मृण्मयी पाथरे

मेघन आणि मेघना – शिक्षणाच्या निमित्ताने एकाच कॉलेजमध्ये असल्याने त्यांची गाठभेट झाली. पुढे दोघंही नोकरीसाठी पुण्यात आले आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. सोसायटीमधील मंडळींनी आक्षेप घेऊ नये म्हणून दूरची भावंडं आहोत असं सांगून कशीबशी एक जागा भाडय़ाने घेतली. तरीही त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांच्या तिरक्या नजरांचा सामना त्यांना आजही करावा लागतो.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
actor Imran Khan ex wife Avantika Malik comments on divorce
बालपणीचं प्रेम पण अवघ्या ८ वर्षांत मोडला संसार; बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी घटस्फोटाबाबत म्हणाली, “जर मी…”

मनस्विनी आणि मानस – गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं चाळिशीतलं जोडपं.. दोघंही एकमेकांना फुलासारखं जपतात. एकमेकांच्या बारीकसारीक आवडीनिवडी लक्षात ठेवतात आणि करिअरचा विचार करतात. पण त्यांना कोणीही भेटलं की एक प्रश्न हमखास विचारला जातो – ‘इतकी वर्ष एकत्र आहात, मग आता लग्न कधी करणार?’

आफ्ताब आणि नीरजा – या दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम जरी असलं तरी दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या लग्नाला त्यांचे धर्म वेगवेगळे असल्यामुळे विरोध आहे. या दोघांनीही एकमेकांच्या घरच्यांशी संवाद साधून आपली बाजू मांडली, तरी कोणाच्याच कुटुंबाने त्यांच्या नात्याचा अजूनही स्वीकार केला नाही. या दोघांनी यापुढे एकमेकांना भेटू नये अशी सक्त ताकीदच त्यांच्या घरच्यांनी दिली आहे.

अरुणा आणि अरुण – दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्याने त्यांची ओळख झाली. पुढे अरुणाला प्रमोशन मिळालं आणि तिची अरुणची बॉस म्हणून नियुक्ती झाली. प्रमोशन मिळण्याआधीसुद्धा कित्येक वर्ष या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. दोघंही एकमेकांना आपल्या मनातलं सगळं काही सांगायचे. कालांतराने दोघांनी आपण एकमेकांना डेट करत आहोत हे ऑफिसमध्ये जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. अरुण हा अरुणाच्या केवळ आर्थिक स्थैर्यामुळे आणि त्यालाही तिच्याकडून प्रमोशन मिळण्याची अपेक्षा असल्यामुळे सोबत आहे, अशी कुजबुज काही जणांमध्ये सुरू झाली.

आरोह आणि आरोही – हे दोघेही बालमित्र.. त्यांच्या लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा पूर्ण पािठबा होता. लग्न झाल्यावर अवघ्या दहा दिवसांत आरोह दुबईमध्ये काम करायला गेला, तर आरोहीसुद्धा जपानमध्ये कामानिमित्त गेली. बघता बघता लग्नाला तीन वर्ष झाली. हे दोघंही आपापलं काम मनसोक्त एन्जॉय करत होते आणि आपल्या नात्यातला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांना सरप्राइझेस देत होते. पण त्यांच्या घरच्यांना ह्यांचं लग्न कसं टिकेल याची जास्त काळजी वाटत होती. कालांतराने यांचे नातेवाईक ‘एकमेकांपासून वेगळंच राहायचं होतं, तर कशाला उगाचच लग्न करायचं?’ असेही शेरे मारू लागले.       

कबीर आणि केदार – हे दोघंही त्यांच्या शहरात होणाऱ्या ‘प्राइड मार्च’मध्ये भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनी खूप मेहनत करून घर भाडय़ाने  घेतलं. घराच्या मालकाला आम्ही मित्र म्हणून एकत्र राहत आहोत असं सांगितलं खरं, पण आपण इतर जोडप्यांप्रमाणे आपलं एकमेकांवरचं प्रेम जगजाहीर का करू शकत नाही, ही खंत त्यांना वाटत होती. 

इशा, इशिका आणि ईशानी – तिघीही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या आहेत. आपण पॉलीएमरस (स्र्’८ंे१४२) नात्यात आहोत आणि मुळात पॉलीएमरी म्हणजे नक्की काय हे सांगण्यापेक्षा ‘आम्ही तिघी मैत्रिणी एकत्र राहतो’ हे सांगणं त्यांना इतरांच्या अनेक त्रासदायक प्रश्नांपासून वाचवतं. पण या प्रत्येकीच्या घरच्यांनी ‘आता चांगलं कमवायला लागली आहेस. लग्न कधी करणार?’ हा प्रश्न विचारून त्यांना हैराण केलं आहे. इशाच्या घरच्यांनी तर तिला न विचारता मॅट्रिमोनी साइटवर तिचं नावही नोंदवून टाकलंय.   

या सगळय़ांचे अनुभव वाचता वाचता तुमच्या मनात नक्की कोणते विचार आले? सगळय़ात आधी दिलेली उदाहरणं थोडीफार का होईना, पण मनाला थोडीफार समजणारी आणि पटणारी होती. परंतु शेवटची उदाहरणं खरंच आपल्या समाजात असतील का आणि असली, तरी आपल्या आजूबाजूला असतील का, असे प्रश्नही आपल्यापैकी काही जणांच्या मनात डोकावले असतील. आपलं मूल एका विशिष्ट वयाचं झालं की त्यांचं लग्न एका सुशिक्षित मुलाशी किंवा मुलीशी व्हावं, अशी कित्येक पालकांची इच्छा असते. पण आजच्या पिढीला नक्की काय हवंय, याचा आपण विचार केला तर?

‘सध्याच्या पिढीला नुसतं आपल्या करिअरवर फोकस करायला सांगा. आणि मग तिशी ओलांडल्यावर लग्न करा. मग मुलंबाळं होत नाहीत म्हणून डॉक्टरच्या फेऱ्या वाढवा. काय चाललंय यांचं, काहीच कळत नाही बुवा. कसं होणार यांचं?’ असे संवाद आपल्यापैकी कित्येक जणांनी कधी ना कधी ऐकले असतील. मुळात सगळय़ांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी लग्न करायचंच आहे, आणि आधी लग्न आणि मगच मुलंबाळं असे आपल्या समाजातील कित्येक अलिखित ‘नियम’ आहेत. बरं, या विचारसरणीमुळे प्रत्येक व्यक्तीला लग्नानंतर मूलबाळ हवंच आहे, हेसुद्धा अधोरेखित केलं जातं. आणि ज्यांना मूल नको असेल त्यांना त्यांचा निर्णय म्हातारपणी कसा महागात पडेल याबद्दल कित्येकदा सुनावलं जातं. गेल्या अनेक पिढय़ान् पिढय़ा आपण प्रेमाच्या अनुभवांवर किती बंधनं आणली आहेत ना? रंग-रूप, जात, धर्म, वयातील अंतर, आर्थिक परिस्थिती, पूर्वी झालेले प्रेमभंग किंवा घटस्फोट, जेंडर आयडेंटिटी, सेक्शुअल ओरिएन्टेशन, नात्याचे समाजमान्य अपेक्षित टप्पे आणि अशा कित्येक गोष्टींवरून आपण प्रेमाचे निकष ठरवत जातो. पण हे निकष ठरवणारे आपण आहोत तरी कोण? इतरांनी कोणावर प्रेम करावं, केव्हा करावं, ते कसं व्यक्त करावं, नात्यातलं पुढचं पाऊल कधी उचलावं हे सगळं ठरवण्याचा हक्क आपल्याला कोणी दिला? समाजाने ठरवलेल्या आयुष्याच्या ‘टाइमलाइन’पेक्षा आपल्या प्रत्येकाचं आयुष्य आणि आपली जीवनस्वप्नं वेगवेगळी असू शकतात. समाजमान्य अपेक्षांना डावलून जर कोणी प्रेमात पडलं, तर नक्की काय बिघडलं? इतरांनाही त्यांना त्यांच्या आयुष्यात काय करायचं आहे आणि कोणावर प्रेम करायचं आहे याचं स्वातंत्र्य आहे, नाही का? त्यामुळे आपल्या विचारसरणीला अनुसरून जरी इतरांची प्रेमाची व्याख्या नसली, तरी येत्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने का होईना प्रेमाला प्रेमाने पाहू चला..

Story img Loader