इंग्लंडमध्ये तीस लाख तर अमेरिकेत नव्वद लाख लोकांनी अचानक आपलं फेसबुक अकाऊंट बंद केलं. लाइक-शेअर-कॉमेंट-ट्विट-फॉलो हे एवढंच ‘सोशल लाइफ’ उरलंय, त्याचा आता कंटाळा येतोय का? ‘व्हच्र्युअल आयडेंटिटी सुसाइड’चं लोण आपल्यापर्यंतही पोहोचलंय का?
‘समटाइम्स पीस ऑफ माइंड लाइज इन द ‘डिलीट अँड एक्झिट ग्रुप’ बटन ऑफ व्हॉट्सअप’..असं मागे एका मत्रिणीचं स्टेटस वाचलं आणि त्यावरून ती ग्रुप चॅटवरच्या टवाळक्यांना किती वैतागलीये ते समजलं. त्यानंतर आठवडय़ाभरातच इंग्लंडमध्ये ३० लाख लोकांनी फेसबुक अकाऊंट बंद केल्याची बातमी कळली. सुरुवातीला ही बातमी ऐकून लोक फेसबुक बंद पडलंय अस वाटून हवालदिल झाले होते. एकापाठोपाठ झालेल्या या गोष्टींनी कुतूहल जागवलं आणि ‘ओम गुगलाय नम:’ केल्यावर, ‘व्हच्र्युअल आयडेंटिटी सुसाइड’ या ट्रेंडविषयी समजलं.
‘व्हच्र्युअल आयडेंटिटी’ हा शब्द तर हल्लीच्या स्क्रीन जनरेशनमध्ये फार प्रचलित आहे. मध्यंतरीच्या ‘फेसबुकीकरणा’च्या युगानंतर तरुणांच्या आयुष्यात ‘व्हॉट्सअॅपीकरणा’चं युग आलं आणि या सगळ्यात व्हच्र्युअल आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट्स तयार झाले. आपलं चांगलं तेच दाखवायची म्हणजेच व्हच्र्युअल इमेज बनवायची जणू स्पर्धाच लागली. मोठमोठ्ठे स्टेटस, लांबलचक फिलॉसॉफी झाडणाऱ्या ओळी, वेगवेगळ्या इव्हेंट्सला क्लिक केलेले फोटोज.. लाइक्स-शेअर-कॉमेंट-ट्विट-फॉलो याभोवतीच जग फिरायला लागलं. स्मार्टफोनमुळे तर या साऱ्या गोष्टी अजूनच जवळ आल्यात! अर्थात या सगळ्याला बोटावर मोजण्याइतके असले तरी अपवादही आहेत.
तर ‘व्हच्र्युअल आयडेंटिटी सुसाइड’ म्हणजे आपली ही जी काही ‘सो कॉल्ड व्हच्र्युअल इमेज’ आहे ती क्विट करायची. हा प्रॉपर ट्रेंड सध्या तरी फक्त फेसबुकवरच पाहायला मिळतोय. अतिशय सिस्टेमॅटिक प्रोसिजरने तुम्ही हळूहळू फेसबुकवरून तसंच स्वत:शी सुरू असलेल्या वादातून मुक्ती मिळवू शकता. हे सगळं थोडंसं विचित्र वाटत असलं तरी खरं आहे! आणि हल्ली तर अधिकाधिक लोकसंख्या ‘फेसबुकाधीन’ होत असतानाही ज्या अर्थी लोकांना ‘व्हच्र्युअल आयडेंटिटी सुसाइड’सारखं काही तरी करावंसं वाटतंय, त्या अर्थी या साऱ्या गोष्टींना कंटाळलेलीही मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत हेही तितकंच खरंय!!
यामागची कारणं खरे तर खूप स्पष्ट तसेच खूप अस्पष्ट आहेत. दिवसभर कुठल्या ना कुठल्या स्क्रीनपुढे असतो आपण, टी.व्ही-कॉम्प्युटर नाही तर मोबाइल! सतत जगाशी कनेक्टेड राहण्याचा अट्टहास.. आणि हा अट्टहास इतका की, त्या नादात स्वत:शी कधी डिस्कनेक्ट होतो आणि आपली प्रोफाइल इन्फो कशी इनकम्प्लीट राहते ते सोयीस्करपणे विसरतो आपण! अशा कुठल्या मोठय़ा ईप्सितासाठी झगडतोय आपण स्वत:शी.? स्वत:ची गोंडस छान प्रतिमा तयार करून तिला जपण्यासाठीची आपली दमछाक दिवसेंदिवस अधिक इम्पेशंट, दुबळी आणि चिडचिडी करत चाललीये आपल्याला. आपल्या कल्चर-रिलेशनशिप-फेस्टिवलच्या व्याख्याही बदलत चालल्यात. एफ.बी-व्हॉट्सअॅपवर टाकण्यासाठी सजून काढलेले फोटो आणि गंमत म्हणून टाकलेले रिलेशनशिप स्टेटस या सगळ्यांतून काय साध्य करू पाहतोय आपण? तासन्तास सोशल नेटवìकग साइट्सवर ऑनलाइन राहून खरंच सोशल होतोय का आपण? पण मर्यादित आणि योग्य वापर करणारे लोकही आपल्या आजूबाजूला आहेत. फेसबुकचा प्रभावी वापर करणाऱ्या अनेक संस्थाही आहेत आणि सोशिअल साइट्सने अनेक अभूतपूर्व क्रांतीही घडवल्या आहेत. काही लोक तर अजून याच्या वाटय़ाल्याच गेली नाहीयेत; पण ज्यांनी या गोष्टींचा अतिरेक केलाय ना, ती लोक वैतागलीयेत आता! कुठे तरी ना उबग आलाय या सगळ्याचा आणि अर्थात याला फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपचे अपडेटेड व्हर्जन्स नाही, तर आपण स्वत:च कारणीभूत आहोत. स्टेटस सिम्बॉल्स, फॅशन, क्रेझ, हवा या सगळ्या गोष्टींच्या मागे वाहवत जाऊन सफोकेशन तर नाही ना होणार याचा विचार करणं गरजेचं झालंय!
पण माणसामाणसांतला संवाद हरवत चाललाय एवढं मात्र नक्की! दिवसभर कशात ना कशात तरी डोकं घालून सोशिअल होण्याच्या प्रयत्नात आई-बाबांशी चार शब्द बोलायला वेळ काढायला लागतो.! सतत व्हॉट्सअॅपवर ग्रुप चॅट किंवा एफ.बीवर चॅट करणारे लोक प्रत्यक्ष भेटल्यावर बोलणार काय? सगळे विषय ऑनलाइनच संपतात आणि रिलेशनशिप्सच्या अंडरस्टँिडगबद्दल म्हणायचं झालं तर व्हॉट्सअॅप- एफ.बी हे प्रेमाचं पॅरामीटर होऊच शकत नाही. रादर असूही नये. सगळ्या गोष्टी सोयीसाठी तयार केल्या गेल्या होत्या, परंतु सतत ऑनलाइन आणि अपडेट राहण्याच्या आपल्याच अट्टहासामुळे त्यांची गरसोयच जास्त व्हायला लागलीये. हल्ली तरुणाई जरी या गोष्टींना थोडीशी वैतागली असली तरी सध्या आपल्या आई-बाबांची पिढी मात्र यात रस घेऊ लागलीये हेही तितकंच खरंय! अजून तरी हे ‘व्हच्र्युअल आयडेंटिटी सुसाइड’चं लोण आपल्यापर्यंत म्हणावं तितक्या प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचल नाहीये, पण सुरुवात झालीये एवढं खरं. त्यामुळं काय? कितपत? कुठवर? हे आपण प्रत्येकाने ठरवून घ्यायला हवं. शेवटी या सगळ्या गोष्टी आपल्यासाठीच आहेत आणि आपली व्हर्जन्स अपडेट करण्यापेक्षा, ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करण्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. खरंय ना.!!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा