‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील या ओळी ऐकायला जितक्या छान आहेत तितक्याच प्रॅक्टिकली किती कठीण हे व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी वाटायला लागतात. कॉलेजमध्ये वर्षभर ताठ मानेने आपली गर्लफ्रेण्ड मिरवणाऱ्या ‘बॉयफ्रेण्ड’ वाल्यांची जमात फेब्रुवारी महिना येताच हवा गेलेल्या फुग्यासारखी होते. आणि ही स्थिती फक्त कॉलेज कॅम्पसमध्ये नसते तर विश्वातील संपूर्ण ‘बॉयफ्रेण्ड, प्रियकर, नवरा’ या वर्गाला फेब्रुवारी महिना धास्तावून टाकतो. आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांना दरवर्षी विविध शकला लढवाव्या लागतात. सेिव्हगस, पॉकेटमनी यांचे तीनतेरा वाजतात. आणि त्यात तिच्या मत्रिणीच्या किंवा बहिणीच्या नवऱ्याने किंवा बॉयफ्रेण्डने आपल्यापेक्षा काही गॅण्ड सेलिब्रेशन प्लॅिनग केल्याचा नुसता सुगावा जरी त्यांना लागला की मग काही विचारू नका. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी त्यांची अवस्था होते. ‘तसा प्लॅन तुला का नाही सुचला’ या विषयावर दोघांचा परिसंवाद सुरू होतो. आणि याचा शेवट ‘तुझं माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम राहिलं नाही’ हे ब्रह्मास्त्र सोडून तिच्या डोळ्यांतून गंगाजमुना वाहायला लागतात.
दरवर्षी तुम्ही ठरवता की, मागच्या वेळी सारखी फजिती होऊ द्यायची नाही पण माशी कुठेतरी िशकतेच. म्हणून या वर्षी आम्ही ठरवलं तुम्हाला थोडीशी मदत करायची तुमचा व्हॅलेंटाइन डे छानपकी साजरा करण्यासाठी. म्हणून तुमच्यासाठी काही टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. तुमचा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा याचं प्लॅिनग तर आहेच पण थोडय़ा सेिव्हगसच्या आयडियाज् पण आहेत.

१. ग्रीटिंग कार्ड :
वेल, व्हॅलेंटाइन्स डेची सुरुवातच मुळी होते ग्रीटिंग कार्डनी. त्यामुळे हे विसरून चालणारच नाही. एक सुंदरसं व्हॅलेंटाइन डे कार्ड तिच्या चेहऱ्यावर छानसं स्माइल आणायला पुरेसं असतं. त्यामुळे ग्रीटिंग कार्ड इज मस्ट. तुम्ही जर दिवसभर बाहेर फिरणार असाल तर एखादं छोटंसं कार्ड घ्या, जे ती आपल्या बॅगमध्ये टाकू शकेल. मोठी कार्ड्स हातात घेऊन दिवसभर मिरवायला मुलींना अजिबात आवडत नाही. जर तुम्हाला छानशी कविता किंवा चारोळी लिहिता येत असतील तर विकतच्या कार्डपेक्षा तुमच्या हाताने छानसं कार्ड बनवून देऊ शकता.

२. दिवसाची अनपेक्षित सुरुवात :
दिवसाची सुरुवात एखाद्या छानशा सरप्राइझनं होणार असेल तर कुणाला आवडणार नाही. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी करा की ज्याची तिने कल्पनाही केली नसेल. तिच्यासाठी बेड टी, ब्रेकफास्ट बनवा किंवा सकाळी तिच्या मोबाइलवर छानसा मेसेज पाठवून तिला विश करा. खूपशा मुली आपला बॉयफ्रेण्ड आपल्याआधी पोचून आपली वाट बघतोय हे पाहूनच खूश होतात तर काहींची तो आपल्याला भेटताना तरी अपटूडेट असावा, अशी अपेक्षा असते. या छोटय़ा छोटय़ा गोष्टी करून तिला सरप्राइज करू शकता.

३. मनाजोगा फेरफटका :
काही गोष्टी असतात ज्या आपण रुटीनमध्ये करायच्या विसरून जातो किंवा त्या होत नाहीत. अशा गोष्टी पूर्ण करण्यासाठी व्हॅलेंटाइन्स डेसारखे दिवस असतात. तिला मनापासून काय करायला आवडतं याचा विचार करून तुमचा अख्खा दिवस प्लॅन करा. कोणाला छान समुद्राकाठी बसायला आवडतं, तर कुणाला हेरिटेज ठिकाणांना जायला. काही जणी एकदा तरी फिल्मसिटीला जाता यावं असा विचार करीत असतात. १४ तारीख शुक्रवारी आहे. त्यामुळे तसा विचार करून प्लॅन ठरवा. नवीन सिनेमा रिलीज व्हायचा हा दिवस. तुम्ही मुव्हीचा प्लॅन करणार असाल तर ‘हंसी तो फंसी’ आणि ‘गुंडे’ या दोन मूव्हीज तुम्हाला पाहता येतील. एखादी अ‍ॅडव्हेंचर्स ट्रीप तुम्ही प्लॅन करू शकता.

४. इनडोअर प्लॅन्स :
अगदी घरातल्या घरातसुद्धा तुम्हाला छान प्लॅन करून व्हॅलेंटाइन्स डे साजरा करता येईल. वाइन अ‍ॅण्ड डाइनचा छान घरगुती कार्यक्रम आखता येईल. एखादी रोमँटिक मुव्ही, वाइन आणि मंद दरवळणारा सुवास असा मस्त माहौल तयार करू शकता. काराओके, कुकिंग किंवा पेंटिंगसारखी एखादी गोष्ट एकत्र करू शकता किंवा काहीच नाही तर जुना अल्बम काढून त्या आठवणींना उजाळा देऊ शकता.

५. गिफ्ट्स :
व्हॅलेंटाइन्स डेचा सगळ्यात मोठा भाग असतो तो गिफ्ट्सचा. आता ही जबाबदारी फक्त मुलाची नसते तर मुलीची पण असते. जो आपला दिवस इतका सुंदर व्हावा म्हणून धडपडतोय त्याच्यासाठी छानसं गिफ्ट.. इतना तो बनता है बॉस!
एकमेकांना गिफ्ट देताना एखादी अशी गोष्ट द्या, जी समोरचा स्वत:साठी गरज असूनही घेत नाही. उदाहरणार्थ, एखादा महागडा परफ्यूम, मेकअप कीट, छानसं पेन, टाय, ब्रॅण्डेड घडय़ाळ.
हल्ली खूपशा पर्सनलाइज्ड गोष्टी मिळू लागल्यात. काही गोष्टींना खास कॉमिक टच दिलेला असतो. उदाहरणार्थ कपल्स मग्स, पेंडेंट्स, नावं लिहिलेली कुशन कव्हर्स, फोटो फ्रेम्स.
प्लॅन काहीही करा. पण एक लक्षात असू द्या की, तुम्हाला एकमेकांसोबत काही क्षण घालवण्यासाठी हा दिवस असतो. त्यामुळे भरगच्च प्लॅनसमध्ये तुमचा एकमेकांसाठी असलेला वेळ दवडू नका. हॅपी व्हॅलेंटाइन्स डे!!!

Story img Loader