करता येत नाही. शिवाय समवयस्क मित्रांसोबत पर्यटनाची मजा काही औरच. त्यामुळे मित्रांसमवेत फिरायला जाणारे भटके वाढले आहेत. हे फिरणं फक्त ट्रेकपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीय. लांबवरची ठिकाणं अगदी परदेशातही मुलं-मुली एकेकटी हिंडताहेत.
मत्रिणींसोबत ट्रिप प्लॅन करून जायचं असा विचार करणाऱ्यांपैकी एक म्हणजे श्रुतिका महाडिक. श्रुतिका मेडिकलची विद्याíथनी असल्याने रोजचा भरपूर अभ्यास आणि ताण-तणाव यापासून रिलॅक्स होण्यासाठी तिला आणि तिच्या मत्रिणींना फिरायला जायचंच होतं; पण दरवेळेस शॉिपगला जाण्याऐवजी किंवा कुणाच्या तरी घरीच नााइट आउट करण्यापेक्षा एखादी छानशी लांब कुठेतरी ट्रिप काढावी असा विचार करीत असतानाच गोवा हे ठिकाण निश्चित झालं आणि श्रुतिका व तिच्या दोन मत्रिणी अशा फक्त तिघी जणी गोव्याच्या दिशेने सुट्टी एन्जॉय करायला निघाल्या आणि विशेष म्हणजे कोणत्याही यात्रा कंपनीशीवाय!! श्रुतिका म्हणाली, ‘पहिल्यांदाच आम्ही एकटय़ा एवढय़ा लांब फिरायला जाणार होतो. आम्हा मत्रिणींना स्वतंत्रपणे पिकनिकला जाऊन फ्रीडम अनुभवायचं होतं आणि गोव्याला फ्रेंड्ससोबत जाण्याची वेगळीच मजा आहे. सुरुवातीला घरी थोडं मनवावं लागलं; पण नंतर घरून परवानगी मिळाली. तिथल्या एका गावात तर आम्ही चुलीवर आमचं जेवण बनवलं. तो अनुभव भारी होता. ट्रेनचं बुकिंग करण्यापासून ते तिकडे हॉटेल्स बुक करण्यापर्यंत सगळं आमचं आम्हालाच मॅनेज करताना खूप मजा आली. मुली आहोत म्हणून कोणताच त्रास झाला नाही.’
खरंच आपल्या फ्रेंड्ससोबत ६-७ दिवसांची पिकनिक असल्यावर मजा येणारच आणि ग्रुप असेल तर मग काय विचारायलाच नको.. नुसती धमाल!! पण काही मुली अशाही आहेत, ज्या खरोखर एकटय़ाच ट्रिपला जातात. मनापासून फिरण्याची आवड असणारी एखादी अशी एकांडय़ा प्रवासाला निघते. आसपासचं जग मनापासून एक्स्प्लोअर करण्याचा आनंद घेते. असा एक अनुभव सांगताना अर्चना ठाकूर ही निसर्गप्रेमी मत्रीण म्हणाली, ‘मला पर्यटनाची खूप आवड आहे. सुरुवातीला मी परिवारासोबत पर्यटनाला जायचे; पण मला शांततेत आणि अगदी निरखून निसर्ग पाहायला आवडतो. परिवारासोबत गेलो असता घाई होण्याची शक्यता असते; म्हणून नंतर मी एकटीच माझ्या आवडीच्या ठिकाणांना भेट देऊ लागले. सुरुवातीला आई-वडिलांना काळजी वाटायची, पण आता त्यांचाही पाठिंबा मिळतो. मी उत्तर काशीला एकटीच गेले होते. हिमालयातही एकटीने भ्रमंती केली होती. ट्रेकिंगची आवड असल्याने दऱ्या-खोऱ्यांत भटकायला मला जास्त आवडतं. लडाखची ट्रिप माझ्या कायम लक्षात राहलीय. कारण त्या ट्रिपमध्ये माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं. इंटरनेटवरून काही मित्रांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला, पण तरीदेखील ओळखीचे कोणीच नव्हते. लडाखला कसं जायचं, कोण असेल सोबत, वगरे गोष्टींचा कसलाच अंदाज नव्हता. डोक्यात फक्त एकच होतं लडाखचा निसर्ग काही दिवस अनुभवायचा. मग त्याप्रमाणे मी स्वत:च तिकडे ट्रेकिंगसाठी घेऊन जाणाऱ्या कंपन्यांची माहिती नेटवरून शोधली. फ्लाइट्स पाहिल्या आणि लडाखला रवाना झाले.’ माझ्या प्रत्येक ट्रिपचा खर्च माझ्याच पशातून मी करते, हे तिनं आवर्जून सांगितलं.

मला शांततेत आणि अगदी निरखून निसर्ग पाहायला आवडतो. मी उत्तर काशी आणि लडाखला एकटीच गेले होते.
अर्चना ठाकूर

ज्याप्रमाणे मुली एकटय़ा पर्यटनाला जातात त्याप्रमाणे आपल्या ट्रिपचा खर्चही आपणच करावा, याकडे आज मुलींचा कल आहे. नेहमी परिवारासोबत गेल्यावर एक प्रोटेक्टिव्ह आवरण सोबत असतं; परंतु एकटं एवढय़ा लांब गेल्यावर अनेक गोष्टी आपण करायला शिकतो. धीट होतो आणि आत्मविश्वास वाढतो असं म्हणणाऱ्यांपकी निकिता सारंगधर. निकिता आता एमएस्सीची विद्याíथनी आहे. ती दहावीत होती तेव्हा तिने एकटीनेच यात्रा कंपनीसोबत सिंगापूर मलेशियाची ट्रिप केली होती. निकिता म्हणाली, ‘मला आधी तिकडे कोणी मित्र-मत्रिणी भेटतील का, बोअर तर होणार नाही ना, असं काहीसं टेन्शन होतं; मी स्टुडंट स्पेशलसोबत जाणार होते, त्यामुळे जेव्हा बाकीचे सगळे एकमेकांना भेटले तेव्हा सगळ्यांचीच मत्री झाली आणि इतका छान ग्रुप तयार झाला की आज एवढय़ा वर्षांनंतरही आमची चांगली फ्रेंडशिप आहे. आपण कोणत्याही ट्रिपला एकटे गेलो तर उलट जास्त ओळखी होतात आणि आपल्याला व्यवहारज्ञानही शिकता येतं.’
पर्यटनाची व्याप्ती वाढलेली आहे. अनेक मुली एकटय़ा फिरण्यासाठी उत्सुक आहेत. थोडी सावधानता, जिद्द आणि स्वत:वरचा विश्वास या तीन गोष्टी असतील तर एकटी मुलगीही पर्यटन उत्तमपणे करू शकते. एकांडय़ा शिलेदारांशी बोलून तेच जाणवलं.