‘धग’ या चित्रपटासाठी उषा जाधव हिची राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत घोषणा झाल्यानंतर कोल्हापूरच्या या कन्येला अवघ्या महाराष्ट्राने सलाम केला. ‘बधाई हो बेटी हुई हैं’ या कौन बनेगा करोडपती जाहिरातीच्या माध्यमातून उषाचा चेहरा घराघरात पोहोचला. व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून आता या कोल्हापूरच्या कन्येला आपण प्रत्यक्ष भेटणार आहोत.
नाटकाची पाश्र्वभूमी असलेल्या उषाने शॉर्ट फिल्मस् तसेच टीव्ही मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये स्वतची एक ओळख निर्माण केलेली आहे. केवळ टीव्ही किंवा चित्रपट नाही तर, जाहिरात क्षेत्रामध्येही उषाने तिच्या कामाची चुणूक दाखवलेली आपल्याला दिसून येईल. टाटा डोकोमो, फेविकॉल, हेड अ‍ॅण्ड शोल्डर्स यासारख्या जाहिरातींमधूनही ती आपल्याला दिसली.
‘ट्रॅफिक सिग्नल’ या मधुर भंडारकरच्या चित्रपटामधून तिने बॉलीवुडमध्ये श्रीगणेशा केला. लाऊंजच्या माध्यमातून उषासोबत आपण जाणून घेणार आहोत तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास आणि तिच्या या क्षेत्रातील भावी योजना.

तारीख : १२ जून २०१३
वेळ : दुपारी ३. ३०
स्थळ : पुल देशपांडे मिनी थिएटर, प्रभादेवी   
प्रवेश सर्वासाठी खुला आहे.

Story img Loader