रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय.
बोनलेस चिकन विथ यलो ग्रेव्ही
यलो ग्रेव्ही : २ वाटय़ा, बोनलेस चिकन- २ वाटय़ा
कॉर्नस्टार्च, आलं, लसूण पेस्ट- २ चमचे, मीठ -चवीनुसार, तेल, एका लिंबाचा रस.        
कृती : बोनलेस चिकनला आलं, लसूण पेस्ट, मीठ आणि लिंबू चोळून १५ ते २० मिनिटे ठेवावे. नंतर याला कॉर्नस्टार्च लावून मंद आचेवर तळून काढा. सव्‍‌र्ह करते वेळी येलो ग्रेव्ही गरम करून त्यात शेवटी चिकनचे तुकडे मिसळून लगेच सव्‍‌र्ह करावे.

टोफू मसाला
साहित्य : येलो ग्रेव्ही २ वाटय़ा, टोफू – १ वाटी (सोयाबीनचे पनीर), कोकनट मिल्क- पाव वाटी (नारळाचे दूध काढायला कठीण पडते म्हणून आजकाल बाजारात रेडिमेड कोकनट मिल्क पावडर मिळते), िलबाचा रस- १ चमचा, लोणी- १ चमचा, कोथिंबीर, शहाजिरे- अर्धा चमचा, हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण- अर्धा चमचा
कृती : फ्रायपॅनमध्ये बटर घेऊन त्यात शहाजिरे, बारीक चिरलेली हिरवी मिरची व बारीक चिरलेला अर्धा चमचा लसूण घालून त्यात नंतर टोफून घालून परतून घ्या. नंतर यात यलो ग्रेव्ही, कोकनट मिल्क, कोथिंबीर, चवीनुसार मीठ व फ्रेश क्रीम घालून गरम पुलावबरोबर सव्‍‌र्ह करा.

जैन ग्रेव्ही
साधारणपणे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर एक गोष्ट लक्षात आली की बरीच मंडळी अशी आहेत, ज्यांना कांदा, लसूण चालत नाही पण त्यांना चटपटीत खायला मात्र आवडतं. मग विचार केल्यावर असं लक्षात आलं की हे सहज शक्य आहे. कांदा, लसूणचा वापर न करता सुद्धा आपण रेस्टॉरंटसारखी भाजी घरी बनवू शकतो. त्यातूनच हा प्रकार जन्माला आला.
ही ग्रेव्ही कांदा, लसूण न खाणाऱ्या खवय्यांसाठी उपयुक्त आहे. या ग्रेव्हीचा उपयोग करून आवडीप्रमाणे भाज्या बनवता येतील. यात तयार होणाऱ्या काही भाज्यांचे प्रकार आपण येथे पाहूया. ही ग्रेव्हीसुद्धा डीफ्रिजमध्ये दहा ते बारा दिवस राहू शकते.
साहित्य : काजू आणि मगज- २ वाटय़ा, धने पावडर- १ चमचा, जिरे पावडर- १ चमचा, कसुरी मेथी- १ चमचा, हळद-पाव चमचा, मीठ व तिखट चवीप्रमाणे, तेल- पाव वाटी, तेजपान- २ ते ३, खडा मसाला पावडर- पाव चमचा (दालचिनी, मोठी विलायची, लवंग, काळीमिरी, जायपत्री, स्टारफूल, तमालपत्र समप्रमाणात घेऊन एकत्र पावडर करून घ्या.).
कृती : प्रथम एका मोठय़ा भांडय़ात तेल घेऊन गरम झाल्यावर त्यात शहाजिरे घालून नंतर काजू-मगज पेस्टबरोबर सर्व मसाले घालावेत. अर्धी वाटी पाणी टाकून तेल सुटेस्तोवर उकळावे. सर्वात शेवटी हळद व तिखट, मीठ घालावे. थंड झाल्यावर ही ग्रेव्ही फ्रिजमध्ये ठेवावी.
जैन ग्रेव्ही वापरून तयार केलेल्या भाज्या
जैन पद्धतीच्या भाज्या तयार करताना यात जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्या टाळतात. जसे आलं, लसूण, कांदा, बटाटा इत्यादी. याशिवाय काही लोक फ्लॉवर व वांग्याचा उपयोगसुद्धा टाळतात.

बेबीकॉर्न मसाला
साहित्य : जैन ग्रेव्ही- १ वाटी, बेबीकॉर्न- ८ ते १० नग, मीठ, साखर – चवीनुसार, जिरे- अर्धा चमचा, दही- एक चमचा, हळद, तिखट चवीनुसार, धने जिरे पावडर – १ चमचा, कोथिंबीर, दही १ चमचा.
कृती : पातेल्यात एक चमचा तेल घेऊन त्यात जिरे घालून तडतडल्यावर जैन ग्रेव्ही, हळद, तिखट, धने-जिरे पावडर, बेबीकॉर्न व चवीनुसार मीठ, साखर, एक चमचा दही किंवा लिंबू पिळून मिश्रणाला तेल सुटेस्तोवर परतावे. कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करावे.
टीप :- ही भाजी थोडी तिखट करावी. कारण बेबीकॉर्न तसे चवीला गोडसर असतात. बेबीकॉर्नऐवजी तुम्ही पनीरसुद्धा वापरू शकता.
चव बदलण्यासाठी तिखटाचा वापर कमी करून मिरपूड वापरा.

यलो ग्रेव्ही
साधारणपणे ग्रेव्ही तयार करताना त्यातला मुख्य पदार्थ जो असतो त्याची चव तर असतेच, पण तो कशा प्रकारे वापरला आहे यावरसुद्धा त्याची चव, त्याचा रंग, त्याची पोत ठरते. असाच हा आहे कांद्याच्याच ग्रेव्हीचा प्रकार, पण त्याची तयार करण्याची पद्धत बदलल्यामुळे त्याच्या चवीत आणि रंगात फरक पडतो.
साहित्य : उकडलेल्या कांद्याची पेस्ट २ वाटय़ा, काजू मगज अर्धी वाटी, हळद, तिखट, मीठ चवीनुसार, आलं, लसूण पाणी अर्धी वाटी, जायपत्री पावडर अर्धा चमचा, हिरव्या मिरचीची पेस्ट २ चमचे, दालचिनी पावडर अर्धा चमचा, तेल- अर्धी वाटी
कृती : सर्वप्रथम कांदे कुकरमध्ये वाफवून त्याची पेस्ट करावी. साधारण ३०० ग्रॅम काजू मगज एकत्र उकळून त्याची पेस्ट करून घेणे. आलं, लसूण एकत्र वाटून त्यात पाणी घालून गाळून घ्यावे. पातेल्यात तेल घेऊन थंड तेलातच आलं, लसणाचे पाणी व हिरव्या मिरचीची पेस्ट घालून मिश्रणाला उकळी आणावी. याला तेल सुटल्यावर त्यात काजू मगजची पेस्ट, कांद्याची पेस्ट घालून वरून थोडे पाणी घाला. या मिश्रणाला तेल सुटेस्तोवर उकळी आणावी. नंतर यात हळद, मीठ, दालचिनी व जायपत्री पावडर घालून पुन्हा थोडे तेल सुटेस्तोवर परतावे. थंड झाल्यावर डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेवावी.

मलाई मेथी कॉर्न
साहित्य : जैन ग्रेव्ही १ वाटी, स्वीटकॉर्न- अर्धी वाटी, हिरवी मेथी- अर्धी वाटी, लोणी- १ चमचा, बारीक चिरलेली मिरची, मीठ, साखर – चवीनुसार, कोिथबीर, फ्रेश क्रिम- २ चमचे, दही – पाव वाटी
कृती : प्रथम पातेल्यात लोणी घेऊन त्यात हिरवी मेथी घालून परतून घ्यावे. त्यानंतर ग्रेव्ही, बटर, चवीनुसार मीठ, साखर घालून मिश्रणाला तेल सुटेस्तोवर परतावे. त्यामध्ये थोडे घोटलेले दही व साखर घालून एकत्र करावे. सव्‍‌र्ह करते वेळी वरून फ्रेश क्रीम व कोथिंबीर घालून बटर नानबरोबर सव्‍‌र्ह करावे.
टिप : लोणीऐवजी वनस्पती तूप वापरले तर वेगळी चव येते.
ग्रेव्हीमध्ये मीठ घातलेले असते, हे लक्षात घेऊन मीठ घालावे.

Story img Loader