दिवाळीत गोड धोड खाल्यावर काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होणं हे स्वाभाविक आहे. अशाच काही चटपटीत रेसिपीज आज आम्ही तुम्हाला देतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिरव्या करवंदाला कोकणात रानमेवा म्हणून संबोधिले जाते त्याची एकप्रकारे चटणी करता येते – थोडी हिरवी करवंदं आतील बिया काढून उकडून मिक्सरमधून बारीक करून घ्या, त्यामध्ये मीठ, मसाला, हळद, गरम मसाला घालून सर्व एकजीव करा. गॅसवर एक कढई / फ्रायपॅन ठेवून त्यामध्ये २ चमचे तेल घालून त्यावर तयार झालेले मिश्रण घाला, थोडा वेळ ढवळा. करवंदाची चटणी तयार.
एक कढई किंवा लगडी (चपट पातेलं) गॅसवर ठेवा. २-३ चमचे तेल घाला, ३-४ पाकळ्या लसूण ठेचून टाका, जरासा हिंग, १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून त्यामध्ये टाका. थोडं परतवून घ्या, कांदा लालसर झाल्यावर त्यावर एक टॉमेटो चिरून टाका, हळद, मीठ, मसाला टाका, त्यावर साफ केलेली १ वाटी कोळंबी टाका. कोळंबी शिजल्यावर अर्धा वाटी कांद्याची पात चिरून, गरम मसाला टाका. तयार झालेली सुकी कोळंबी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता.
चिकन सॅण्डविच
साधारण पाव किंवा अर्धा किलो बोनलेस चिकन मिठ घालून उकडून घ्या, त्या उकडलेल्या चिकनचे हातानेच छोटे छोट तुकडे करा. स्लाईस ब्रेड घ्या, दोन स्लाइसला बटर लावा, एकावर उकडलेले चिकन पसरवा, त्यावर मिरी पावडर टाका. दुसरा स्लाईस त्यावर ठेवून टोस्टरमध्ये टोस्ट करून घ्या. झालं चिकन सॅंडविच तयार. अशी आपण अध्र्या किलोमध्ये १५/१६ सॅँडविच करू शकतो. हे सॅंडविच हेल्दीपण आणि चविष्टपण. शाळेतील मुलांना किंवा नोकरी करणाऱ्यांना डब्यात घेऊन जाण्यास अगदी उपयुक्त आणि सोयीचं.
डालफ्राय
साधं उदाहरण घ्या. घरात तयार केलेली डाळ (वरण) असते. एक पातेलं गॅसवर ठेवा. त्यात दोन चमचे तेल टाका, हिंग टाका, ४-५ लसणाच्या पाकळ्या टाका, एक छोटा कांदा चिरून टाका, हळद टाका, एक दोन हिरव्या मिरच्या बारीक करून टाका आणि त्यावर शिजवलेली डाळ घाला, ढवळा, कढ आला की त्यात बारीक केलेली कोथिंबीर टाका. बस्स झालं, डालफ्राय तयार पाहिजे असल्यास वरून तेल मोहरीचा तडका द्या. अहो,
टोमॅटो चटणी –
एक कढई गॅसवर ठेवा त्यात २-३ चमचे तेल टाका, जिरं-मोहरी टाका, ४-५ टामॅटोच्या बारीक बारीक फोडी करून टाका, शेंगदाण्याचा कूट टाका, २-३ हिरव्या मिरच्या बारीक करून टाका, तिखट घाला. आता हे शिजू द्या. पुलक्याबरोबर खाण्यास फार टेस्टी लागतं.
१ किलो मटण लहान तुकडे करून बाजूला ठेवा. गॅसवर एक पातेले ठेवा. त्यात ४-५ चमचे तेल टाका, हिंग, लसणाच्या ४-५ पाकळ्या टाका, ३-४ मध्यम आकाराचे कांदे बारीक-बारीक करून त्यात टाका, कांदा लालसर होईपर्यंत ढवळा, एका लसणाच्या कांद्याच्या पाकळ्या, साधारण १ इंच एवढं आलं, ४-५ हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर एकत्र मिक्सरमधून बारीक करून घेऊन त्यात घाला, हळद घाला आणि थोडा ढवळा व त्यात मटणाचे तुकडे टाका. सगळं मिश्रण एकत्र होईपर्यंत ढवळा व पातेल्यावर एक ताट ठेवून त्यात पाणी ठेवा. जोपर्यंत मटणाचा वास येत नाही तोपर्यंत त्यावरचे ताट काढू नका, मटण शिजले की वास हा येतोच. मटण शिजल्यावर त्यात हवं असलं तर ताटामधील गरम पाणी पाहिजे तेवढं टाका, एक चमचा अखंड गरम मसाल्याची पावडर व चवीपुरतं मीठ टाका व ढवळा. थोडा वेळ तसंच शिजू द्या, थोडं आटलं की गॅस बंद करा. मटणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. बस्स झणझणीत सुकं मटण खाण्यास तयार.
साधारण १/२ किलो कोंबडीचे मटण बारीक तुकडे करून धुऊन घ्या. १/२ वाटी ओले किसलेले खोबरे, दोन मध्यम आकाराचे कांदे, लसूण, कोथिंबीर एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्या. गॅसवर एक पातेले ठेवा, २-३ चमचे तेल घाला, त्यात लसणाच्या ४-५ पाकळ्या चेचून टाका (अखंड टाकल्यास उडण्याची शक्यता असते), एक बारीक चिरलेला कांदा घाला, कांदा थोडा लालसर झाल्यावर त्यामध्ये हळद, मीठ, मसाला घाला आणि वर कोंबडीच्या मटणाचे बारीक तुकडे टाका. एकत्र ढवळून पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवा. कोंबडी शिजल्यावर १ चमचा गरम मसाल्याची पावडर घाला.