तेजश्री गायकवाड
गेल्या दोन वर्षांपासून नियमितपणे होणाऱ्या सगळय़ाच गोष्टींना ब्रेक लागला होता. आता हळूहळू सगळंच पूर्वपदावर येत आहे. वर्षांतून दोनदा होणाऱ्या ‘लॅक्मे फॅशन वीक’ची यंदाची सुरुवातही पुन्हा एकदा झोकात करण्यात आली. करोनाकाळातील डिजिटल अवतार, निर्बंध हळूहळू शिथिल झाल्यानंतर फॅशनप्रेमींनी अनुभवलेला फिजिटल शो या दोन्ही स्वरूपातील ‘लॅक्मे फॅशन वीक’ लोकप्रिय ठरले. तरी यंदाच्या पर्वाची सुरुवात जास्त महत्त्वाची होती. त्याचं कारण म्हणजे दोन वर्षांनी का होईना ही फॅशन पंढरी या वीकच्या निमित्ताने पुन्हा फॅशनप्रेमींसमोर प्रत्यक्ष येणार होती. प्रत्यक्ष फॅशनप्रेमींसमोर आपलं कलेक्शन सादर करण्यासारखा आगळा आनंद नाही असं म्हणणाऱ्या डिझायनर्सनी खरोखरच या फॅशन वीकमध्ये काही नवे ट्रेण्ड सेट केले.
‘लॅक्मे फॅशन वीक’ची लोकप्रियता आणि फॅशन इंडस्ट्रीच्या दृष्टीने असलेलं त्याचं महत्त्व फार मोठं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इथेच फॅशनचे नवनवे ट्रेण्ड सेट होतात आणि मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्याचे पडसाद उमटत जातात. गेले काही वर्षे या फॅशन वीकच्या माध्यमातून सर्वसामान्यांना रुचेल आणि परवडेल अशीच डिझाइन्स, फॅब्रिक्स सादर करण्यावर डिझायनर्सकडून सातत्याने भर दिला जातो आहे. यंदाचा फॅशन वीकही याला अपवाद ठरला नसला तरी काही वेगळेच ट्रेण्ड्स फॅशनप्रेमींनी अनुभवले. करोनानंतर खऱ्या अर्थाने फक्त फॅशन शोपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेवून डिझाइन केलेले कपडे यंदा रॅम्पवर प्रामुख्याने दिसले.
यंदाचं कलेक्शन हे खास तरुणाईसाठी असलं तरी फॅशन शोमधील अनेक रूढ चौकटी मोडलेल्याही अनुभवायला मिळाल्या. आजची पिढी जशी उत्साही, ट्रेण्ड फॉलो करणारी आणि फॅशनेबल आहे तसेच कलेक्शन डिझायनर्सने सादर केलं. याखेरीज आजचे तरुण कपडय़ांबरोबर ॲक्सेसरीजनाही तितकेच महत्त्व देतात. त्यामुळे कपडय़ांच्या कलेक्शनबरोबरच त्याला साजेशा ॲक्सेसरीजसाठी ठरावीक ब्रॅण्डबरोबर टाय अप करत एक पूर्ण लुक लोकांसमोर ठेवण्याची डिझायनर्सची धडपड फॅशन वीकमध्ये जाणवली. प्रामुख्याने आयवेअर, फुटवेअर, बॅग्ज तसेच हेडफोन्ससारख्या ॲक्सेसरीजचा यात समावेश होता.
सिल्वेट्स
यंदा रॅम्पवर कट्सची जादू चांगलीच चालली. अगदी सगळय़ाच फॅशन डिझायनरच्या कलेक्शनमध्ये कट्सचा कलात्मक वापर दिसून आला. नॉर्मली साइड कट, फ्रंट हे दोनच प्रकार आपल्याला माहिती आहेत, पण यंदा हाताच्या बाह्यांवरती कट्स, क्रॉस कट्स, क्रॉप टॉपला ऑफ फ्रंट कट्सपासून ते कपडय़ाच्या खालच्या बाजूला कट्स असे अनेक प्रकार ट्रेण्डमध्ये होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा