|| वेदवती चिपळूणकर
गेली जवळपास दोन वर्षं आपण सगळेच आपल्या नेहमीच्या सवयी, आवडीनिवडी गाठोड्यात बांधून ठेवून जगतो आहोत. काही गोष्टी तात्पुरत्या दुर्लक्षित झाल्या, तर काही सवयी आपसूक आणि कायमसाठीच मागे पडल्या. या दोन वर्षांत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपल्या रोजच्या भेटीगाठींपासून दैनंदिन व्यवहारापर्यंत सर्रास होऊ लागला आहे. आभासी जीवनशैली असली तरी त्यामुळे आपल्यात झालेले बदल कधी आनंददायी वाटतात, तर कधी वाईटही वाटतं. मात्र जीवनशैलीतील हे बदल आत्मसात करताना बदल हीच एक शाश्वत गोष्ट आहे हे अधोरेखित होतं…
करोनाकाळात आपण सोडून दिलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष भेटीचा अट्टहास! यात कॉलेज लाइफपासून ते अगदी रोजच्या ऑफिस कल्चरपर्यंत सगळं आलं. पण कोणतंही काम असलं तरी प्रत्यक्ष येऊन करा, कॉलेजच्या ऑफिसमध्ये भेटा, चार खेपा घाला, चार ठिकाणी एकच कागद नाचवा, पेंगत-पेंगत का होईना पण वर्गात बसून राहा, इत्यादी अनेक त्रासांतून अनेकांची मुक्तता झाली. पण त्याचसोबत मित्रमैत्रिणींना भेटणं, पार्टीज, सेलिब्रेशन, कट्ट्यावरच्या गप्पा, कँटीनमधला अड्डा या सगळ्या गोष्टीही आपोआप बंद झाल्या. या प्रत्यक्षाकडून व्हर्च्युअलकडे गेलेल्या गोष्टींमध्येच कॉलेजची लेक्चर्स, ऑफिसच्या र्मींटग्ज इथपासून ते वाढदिवसाच्या पार्टीज आणि लग्नाच्या रिसेप्शनपर्यंत सगळंच लॅपटॉप आणि मोबाइलच्या स्क्रीनच्या आकाराचं होऊन गेलं आहे. परीक्षा ऑनलाइन झाल्या, रिझल्टही ऑनलाइन लागले, अॅडमिशन्स ऑनलाइन झाल्या, क्लासमेट्सशी पहिली भेटही ऑनलाइनच झाली आणि नंतर तर कॉलेज इव्हेंट्ससुद्धा ऑनलाइन आयोजित केले गेले. प्रत्यक्ष भेटणं आपण इतकं विसरलो की कोणत्याही र्मींटगसाठी फार लांब कोणी बोलावलं की अगदी सहज आपल्या कपाळावर आठी येते आणि आपण ऑनलाइन र्मींटगचा पर्याय शोधायला लागतो. मात्र आपल्या जवळच्या माणसांना भेटण्याचं कौतुक आणि अप्रूप पूर्वीइतकंच आहे. प्रत्यक्ष भेटीशिवाय डोळ्यांना आणि मनाला समाधान मिळत नाही ही साधीशी मानवी भावना मात्र कायम आहे. ‘अंतराने अंतरातील ओढ वाढते’ म्हणतात ते काही उगीच नाही, हे या दोन वर्षांच्या माणसांच्या एकमेकांपासूनच्या दुराव्यानंतर प्रत्येकालाच पटायला लागलंय.
आणखी महत्त्वाची गोष्ट बदलली ती म्हणजे माध्यमं! आपली मनोरंजनाची माध्यमं बदलली. टीव्ही सीरियल्सकडून ओटीटीकडे सगळ्याच वयोगटाचा प्रवास झाला. आपली व्यक्त होण्याची माध्यमं बदलली. आनंद, दु:ख, भांडण या सगळ्याच गोष्टी ऑनलाइन व्हायला लागल्या. हाताने नोट्स काढायच्या ऐवजी आपण लेक्चर्समधल्या प्रेझेंटेशनचे स्क्रीनशॉट्स घ्यायला लागलो. सतत हातात मोबाइल असल्याने कागद-पेन बाजूला पडून वाणसामानाच्या यादीपासून ते रोजच्या डायरीपर्यंत सगळ्या गोष्टी मोबाइलवर सेव्ह करून ठेवू लागलो आहोत. आता हाही आपल्या डिजिटल जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. फिटनेसपासून फॅशनपर्यंत आणि शिक्षण घेण्यापासून ते तंत्रज्ञान अवगत करण्यापर्यंत अशा आपल्या आयुष्यातील अनेक लहान-मोठ्या गोष्टी या डिजिटल तंत्रज्ञानाभोवती केंद्रित झाल्या आहेत. याचा परिणाम आपल्या मानसिकतेवरही झाला आहे.
जे मितभाषी होते ते सोशल मीडियाच्या आधारे बोलू लागले, जे खूप बडबडे होते ते थोडा शांतपणे विचार करून माध्यमांवरून व्यक्त व्हायला लागले. सतत इतर लोक काय करतात यावर लक्ष ठेवणारे ‘सोशल’ लोक स्वत:कडे नीट पाहू लागले. स्वत:बद्दलचा अवेअरनेस वाढवणं, जगाबरोबर बदल आत्मसात करत स्वत:लाही बदलण्याचा प्रयत्न या डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण करू लागलो आहोत. तंत्रज्ञानाचा जीवनशैलीवर होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांचा समतोल साधत नव्या वर्षात आणखी अनुभवसमृद्ध होऊ या.
viva@expressindia.com