व्हायरल म्हटल्यावर केवळ इन्फेक्शनच डोळ्यासमोर येते. पण नेटविश्वात सैरावैरा होणे म्हणजेच व्हायरल अशी मायाजालाची परिभाषा. मायाजालाला व्यापून टाकणाऱ्या इन्फेक्शनची गोष्ट – ‘व्हायरलची साथ’मध्ये.
‘समाजमाध्यमे’ असं उच्चारलं तरी अनेकांची नाकं फेंदारतात. गुगलशत्रू मंडळी तर ही ‘रिकामटेकडय़ांची थेरं’ असं वर्गीकरण करून टाकतात. पत्रकारितेला लोकशाहीचा स्तंभ संबोधतात. समाजमाध्यमांना या स्तंभाखाली आणणं म्हणजे ‘जेम्स ऑगस्टस हिके ते जांभेकर’ पत्रकारितेला बट्टा लावणे अशीच कर्मठवाद्यांची धारणा. त्यातच हल्ली स्तंभांचेही सिमेंटीकरण झाले आहे. सिमेंट म्हटलं की आमच्या चित्तचक्षूंसमोर घोटाळेच तरळतात. पण आम्ही सहिष्णू आहोत आणि कसं आहे, टीकेतूनही सकारात्मक बिंदू शोधून प्रेरणा मिळवण्याचं कसब सांप्रत काळी आम्ही मिळवलं आहे. जे जे नवीन उत्कट ते अंगीकारण्याचा आमचा प्रयत्न असतो. या प्रयत्नात परवा आम्ही अगदी व्यथित झालो. प्रति महिना ४०० रुपयांत अगणित नेटपॅक मांडीसंगणकावर अर्थात लॅपटॉपवर इन्स्टॉल असल्याने बफरिंग नावाच्या डोक्याला वात आणणाऱ्या प्रकारापासून आम्ही मुक्त आहोत. मायाजालात विहरताना एक व्हिडीओ समोर आला.

व्हिडीओत एक घर दिसतं- स्वयंपाकघरात एक कॉट मांडलेली. त्यावर एक वृद्ध महिला पांघरुण घेऊन बसली आहे. वयानुरूप ही महिला आजारी असावी असं स्पष्ट जाणवतं. तेवढय़ात मागून दुसऱ्या खोलीतून आणखी एक महिला धावत येते. तिच्या हातात ओढणीसारखी वस्तू असते. त्याच्या साह्य़ानेच ती वृद्ध महिलेचा गळा दाबते. वृद्ध महिला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते. मग ती बाई कॉटवर चढते. आणखी जोरात गळा आवळण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर वृद्ध महिलेच्या पाठीत गुद्दे मारते. मग ती महिला ओढणी वृद्ध महिलेच्या गळ्याभोवती गुंडाळून डोक्यावर सपासप मारते. आपला आवंढा आपल्या घशात राहतो. महिलेची क्रौर्य पातळी वाढते. ती वृद्ध महिलेचा कान जोरात पिरगाळते. मग डोक्यावरचे केस उपटण्याचा प्रयत्न करते. ओढणी करकचून गळ्याभोवती बांधण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू होतात. या वेळी ती वृद्ध महिलेला कॉटवर आडवं पाडते. बेदम चोप देते. वृद्ध महिला असह्य़पणे ओरडत राहते. मदतीसाठी सभोवतालातून कोणीही येत नाही. ती महिला दुसऱ्या खोलीत जाते. आपल्याला हायसं वाटतंय तोच ती महिला दुसऱ्या खोलीतून दगड घेऊन येते. छोटय़ा आकाराचा दगड ती वृद्ध महिलेच्या डोक्यात घालते. नंतर त्याच दगडाने पाठीत वार करते. नंतर गदागदा हलवून वृद्ध महिलेचं डोकं कॉटच्या लोखंडी कांबीवर आपटण्याचा प्रयत्न करते. घरातल्याच व्यक्तीवर एवढा अत्याचार करण्याची विकृती पाहून आपण थिजून जातो. व्हिडीओ संपतो, आपण सुन्न होऊन जातो.

Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
opposite nature partner
विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?
yogidham society Akhilesh Shukla
मराठी भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे, अखिलेश शुक्ला यांचा आरोप
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला तर..”, रहिवाश्यांचा संताप, वैयक्तिक वाद विकोपाला!
ONION
कांदा तुम्हाला का रडवतो? जाणून घ्या कारण…
Savlyachi Janu Savli
“महालक्ष्मीचं व्रत केलं ना…”, मेहेंदळे कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी सावली काय करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’चा प्रोमो
Indian observatories Jantar Mantar
भूगोलाचा इतिहास : वेध वेधशाळांचा; जंतर मंतर!

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पिकू’ चित्रपटातलं दीपिका पदुकोणच्या तोंडी असलेलं वाक्य आठवतं- ‘एका विशिष्ट वयानंतर पालकांना जगवावं लागतं, ती आपली जबाबदारी’. आजारपण, परावलंबित्व, कुरकुर करण्याची वृत्ती हे सगळं असलं तरी कोणी एवढं हिंसक होईल हे आपल्याला पटत नाही. सत्य घटना हा व्हिडीओ चित्रित झालाय उत्तर प्रदेशातल्या नेहतूर नावाच्या शहरातील एका घरात. वृद्ध महिलेला मारणारी व्यक्ती तिची सून आहे. कजाग पत्नी, तिची हिंसाचारी वृत्ती आणि आईची काळजी वाटून घरातल्या पुरुषाने पोलीस स्टेशन गाठलं. मात्र बहुतांशी कायदे महिलाधार्जिणे असल्याने तुमच्या ऐकीव तक्रारीवर आम्ही कार्यवाही करू शकत नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं. प्रश्नाची तड लावण्यासाठी पुरुषाने वृद्ध महिलेच्या खोलीत सीसीटीव्ही बसवला आणि त्यातच चित्रित झाला अमानुष प्रकार. पोलिसांनी फुटेज तपासलं आणि त्या महिलेला अटक केली आहे. हा व्हिडीओ फेसबुकपासून ट्विटपर्यंत व्हायरल झालाय. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या महिलेला उद्देशून महिला नेटिझन्सच्या प्रतिक्रिया तुम्ही सवडीने वाचा. वृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी या कुटुंबासाठी समाजमाध्यमांद्वारे मदतीचा हात पुढे केला आहे. समाजमाध्यमांची ताकद हीच की येथे मामला हा सूर्य, हा जयद्रथ असा..

Story img Loader