‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील या ओळी ऐकायला जितक्या छान आहेत तितक्याच प्रॅक्टिकली किती कठीण हे व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी वाटायला लागतात. कॉलेजमध्ये वर्षभर ताठ मानेने आपली गर्लफ्रेण्ड मिरवणाऱ्या ‘बॉयफ्रेण्ड’ वाल्यांची जमात फेब्रुवारी महिना येताच हवा गेलेल्या फुग्यासारखी होते. आणि ही स्थिती फक्त कॉलेज कॅम्पसमध्ये नसते तर विश्वातील संपूर्ण ‘बॉयफ्रेण्ड, प्रियकर, नवरा’ या वर्गाला फेब्रुवारी महिना धास्तावून टाकतो. आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांना दरवर्षी विविध शकला लढवाव्या लागतात. सेिव्हगस, पॉकेटमनी यांचे तीनतेरा वाजतात. आणि त्यात तिच्या मत्रिणीच्या किंवा बहिणीच्या नवऱ्याने किंवा बॉयफ्रेण्डने आपल्यापेक्षा काही गॅण्ड सेलिब्रेशन प्लॅिनग केल्याचा नुसता सुगावा जरी त्यांना लागला की मग काही विचारू नका. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी त्यांची अवस्था होते. ‘तसा प्लॅन तुला का नाही सुचला’ या विषयावर दोघांचा परिसंवाद सुरू होतो. आणि याचा शेवट ‘तुझं माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम राहिलं नाही’ हे ब्रह्मास्त्र सोडून तिच्या डोळ्यांतून गंगाजमुना वाहायला लागतात.
दरवर्षी तुम्ही ठरवता की, मागच्या वेळी सारखी फजिती होऊ द्यायची नाही पण माशी कुठेतरी िशकतेच. म्हणून या वर्षी आम्ही ठरवलं तुम्हाला थोडीशी मदत करायची तुमचा व्हॅलेंटाइन डे छानपकी साजरा करण्यासाठी. म्हणून तुमच्यासाठी काही टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. तुमचा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा याचं प्लॅिनग तर आहेच पण थोडय़ा सेिव्हगसच्या आयडियाज् पण आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा