वजन कमी करायला काय टाळायला हवं, वजन वाढवायचं असेल तर काय करायचं? शाकाहारी- मांसाहारी आहारातले फायदे- तोटे काय? आयडियल डाएट चार्ट कसा असू शकेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे पाक्षिक सदर.
लवकरात लवकर वजन घटवायचं असेल तर सॅलड खाल्लंच पाहिजे, असं सांगितलं जातं. नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर फक्त बॉइल्ड चिकन खा, असाच सल्ला दिला जातो. वजन वाढवायचं असेल तर अंडी खायलाच हवीच, नॉनव्हेज हवंच, असंही म्हणतात. खरोखर चार आठवड्यांमध्ये वजन कसं कमी करायचं याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी अर्थातच डाएटिशिअनचा सल्ला आणि व्यवस्थित ठरलेला व्यायाम हवाच. याबाबत कुणाचं दुमत नसतं. पण, वजन घटवायचं असेल किंवा वाढवायचं असेल किंवा एकंदरीत चांगलं आरोग्य राखण्यासाठी शाकाहार घ्यावा की मांसाहार हा अजूनही वादाचा विषय आहे. या दोहोंमधील डाएटच्या दृष्टीने फरक समजून घेण्यासाठी आजचा लेख लिहिते आहे. यातून शाकाहार आणि मांसाहाराचे फायदे-तोटे समजून घेऊ शकता. तुमच्या मनातील काही गरसमज काढून टाकण्यासाठी आजचा लेखप्रपंच.
सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, शाकाहार आणि मांसाहार दोन्ही आहार प्रकारातील खाद्यपदार्थाचे फायदे आहेत. शाकाहारी माणूस प्रथिनांची गरज दुग्धजन्य पदार्थातून भागवू शकतात. तर मांसाहारात तंतूयुक्त पदार्थाची गरज (फायबर) भाज्यांचे सूप आणि सॅलडमधून भागवू शकतात.
शरीराला गरजेची पोषकद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळावीत यासाठी आहारात काबरेहायड्रेट आणि प्रोटीन्स यांचा समतोल राहावा याची काळजी घेतली पाहिजे. दोन्ही आहारांमधून मुख्य पोषकद्रव्यांची गरज भागवता येऊ शकते. (उदाहरणार्थ, शाकाहारींसाठी प्रोटीन्स आणि मांसाहारींसाठी फायबर)
शरीरात जर एखाद्या पोषकद्रव्याचे प्रमाण जास्त झाले तर त्यामुळे शरीराचा समतोल ढळू शकतो ज्यामुळे वजन घटणे, वजन वाढणे किंवा एखादी वैद्यकीय गुंतागूंत निर्माण होऊ शकते.
एकंदरीत, दोन्ही आहारांचे फायदे-तोटे आहेत, पण पोषकद्रव्यांचा समतोल आणि त्यांचे आहारातील प्रमाण निरोगी शरीर राखण्यासाठी गरजेचे आहे. शाकाहार किंवा मांसाहार करणे हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे, पण तुमच्या आहारात कुठले पोषकद्रव्ये कमी पडतेय हे जाणून घेतले तर ही समस्या सोडवता येऊ शकते.
सोबतच्या चौकटीत दिलेला डाएट चार्ट शाकाहारी आणि मांसाहारी व्यक्तींना योग्य प्रमाण काय याचा अंदाज येण्यासाठी देत आहे. यामध्ये दिवसातून सहा वेळा थोडं थोडं जेवण घ्यावं, असं मी सांगतेय. सिक्स मील्स अ डे.. अर्थात ६ जेवणांचा उद्देश हा योग्य संतुलित आहार शरीराला मिळावा हा आहे. या छोट्या छोट्या खाण्याच्या माध्यमातून काबरेहायड्रेट आणि प्रोटीन्सच्या माध्यमातून शरीराला दोन्ही पोषकद्रव्यांचे योग्य प्रमाण मिळत राहते ज्यामुळे चांगले आरोग्य राखता येते.
जान्हवी चितलिया -viva.loksatta@gmail.com
(लेखिका फिटनेस न्यूट्रिशिनिस्ट आणि वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहेत.)
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2015 रोजी प्रकाशित
व्हेज की नॉनव्हेज?
वजन कमी करायला काय टाळायला हवं, वजन वाढवायचं असेल तर काय करायचं? शाकाहारी- मांसाहारी आहारातले फायदे- तोटे काय? आयडियल डाएट चार्ट कसा असू शकेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारे पाक्षिक सदर.

First published on: 20-03-2015 at 01:17 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veg or non veg