कडधान्य आणि तृणधान्याच्या थोडय़ा वेगळ्या, नाविन्यपूर्ण रेसिपीज आपण पाहात आहोत. यात आज उडदाचे पदार्थ. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.   
बिनतेलाचा दहीवडा
ही कल्पना मला जेव्हा आली तेव्हा तसे लक्षात आले की तळलेले दहीवडे आपण पाण्यात घातल्यावर त्यातले तेल निघून जाते. त्यापेक्षा यांना पाण्यातच शिजवलं तर? तेलाशिवाय पण तरीही चवदार डिश तयार होईल.
साहित्य : उडदाची डाळ ४ वाटय़ा, मीठ अर्धा चमचा, खाण्याचा सोडा पाव चमचा किंवा इनो अर्धा चमचा, मलईचे घोटलेले दही २ वाटय़ा, चाट मसाला पाव चमचा, साखर अर्धा चमचा, कोिथबीर गरजेनुसार, चिचं चटणी १ चमचा
कृती : उडदाची डाळ थोडी भाजून नंतर भिजवून ( २ ते ३ तासांनंतर ) वाटून घ्यावी. त्यात चवीनुसार मीठ, सोडा घालून फेटावे आणि फेटताना एवढे लक्षात ठेवा की त्यात एअर फॉर्मेशन झाले पाहिजे. दुसऱ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवून त्यात थोडे मीठ घालावे. व उकळी आल्यावर गॅस मंद करून त्यात वडे म्हणजेच डाळीचे गोळे करून सोडावे. १ ते २ मिनिटे मंद गॅस करावा व नंतर मोठय़ा गॅसवर ७ ते ८ मिनिटे शिजवून पाणी निथळत ठेवा. थंड झाल्यावर प्लेटमध्ये वडा घेऊन त्यावर घोटलेले दही, चाट मसाला चटणी, कोिथबीर घालून सव्‍‌र्ह करा.
उडीद हे पौष्टिक कडधान्य आहे. पावसाच्या सुरुवातीला पीक म्हणून उडदाची पेरणी केली जाते. उडदाला काळी व चिकट मातीची जमीन लागते. याचे रोप मुगाच्या रोपासारखे असते. त्याची पानेही मुगाच्या पानासारखीच असतात. उडदाचे रोप जवळजवळ हातभर उंचीचे बनते. शेंगा सुकल्यानंतर रोप कापून टाकून सुकवले जाते व मग त्यातून उडदाचे दाणे काढले जातात. कमीअधिक प्रमाणात उडीद भारतामध्ये सर्वत्र पिकतो. सौराष्ट्रात उडीद मोठय़ा प्रमाणावर होते. उडदाचे दाणे रंगाने काळे असतात; परंतु त्याची डाळ मात्र पांढरी शुभ्र असते. कारण उडदाची सालेच फक्त काळय़ा रंगाची असतात. उडदामध्ये फक्त एकच प्रकार दिसून येतो. उडदाची आमटी व बाजरीची भाकरी हा श्रमिक लोकांचा आवडता आहार आहे. उत्तर गुजरात, काठेवाड व राजस्थानातील आम जनतेचा हा पौष्टिक आहार आहे. अख्ख्या उडदाचा वापर फारसा केला जात नाही. त्याच्या डाळीचा व पिठाचाच वापर अधिक केला जातो. उडदापासून वडे, सांडगे, पापड, उडीदपाक यांसारखे पदार्थ बनवले जातात. उडदाची डाळ पचनसुलभ होण्यासाठी त्यात लसणाचा व िहगाचा वापर व्यवस्थित केला पाहिजे. दुभत्या गाई-म्हशींना उडीद खायला घातल्याने त्या अधिक दूध देतात.
उडदापासून तयार केलेल्या काही रेसिपीज.
राजभोग दहीवडा
साहित्य : उडदाची दाळ भिजवून वाटलेली २ वाटय़ा (उडदाची डाळ २-३ तास पाण्यात ठेवून स्वच्छ धुऊन वाटून घ्यावी व ती डाळ थोडी घट्टसर असावी.) पिवळा रंग छोटा पाव चमचा, रेड ऑरेंज रंग पाव चमचा, तळलेले काजू पाव वाटी, किसमिस अर्धा वाटी, चाट मसाला, मीठ, साखर चवीनुसार, घोटलेले मलाईचे घट्ट दही ४ वाटय़ा, कोिथबीर, बेकिंग पावडर पाव चमचा
कृती : वाटलेल्या उडदाच्या डाळीत मीठ, सोडा, तळलेल्या काजूचे तुकडे, किसमिस (मनुका) घालून छान फेटून घेणे. नंतर याचे राजभोगच्या आकाराचे गोळे करून मंद आचेवर तळून लगेच रेड ऑरेंज रंगाच्या पाण्यामध्ये घालावे. दहा मिनिटे त्यात ठेवून पाणी निथळू द्यावे. नंतर हलक्या हाताने मधून कापून दोन भाग करावे. सव्‍‌र्ह करतेवेळी मलाईच्या दहय़ात चवीनुसार मीठ, साखर घालून हे दही वडय़ांवर ओतून वरून कोिथबीर व चाटमसाला घालून सव्‍‌र्ह करावे.
पांढरा ढोकळा
साहित्य : उडदाची डाळ १ वाटी, तांदूळ १ वाटी, १ िलबाचा रस, मीठ, साखर चवीनुसार, लसूण १ चमचा, िहग छोटा पाव चमचा, कढिपत्ता बारीक लांब कापलेला २ चमचे
कृती : तांदूळ आणि उडदाची डाळ ४ तास भिजत घालून जाडसर दळावे, हे पीठ १ रात्र आंबवून चवीप्रमाणे मीठ घालवे, कुकरच्या भांडय़ाच्या बुडाला तेल लावून ढोकळय़ाप्रमाणे शिजवणे. थंड झाल्यावर वडय़ा कापून ठेवणे. १ चमचा तेलात गरम झाल्यावर मोहरी, िहग, लसूण, मीठ, साखर व अर्धी वाटी पाणी घालणे. हे मिश्रण वडय़ावर टाकून, चिरलेला कढिपत्ता घालून एखादय़ा चटणीबरोबर खायला देणे.
उडदाचे बटाटे
मधल्या वेळेला खायला एक वेगळा प्रकार. बटाटा, उडीद असल्यामुळे तसा पचायला जड आहे, पण एखादे वेळी करायला हरकत नाही.
साहित्य : छोटे बटाटे ८ ते १० नग, आलं, लसूण, मिरची, कोिथबीर पेस्ट ४ चमचे, मीठ चवीनुसार, िलबाचा रस १ नग, भिजवून जाडसर वाटलेली उडदाची डाळ १ वाटी, खोबऱ्याचे तुकडे २ ते ३ चमचे (ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे), तेल – तळायला, खाण्याचा सोडा चिमूटभर
कृती : बटाटे उकडून साले काढून घ्यावीत. मीठ, िलबू, आलं, हिरवी मिरचीची पेस्ट चोळून ठेवावी. नंतर वाटलेल्या उडदाच्या डाळीमध्ये खोबऱ्याचे तुकडे, मीठ, कोिथबीर, सोडा घालून सलसर करावे. एकेका बटाटय़ाला टूथपिक लावून डाळीच्या पिठात बुडवून तळून घ्या. गरम गरम चटणी किंवा सॉसबरोबर खायला द्यावे.
टीप : बटाटय़ाप्रमाणे छोटे छोटे कांदे घेऊन याचप्रमाणे करा. एक वेगळी आणि गोडसर अशी कांद्याची चव मिळेल.
सांजणी
शितलादेवीला नवेद्य म्हणून सांजणी करतात. आपण असे नैवेद्याचे पदार्थ फक्त त्यापुरतेच मर्यादित ठेवतो, पण माझ्या मते हे पदार्थ करायला खूप सोपे असतात आणि सहज घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंमधून होतात. त्याला थोडा वेगळा टच दिला, छान गाíनशिंग केले तर गोडाचा एक छान पदार्थ समोर येऊ शकतो.
साहित्य : उडदाची डाळ १ वाटी, तांदूळ २ वाटय़ा, नारळाचे दूध २ वाटय़ा, केशर, साखर १ वाटी, वेलची पूड , गूळ गरजेनुसार
कृती : प्रथम डाळ-तांदूळ स्वच्छ धुऊन २-३ तास भिजत ठेवा. त्यानंतर ते उपसून घ्यावे. जाडसर वाटून यात चिमटीभर मीठ, साखर घालून रात्रभर आंबवून घ्या. सकाळी छान फुगून येते. करायच्या वेळी त्यात केशर, १ वाटी नारळाचे दूध घालून तव्यावर जाडसर घावन किंवा उत्तपमसारखे करावे. तुपाबरोबर मंद आचेवर खमंग परतून घ्या. उरलेल्या १ वाटी नारळ दुधात चवीनुसार गूळ, वेलची पावडर घालून त्याबरोबर सव्‍‌र्ह करा.
टीप : पारंपरिक पद्धतीत पिठाला वाफवून त्याच्या वडय़ा पाडून तुपाबरोबर खायला देतात.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers demand geographical classification for organic vaal in Chirner uran news
उरण: चिरनेरच्या सेंद्रिय गोड वालांना हवे भौगोलिक मानांकन
india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
A bull carrying sugarcane sat on the road
त्यांचा जीव महत्त्वाचा नाही का? ऊस वाहून नेणारा बैल रस्त्यातच बसला अन्… ; काळजाचे पाणी करणारा VIDEO
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
Story img Loader