आपल्या आवडत्या अभिनेत्रीला ऐकता आलं आणि तिच्या उत्साही, पॉझिटिव्ह व्यक्तिमत्त्वातून खूप काही घेण्यासारखं होतं, अशीच प्रतिक्रिया कार्यक्रमाला उपस्थित रसिकांकडून ऐकायला मिळाली. मुक्ताने रंगवलेली ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. अभिनेत्री मुक्ता बर्वेची कवयित्री म्हणूनसुद्धा ओळख कार्यक्रमाच्या शेवटी झाली. तिने ऐकवलेल्या स्वरचित कवितांनी प्रेक्षकांना अनपेक्षित सुखद धक्का दिला. उपस्थितांपैकी काही तरुण प्रेक्षकांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
मुक्ता बर्वे माझी लाडकी अभिनेत्री आहे. तिला भेटायला म्हणून मी खास डोंबिवलीवरून माझ्या कॉलेजच्या वेळा अड्जस्ट करून कार्यक्रमाला हजेरी लावली. मला तिच्या कविता खूप आवडल्या. तिची कवयित्री म्हणून नव्याने ओळख झाली.
मुक्ता बर्वेची फॅन तर मी आधीपासूनच आहे, पण आज तिच्या दिलखुलास गप्पा ऐकल्या, ज्या अजूनच छान वाटल्या. आई-वडिलांवर विश्वास ठेवा आणि पालकांनीही आपल्या मुलांवर विश्वास ठेवा ही गोष्ट आवडली.
तिच्या आताच्या भूमिकांपेक्षा एक वेगळं रूप आजच्या कार्यक्रमातून सापडलं. तिचा आतापर्यंतचा प्रवास प्रत्येकासाठीच खरंच खूप इन्स्पायिरग आहे. तिची कविता करण्याची प्रतिभा खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे.
मुक्ता बर्वे आधीपासूनच माझी इन्स्पिरेशन आहे, पण आजचा कार्यक्रम ऐकून तिच्याबद्दलचा आदर अजूनच वाढलाय. तिचे सगळे अनुभव ऐकून मलाही आता तिच्यासारखंच काही तरी करायला आवडेल.
मुक्ताचं बोलणं इन्स्पिरेशनल होतं. तुम्ही कुठेही काहीही करा, पण जे काही कराल ते पूर्ण अभ्यास करून. ही मुक्ताने सांगितलेली गोष्ट मला आवडली. माझ्या नव्या करिअरला दिशा मिळाली.
मुक्ता आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची मुलाखत होणार आहे हे कळल्यावर मी खूप उत्सुक होती. तिचा प्रवास, करिअरकडे पाहण्याची तिची वृत्ती याबद्दल जाणून घेता आलं.