नेटविश्वात एखादा विषय, छायाचित्र, मुद्दा सैरावैरा होणे म्हणजेच ‘व्हायरल’ अशी मायाजालाची परिभाषा. या आठवडय़ात मायाजालाला व्यापून टाकणाऱ्या इन्फेक्शनची गोष्ट आहे – एका बालपणाची आणि बालपण टॅप करणाऱ्या उद्योजकाची.
बालपण या चार अक्षरी शब्दांत एक सुखनैव जिंदगी दडलेली आहे. कर्तेपणाची झूल लादली जाण्यापूर्वीचं जग. नोकरी-व्यवसाय नाही. सांसारिक जबाबदाऱ्या नाहीत. कर्जाचे हप्ते नाहीत. शिष्टाचार जपण्याचं मिंधेपण नाही आणि एकुणातच रुटिनची चाकोरी नाही. हुंदडण्याचं, खिदळण्याचं, धमाल मस्तीचं स्ट्रेसमुक्त जग. चंपक-ठकठक-चांदोबा वाचणं, बोरकूट खाणं, आगळीक केली म्हणून हातावर ताशीव लाकडी पट्टीचे रट्टे झेलणं, छत्री आणि रेनकोट असतानाही नखशिखांत भिजणं, ट्रेन किंवा बसमध्ये खिडकी मिळावी यासाठीची धडपड, जत्रेत ‘मौत का कुआ’ पाहण्याचं कुतूहल, मारुतीच्या मंदिरात त्याची इन्फिनिटी शेपटी कुठपर्यंत आहे याचा घेतलेला शोध, हट्टाने प्लॅस्टिक बॉलच्या आकारातलं आइस्क्रीम मिळवणं असे अनेक बालपणाचे कप्पे प्रत्येकाच्या मनाच्या सांदीकोपऱ्यात जपलेले असतात. बदल हा आपला स्थायीभाव. व्हायरल झालेली ही गोष्ट आहे एका बालपणाची आणि बालपण टॅप करणाऱ्या उद्योजकतेची.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा