तेजश्री गायकवाड
गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे होणाऱ्या सगळय़ाच गोष्टींना ब्रेक लागला होता. आता हळूहळू सगळंच पूर्वपदावर येत आहे. वर्षांतून दोनदा होणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ची यंदाची सुरुवातही पुन्हा एकदा झोकात करण्यात आली. करोनाकाळातील डिजिटल अवतार, निर्बंध हळूहळू शिथिल झाल्यानंतर फॅशनप्रेमींनी अनुभवलेला फिजिटल शो या दोन्ही स्वरूपातील ‘लॅक्मे फॅशन वीक’ लोकप्रिय ठरले. तरी यंदाच्या पर्वाची सुरुवात जास्त महत्त्वाची होती. त्याचं कारण म्हणजे दोन वर्षांनी का होईना ही फॅशन पंढरी या वीकच्या निमित्ताने पुन्हा फॅशनप्रेमींसमोर प्रत्यक्ष येणार होती. प्रत्यक्ष फॅशनप्रेमींसमोर आपलं कलेक्शन सादर करण्यासारखा आगळा आनंद नाही असं म्हणणाऱ्या डिझायनर्सनी खरोखरच या फॅशन वीकमध्ये काही नवे ट्रेण्ड सेट केले.
‘लॅक्मे फॅशन वीक’ची लोकप्रियता आणि फॅशन इंडस्ट्रीच्या दृष्टीने असलेलं त्याचं महत्त्व फार मोठं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इथेच फॅशनचे नवनवे ट्रेण्ड सेट होतात आणि मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याचे पडसाद उमटत जातात. गेले काही वर्षे या फॅशन वीकच्या माध्यमातून सर्वसामान्यांना रुचेल आणि परवडेल अशीच डिझाइन्स, फॅब्रिक्स सादर करण्यावर डिझायनर्सकडून सातत्याने भर दिला जातो आहे. यंदाचा फॅशन वीकही याला अपवाद ठरला नसला तरी काही वेगळेच ट्रेण्ड्स फॅशनप्रेमींनी अनुभवले. करोनानंतर खऱ्या अर्थाने फक्त फॅशन शोपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेवून डिझाइन केलेले कपडे यंदा रॅम्पवर प्रामुख्याने दिसले.
यंदाचं कलेक्शन हे खास तरुणाईसाठी असलं तरी फॅशन शोमधील अनेक रूढ चौकटी मोडलेल्याही अनुभवायला मिळाल्या. आजची पिढी जशी उत्साही, ट्रेण्ड फॉलो करणारी आणि फॅशनेबल आहे तसेच कलेक्शन डिझायनर्सने सादर केलं. याखेरीज आजचे तरुण कपडय़ांबरोबर ॲक्सेसरीजनाही तितकेच महत्त्व देतात. त्यामुळे कपडय़ांच्या कलेक्शनबरोबरच त्याला साजेशा ॲक्सेसरीजसाठी ठरावीक ब्रॅण्डबरोबर टाय अप करत एक पूर्ण लुक लोकांसमोर ठेवण्याची डिझायनर्सची धडपड फॅशन वीकमध्ये जाणवली. प्रामुख्याने आयवेअर, फुटवेअर, बॅग्ज तसेच हेडफोन्ससारख्या ॲक्सेसरीजचा यात समावेश होता.
सिल्वेट्स
यंदा रॅम्पवर कट्सची जादू चांगलीच चालली. अगदी सगळय़ाच फॅशन डिझायनरच्या कलेक्शनमध्ये कट्सचा कलात्मक वापर दिसून आला. नॉर्मली साइड कट, फ्रंट हे दोनच प्रकार आपल्याला माहिती आहेत, पण यंदा हाताच्या बाह्यांवरती कट्स, क्रॉस कट्स, क्रॉप टॉपला ऑफ फ्रंट कट्सपासून ते कपडय़ाच्या खालच्या बाजूला कट्स असे अनेक प्रकार ट्रेण्डमध्ये होते.

पिंट्र
मोठयम बोल्ड पिंट्रपासून ते अगदी लहानशा बुट्टीमुळेसुद्धा गारमेंटचा चेहरामोहरा बदलतो. यंदा रॅम्पवर सगळय़ा आकारातल्या पिंट्र पाहायला मिळाल्या. तरुणाईला आवडतील अशा बोल्ड पिंट्र्सचा यंदा बोलबाला होता तर, काहींच्या कलेक्शनमध्ये पारंपरिक हॅण्ड ब्लॉग पिंट्र्ससुद्धा बघायला मिळाल्या. त्यामुळे यंदा आधुनिक बोल्ड पिंट्र्स आणि हॅण्ड ब्लॉगसारखे पारंपरिक पिंट्र्सही तेवढेच ट्रेण्डमध्ये असणार आहेत.

pantone color of the year 2025 tradition of pantone color of the year
कॉफी आणि बरंच काही…
digital revolution impact of digital usage on social and mental health
डिजिटल जिंदगी : तुम बिन जिया जाए कैसे..?
Loksatta viva Jungle Look From Sea Lover to Explorer Marine Explorer
जंगलबुक: समुद्रप्रेमी ते संशोधक
Loksatta viva Cultural significance of Makar Sankrant Fashion food
ढील दे ढील दे रे भैय्या
2025 welcome gen beta generation loksatta
२०२५ : नव्या जागतिक पिढीचे आरंभवर्ष
youth earning source villages
ओढ मातीची
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
Loksatta viva Winter Foods Food Culture by Region Maharashtra
सफरनामा: थंडीतली खाद्यामैफील!

एम्ब्रॉयडरी
यंदा रॅम्पवर एम्ब्रॉयडरी केलेले कपडे तसे कमी बघायला मिळाले. काही कपडय़ांवर केलेली हलकी, नाजूक एम्ब्रॉयडरीच लक्ष वेधून घेत होती. हेवी एम्ब्रॉयडरीला फाटा देत सुटसुटीत, नाजूक एम्ब्रॉयडरी आणि त्याला शिमर लुकचा जोड देत कलेक्शन्स सादर केले गेले. कपडय़ावरचं लाइट थ्रेड वर्क आणि हलकेसे जरी वर्क केलेलेही पाहायला मिळाले.

रंग
रंग हा फॅशनमधला महत्त्वाचा घटक. या रंगामुळे अनेकदा फॅशन फसते किंवा खूपच उठावदार होते. ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये यंदा अनेक रंग पाहायला मिळाले. फिकट रंगाच्या कलर पॅलेटपासून ते गडद रंगाच्या विविध छटांपर्यंत सगळेच रंग रॅम्पवर अवतरले होते. यासोबतच न्यूड रंगाचाही ट्रेण्ड दिसून आला. तरुणाईला आवडतील असे फ्रेश रंग दिसून आले.

मास्क नव्हे तो..
करोनामुळे असेल कदाचित पण मास्कसदृश काही प्रकार नक्कीच फॅशनमध्ये आले आहेत. किंवा त्याला अधिक फॅशनेबल करण्याचा प्रयत्न या फॅशन वीकमध्ये दिसून आला. हा प्रकार म्हणजे परदेशात लोकप्रिय असलेला ‘बलाक्लावा’. या बलाक्लावाच्या अगदी अत्याधुनिक आणि विविधरंगी प्रकाराचा फॅशन वीकमध्ये वापर करण्यात आला होता. डोक्यापासून पूर्ण चेहरा झाकणारे हे बलाक्लावा यंदा इंटरनॅशनल फॅशन शोमध्येही चर्चेचा विषय ठरले होते. इथे हा प्रकार सत्या पॉल आणि ह्युमेन या ब्रॅण्ड्सने सादर केलेल्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळाला. मूळचा परदेशी असला तरी करोनामुळे का होईना हा प्रकार आपल्याकडेही लोकप्रिय होताना दिसतो आहे.
अनेक अर्थाने रूढ चौकटी मोडण्याचा प्रयत्न करणारा यंदाचा लॅक्मे फॅशन वीक हा धाडसी म्हणायला हवा. या वेळी पहिल्यांदाच प्लस साइज मॉडेल्स आणि कलेक्शन असा दुजाभाव रॅम्पवर नव्हता. याउलट सगळी कलेक्शन्स सादर करताना वेगवेगळया उंचीच्या, जाडीच्या मॉडेल्स एकत्र रॅम्पवर वावरल्या. चवळीची शेंग आणि तरुण देखण्या मॉडेल्स हे रूढ समीकरणही मोडून काढण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तरुण ताहिलियानीसारख्या नामांकित डिझायनर्सनी केला. याचे सकारात्मक आणि अधिक चांगले पडसाद भविष्यात होणारे फॅशन शोज आणि फॅशन मार्केटवर उमटणार आहेत. नव्या आणि चांगल्या गोष्टींचा पायंडा पाडणारा आणि धाडसी असा हा लॅक्मे फॅशन वीक खऱ्या अर्थाने भविष्याची नांदी ठरला आहे.
बोल्ड बॉडीसूट, बिकिनी टॉप आणि बरेच काही..
बोल्ड बॉडीसूट हा प्रकार तसा नवीन उरलेला नाही. मलायका अरोरासारख्या फॅशन आयकॉन मानल्या जाणाऱ्या अभिनेत्रीने अशाप्रकारे बोल्ड बॉडीसूट्स किंवा बिकिनी टॉप डेनिमपासून शॉर्ट्सपर्यंत विविध प्रकारे पेअर करत आधीच लोकप्रिय केले आहेत. मात्र आपल्याकडच्या फॅशन वीकमध्ये हा प्रकार सर्रास पाहायला मिळत नव्हता, यंदा तो ग्लॅमरस कलेक्शनबरोबरच कॅज्युअल वेअरमध्येही पाहायला मिळाला.
मेन्स फॅशनवेअरचे धाडसी प्रयोग
मेन्स फॅशनवेअर हा आपल्याकडे अजूनही तसा दुर्लक्षित राहिलेला विषयच म्हणता येईल. मात्र यंदा सादर झालेलं कलेक्शन हे मेन्स फॅशनवेअरमध्ये केवळ नवे मापदंड निर्माण करणारं आहे असं नाही. तर एकूणच फॅशनमधील लिंगभेदाची रेषा पुसट करणारं असं कलेक्शन सादर झालं हे म्हणणं योग्य ठरेल. यात क्रॉप टॉपचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. पहिल्यांदाच वेगवेगळय़ा पद्धतीचे क्रॉप टॉप मेन्सवेअरसाठी डिझाइन करण्यात आले होते. डेनिम किंवा कार्गो ट्राऊजसर्वंर हे क्रॉप टॉप पेअर करण्यात आले होते. क्रॉप टॉपचे अत्यंत स्टायलिश आणि क्वर्की कलेक्शन शिवम – नरेश आणि ह्युमेनकडून सादर करण्यात आले. याशिवाय, लेहंगा आणि स्कर्ट्सचेही वेगळे कलेक्शन रॅम्पवर सादर करण्यात आले.
viva@expressindia.com

Story img Loader